ADVERTISEMENT
गोवा विधानसभा मतदारसंघात आणखी एक अपेक्षित निकाल समोर आला आहे. ज्यात वाळपोई मतदारसंघात भाजपच्या विश्वजीत राणेंनी बाजी मारलेली आहे.
विश्वजीत राणेंचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे सुपुत्र अशी ओळख असलेल्या राणेंचं गोव्याच्या राजकीय वर्तुळात मोठं वजन आहे.
काही दिवसांपूर्वीच विश्वजीत राणेंचा काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे गोव्यात चर्चांना उधाण आलं होतं.
परंतू भाजपचे प्रभारी सी.टी.रवी यांनी विश्वजीत हे आमच्यासोबतच आहेत. गरज पडल्यास ते उमेदवार फोडून आणू शकतात असंही रवी यांनी सांगितलं. वाचा संबंधित वृत्त
आपल्या स्वागतासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचं अभिवादन स्विकारताना विश्वजीत राणे
निकालानंतर विश्वजीत यांनी पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. मुख्यमंत्रीपदाची आपल्याला कोणतीही अपेक्षा नसल्याचं सांगितलं. वाचा संबंधित वृत्त
विश्वजीत राणेंना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते
वाळपोई मतदारसंघात एकाही पक्षाचा उमेदवार विश्वजीत राणेंना क़डवी टक्कर देऊ शकला नाही.
ज्यामुळे अपेक्षेप्रमाणे विश्वजीत यांनी आपला गड कायम राखला आहे. वाचा संबंधित वृत्त
ADVERTISEMENT
