शरीर संबंधाला विरोध, वादानंतर संतापलेल्या पत्नीने अंगावर रॉकेल ओतलं, पतीने थेट गॅसवरुन...

मुंबई तक

01 Jun 2025 (अपडेटेड: 01 Jun 2025, 08:28 AM)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरकाम करते आणि शुक्रवारी ती कामावर जाण्याच्या तयारीत होती. यावेळी दिनेशने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून पती संतापला

point

मुंबईच्या चेंबूरमधील संतापजनक घटना

Mumbai Crime News : मुंबईच्या चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 46 वर्षीय दिनेश आव्हाड या व्यक्तीने आपल्या पत्नीवर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (30 मे 2025) दुपारी घडली. पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं संतापलेल्या पतीने हे क्रूर कृत्य केलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पोट दुखतं म्हणून तपासणी केली, 10 वीच्या मुलीच्या पोटात आढळली 210 सेंटीमिटरची...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरकाम करते आणि शुक्रवारी ती कामावर जाण्याच्या तयारीत होती. यावेळी दिनेशने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. महिलेला कामावर जाण्याची घाई असल्याने तिने नकार दिला, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या महिलेने स्वतःवर केरोसिन ओतलं, पण तिने स्वतःला पेटवलं नव्हतं. याचवेळी दिनेशने गॅसवर कागद पेटवून तो तिच्यावर फेकला, ज्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली.

जखमी महिलेला तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची प्रकृती सध्या गंभीर आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेश आव्हाडला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> आरारारारा! 2 मुली, 2 मुले..आपापसात पार्टनरच बदलतात! टाईम टेबल बनवून एकमेकांसोबत रुममध्ये..

पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यापूर्वीही आरोपीने पत्नीवर अत्याचार केले होते का, याची चौकशी केली जात आहे. महिलेची वैद्यकीय अहवाल आणि जबाबाच्या आधारे पुढील कारवाई होईल.