‘नानाची वाडी’वर पाटेकरांना अखेरचा निरोप; एकनाथ शिंदे, तुकाराम मुंढेंसह दिग्गजांची उपस्थिती

मुंबई तक

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पुण्यातील प्रसिद्ध ‘नानाची वाडी’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून कुटुंबीय, मित्र, कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर अंतिम दर्शनासाठी पोहोचले आहेत.

ADVERTISEMENT

nana patekar last rites pune nanachi wadi eknath shinde tukaram mundhe celebrities
नाना पाटेकरांवर डोणजे गावी अत्यंसस्कार
Google CTA

पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुण्यातील त्यांच्या प्रसिद्ध ‘नानाची वाडी’ येथे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, चाहते तसेच सिनेसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर पोहोचले आहेत.

‘नानाची वाडी’वर अंतिम दर्शनासाठी गर्दी

नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाहत्यांची आणि जवळच्या व्यक्तींची गर्दी होऊ लागली. नाना पाटेकर यांचे या फार्म हाऊसशी विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीचे अंतिम क्षण याच ठिकाणी पार पडत आहेत.

सिनेसृष्टीतील जवळचे मित्र पोहोचले

नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनेक सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी ‘नानाची वाडी’ गाठली. नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या ‘क्रांतिवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच‘नटसम्राट’शी संबंधित लेखिका किरण यांनीही नाना पाटेकर यांचे अंतिम दर्शन घेतले.

हे ही वाचा>> नाना पाटेकरांची शेवटची 2 तास 50 मिनिटं... मृत्यूपूर्वी काय घडलं?

अभिनेते आणि नाना पाटेकर यांचे जवळचे मित्र प्रवीण तरडे हे देखील आपल्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी तेथे पोहोचले.