भाजपचे आरोप ते आंदोलनाचा चेहरा...विवेकानंद पाटीलचा थेट पलटवार

मुंबई तक

• 08:17 AM • 09 Oct 2026

राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक आहेत. विवेकानंद पाटील सध्या आंदोलनाचा चेहरा बनला आहे. विवेकानंदने आंदोलनावर होणारे आरोपावर मुंबई Tak शी बोलताना स्पष्टपणे मतं मांडली आहेत.

MPSC Protest Pune

MPSC Protest Pune

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भाजपचे आरोप ते आंदोलनाचा चेहरा

point

विवेकानंद पाटीलचा थेट पलटवार

MPSC Protest Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारात पारदर्शकता आणणे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेला 24 वर्षीय तरुण आणि यूपीएससी/एमपीएससीचा अभ्यासक विवेकानंद पाटील याने एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. शिक्षण व्यवस्था सुधारणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबवणे हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्याने दिला आहे.

हे वाचलं का?

रोहित पवार यांचं रिलाँचिंग?

आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा आणि विद्यार्थ्यांना 'अर्बन नक्षल' ठरवण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप विवेकानंदने फेटाळून लावला आहे. राजकीय नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशील प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहावे, असे सांगताना त्याने सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. रोहित पवार यांच्या रिलाँचिंगसाठी हे आंदोलन सुरू असल्याच्या दाव्यावर बोलताना, हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नसून केवळ सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आणि न्यायासाठी उभारलेली चळवळ असल्याचे त्याने स्पष्ट केले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'हे' जिल्हे होरपळणार, 'या' भागांना उन्हाचा चटका

फोकस अध्यक्षांच्या राजीनाम्यावर...

आंदोलनादरम्यान एका राजकीय नेत्याने दिलेल्या घर बांधून देण्याच्या ऑफरला विवेकानंदने अत्यंत स्वाभिमानाने नाकारले आहे. ना. धों. महानोर आणि कवींच्या कवितांचा संदर्भ देत, काबाड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची भूमिका त्याने मांडली. सोशल मीडियावरील वाढती क्रेझ आणि थेट मंत्र्यांचे फोन येत असूनही आपला मुख्य फोकस अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच राहील, असे त्याने स्पष्ट केले. या आंदोलनामुळे स्वतःच्या अभ्यासाचे नुकसान होत असले तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा लढा आवश्यक असल्याचे त्याने नमूद केले.

हे ही वाचा : ‘नानाची वाडी’वर पाटेकरांना अखेरचा निरोप; बॉलिवूडचा 'क्रांतिवीर' अनंतात विलीन

गांधीवादी मार्गाने आंदोलन 

महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. विश्वासाने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांच्या साथीने गांधीवादी मार्गाने हा संघर्ष सुरूच राहील, असा विश्वास विवेकानंद कदमने व्यक्त केला. दरम्यान, विविध क्षेत्रांतील विचारवंत, साहित्यिक आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, आता शासन यावर काय तोडगा काढते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.