Viral News : एका जोडप्याला हॉटेलमधील एक खोली वापरण्यासाठी दिली जात होती. जोडपे देखील त्याचा वापर करायचे. आपल्या खासगी क्षणांचा आनंद मिळवायचे. ही व्हिआयपी रुम अनेक दिवसांपासून वापरात आली होती, हेच जोडप्यांना महागात पडले, त्यांच्यासोबत असं काही घडले यामुळे त्यांची झोपच उडून गेली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय
200 हून अधिक जोडप्यांचे खासगी व्हिडिओ
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी व्हिआयपी रुममध्ये जोडपे होते. जेव्हा त्यांनी कर्मचारी सतेंद्रला ताब्यात घेतले असता, त्याच्या मोबाईल फोनमध्ये 200 हून अधिक जोडप्यांचे खासगी व्हिडिओ पाहून त्यांना जोराचा धक्का बसला होता.
1500 ते 2000 रुपये आकारले जायचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा तरुण, महिला किंवा जोडपे रेस्टॉरंटमध्ये यायचे तेव्हा त्यांना विचारले जायचे की, त्यांना व्हिआयपी सुविधा हव्यात की फक्त जेवण हवे. तर जोडपे व्हीआयपी सुविधांची मागणी करायचे, त्यांच्याकडून 1500 ते 2000 रुपये आकारले जात होते.
या घटनेनं संपूर्ण घटनेच्या खुलाशाने संपूर्ण जिल्हा आणि शहरात भीतीचे वातावरण पसरले. या व्हिआयपी रुममध्ये भेट देणाऱ्या जोडप्यांना त्यांचे व्हिडिओ व्हायरल होण्याची भीती सतावत होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : 63 वर्षीय शिकवणी मास्तरांकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी राहिली गर्भवती
या रेस्टॉरंटची मालकीण एक महिला वकील आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, वकिलाने सांगितलं की, ती तिचे बहुतेक दिवस न्यायालयातच घालवते. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती तिला नसते. हॉटेलमध्ये स्वतंत्र खाजगी खोली असल्याने मालकाच्या परवानगीशिवाय ती खोली बनवली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. अशातच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT











