धाराशिव, गणेश जाधव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणाचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अमर समुद्रे यांनी विजय मिळवला. ढोकी पंचायत समिती गणातील मतमोजणी प्रक्रिया चुरशीची राहिली. प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कमी-अधिक होत राहिल्याने निकाल शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पष्ट झाला नाही. अंतिम फेरीअंती केवळ एका मताच्या फरकाने निकाल लागला.
ADVERTISEMENT
अंतिम मतमोजणीनुसार,
अमर समुद्रे (शिवसेना उद्धव गट) : ३,१८७ मते
निहाल काझी (भाजप) : ३,१८६ मते
अवघ्या एका मताच्या फरकाने लागलेल्या या निकालामुळे ढोकी गणाचा निकाल राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, ढोकी जिल्हा परिषद गटात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. या गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांनी १,२०० हून अधिक मतांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय नोंदवला. पंचायत समिती गणात अत्यल्प मतफरकाने निकाल लागला असताना, जिल्हा परिषद गटात मोठ्या फरकाने निर्णय झाला. या दोन्ही निकालांनी ढोकी परिसरातील स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट केली आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद – पक्षनिहाय जागा
(एकूण जागा : 55)
• भाजप (BJP) : 19
• शिवसेना (SS – शिंदे गट) : 15
• शिवसेना (SS-UBT – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) : 7
• राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित पवार गट) : 6
• काँग्रेस (INC) : 3
• समाजवादी पक्ष : 1
• इतर (OTH) : 4
• राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP – शरद पवार गट) : 0
• AIMIM : 0
• VBA : 0
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











