UPSC Result 2020: मोठ्या पगाराची नोकरी सोडली, ‘या’ तरुणाने UPSC मध्ये कसं मिळवलं यश?

मुंबई तक

• 07:42 AM • 25 Sep 2021

यवतमाळ: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यावेळी आर्णी येथील दर्शन दुगड या विद्यार्थ्याने मेहनतीच्या जोरावर 138 वा क्रमांक मिळवला आहे. दर्शनचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत तर आई संतोषी गृहिणी आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून तो पुढे आला. लहानपणा पासून मोठा अधिकारी होण्याचं […]

Mumbaitak
follow google news

यवतमाळ: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यावेळी आर्णी येथील दर्शन दुगड या विद्यार्थ्याने मेहनतीच्या जोरावर 138 वा क्रमांक मिळवला आहे. दर्शनचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत तर आई संतोषी गृहिणी आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून तो पुढे आला. लहानपणा पासून मोठा अधिकारी होण्याचं तो स्वप्न पाहत होता. त्या दृष्टीने त्याने प्रयत्न करून आज हे यशाचं शिखर गाठलं आहे.

हे वाचलं का?

अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला हैदराबाद आणि मुंबईच्या एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी केली. मात्र या नोकरीबाबत तो समाधानी नव्हता. त्यामुळे लहानपणी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी त्याने 2018 साली खाजगी कंपनीची नोकरी सोडली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली.

पहिल्या प्रयत्नात त्याला यश संपादन करता आले नाही मात्र जानेवारी 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश प्राप्त झाले. प्राथमिक शिक्षण त्याने अर्णीच्या मराठी शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर तो शिक्षणात कधीच मागे राहिला नाही.

नोकरी लागल्यानंतर त्याने ती नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेचा जो निर्णय घेतला त्याला देखील त्याच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. दर्शनने आता नोकरीच्या माध्यमातून देशाची सेवा करावी. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा. अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे. तर मोठ्या भावाला मिळालेल्या यशाने बहीणही भारावून गेली आहे.

UPSC : IIT मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमारने सांगितला ‘यूपीएससी’तील यशाचा मंत्र; विशेष मुलाखत

यूपीएससी परीक्षेत कोणीकोणी मिळवलं यश?

महाराष्ट्राचे विद्यार्थी कोण कोण?

महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात 36 वी आली आहे तर विनायक नरवदे हा देशात 37 वा आला आहे. विनायक महामुनी 95 व्या क्रमांकावर आहे. पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.

21 वर्षांची नितिशा जगताप पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली आहे. तेही 199 व्या रँकने. गुरूवारी तिची दिल्लीत मुलाखत झाली आणि आज निकाल लागला. त्यामुळे ती आत्ता दिल्लीतच आहे.

महाराष्ट्रातील लातूरची असलेल्या नितिशाने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. लातूर येथील निलेश गायकवाड यूपीएससीमध्ये देशात 629 रँकने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वर्षी ही निलेशने यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी 752 रँक आली होती. तो सध्या संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्तही झाला होता. सध्या त्याची पुण्यात त्याचं प्रशिक्षण सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभम पांडुरंग जाधव याने 445 रँक मिळवणून यश मिळवलं आहे.

रँक 137- कमलकिशोर कांदरकर (लातूर)

रँक 138- दर्शन दुगड (यवतमाळ)

रँक 501- अभिजीत वेकोस (जालना-लातूर)

UPSC परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 263 उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. 86 उमेदवार मागासवर्गातील, 229 ओबीसी, 122 अनुसूचित जाती तर 61 अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय 150 उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये 15 आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, 55 ओबीसी, 5 अनुसूचित जाती तर 1 उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.

    follow whatsapp