पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी सराफाचं दुकान लुटलं, वाशिममधील ‘त्या’ घटनेचं गुढ उकललं

मुंबई तक

• 09:52 AM • 26 Dec 2021

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानावर हल्ला करुन दरोडा टाकण्यात आला होता. याचा उलगडा पोलिसांनी काही तासांमध्ये केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केलं असून पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं १२ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरला मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक […]

Mumbaitak
follow google news

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी

हे वाचलं का?

वाशिम जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानावर हल्ला करुन दरोडा टाकण्यात आला होता. याचा उलगडा पोलिसांनी काही तासांमध्ये केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केलं असून पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं १२ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरला मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे सहकारी कामगार रवींद्र वाळेकर हे रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्याकडील बॅग लंपास करण्यासाठी गाडी अडवून योगेश अंजनकर आणि रवींद्र वाळेकर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपींनी दोघांवरही चाकूने वार केले व देशी कट्टा मधून गोळीबार केला. या हल्ल्यात योगेश अंजनकर आणि वाळेकर हे गंभीर जखमी झाले होते.

कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातून घ्यायच्या ! कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तींची चिकन सेंटर मालकाला मारहाण

दरम्यान, या दरोडेखोरांनी या हल्ल्यात ९ लाख ९ हजार रुपये आणि ५३ ग्रॅम सोने असलेली बॅग लंपास केली होती. या सशस्त्र हल्ल्यात कामगार रवींद्र वाळेकर यांचा मृत्यू झाला असून सोने व्यापारी योगेश अंजनकर जखमी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सराफ व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांवर आरोपींना शोधण्यासाठी मोठा दबाव होता. पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लागलीच तपासाची चक्र वेगाने फिरवत यातीन दोन आरोपींना अटक केली आहे. अजय घुगे आणि हसन सलीम खाटीक अशी आरोपींची नाव आहेत. यातील अजय घुगेने पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी १२ लाखांचं कर्ज घेतलं होतं. जे परत करणं त्याला कठीण जात होतं. अजय घुगेने आपल्याकडील काही सोनं अंजनकर ज्लेवर्समध्ये गहाण ठेवलं होतं. पोल्ट्री करता पैशांची गरज असल्यामुळे आरोपी घुगेने अंजनकर यांच्याकडे पैशांची मागणी केली, ज्यात दोघांमध्ये मतभेद तयार झाले. यातूनच या हल्ल्याचा कट रचण्यात आला होता.

नागपूरच्या चोरांची अजब कहाणी, थंडीपासून बचाव करण्यासाठी चोरलेली बाईक जाळली

वाशिम शहरातील व्यापाऱ्यांनी पोलीस यंत्रणेवर टाकलेल्या दबावानंतर दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. याव्यतिरीक्त अन्य तीन आरोपींचा शोधही सुरु असल्याचं कळतंय. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५३ ग्रॅम सोनं, दोन गावठी पिस्तुल, ७ राऊंड, २ सुरे जप्त केले आहेत.

वाशिम : अल्पवयीन विद्यार्थ्याला पाय चेपायला बोलावून शिक्षकाने केला अनैसर्गिक अत्याचार

    follow whatsapp