Variant Of Concern म्हणजे नेमकं काय? Delta Plus ने टेन्शन का वाढवलं आहे?

मुंबई तक

• 12:42 PM • 28 Jun 2021

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने सध्या महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रूग्ण आढळले होते. त्यातल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हेरिएंटला Variant Of Concern घोषित केलं आहे. जगातल्या 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण मिळाले आहेत. आता आपण जाणून घेऊया व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणजे काय? […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने सध्या महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रूग्ण आढळले होते. त्यातल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हेरिएंटला Variant Of Concern घोषित केलं आहे. जगातल्या 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण मिळाले आहेत. आता आपण जाणून घेऊया व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणजे काय? ‘

हे वाचलं का?

Delta Plus: लस आणि प्रतिकारशक्ती या दोन्हीला चकमा देऊ शकतो कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट: तज्ज्ञ

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?

जेव्हा कोणताही व्हायरस हा जास्त प्रमाणात रोग प्रसार वाढवणारा असतो किंवा जास्त प्रमाणात साथ रोगामुळे मृत्यू वाढवणारा असतो तेव्हा त्याला Variant Of Concern असं जाहीर केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवला. कोरोनाची दुसरी लाट देशातून आणि राज्यातून ओसरत असतानाच आता समोर धोका आहे तो डेल्टा प्लसचा. त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काळजी वाढवणारा व्हेरिएंट किंवा व्हायरसचा प्रकार असं त्याला जाहीर करण्यात आलं आहे. देशात 40 पेक्षा जास्त रूग्ण या व्हेरिएंटचे आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटसारखा नाही. मात्र त्यामुळे मृत्यू वाढू शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाचा विषाणू रूप बदलू लागला आहे. जगभरात कोरोनाच्या व्हायरसचे वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. त्या व्हेरिएंटना WHO ने नावंही दिली आहेत. अशावेळी आता डेल्टा प्लस हा व्हेरिएंट काळजी वाढवणारा व्हेरिएंट म्हणून जाहीर झाला आहे. सध्या जरी या व्हेरिएंटचे चाळीसपेक्षा जास्त रूग्ण भारतात असले आणि ही संख्या तशी लहान वाटत असली तरीही यामुळे होणारे दुष्परिणाम हे मोठे असू शकतात. कारण डेल्टा या व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली जी पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने भयंकर होती. या लाटेत देशभरात अनेक मृत्यूही झाले. तसंच या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाचं रौद्ररूप पाहण्यास मिळालं. आता डेल्टा प्लस या व्हेरिएंटला काळजी वाढवणारा व्हेरिएंट म्हटलं गेलं आहे. कारण याचाही प्रसार होऊ शकतो तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढू शकतं त्यामुळेच काळजी वाढवणाऱ्या व्हेरिएंटच्या गटात या व्हेरिएंटचा समावेश करण्यात आला आहे.

समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’

Delta variant अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो Dr. Fauci यांचा दावा

कोणत्या व्हेरिएंटला काय नाव देण्यात आलं आहे?

WHO ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी 1.1.7 या व्हेरिएंटला अल्फा हे नाव देण्यात आलं आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या बी. 1.351 ला बीटा असं नाव देण्यात आलं आहे. ब्राझिलमध्ये नोव्हेंबर 2020 ला आढळून आलेल्या पी.1 स्ट्रेनला गामा हे नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेत आढळून आलेल्या B. 1.427 आणि B 1.429 हा व्हेरिएंट आता एप्सीलोन नावाने ओळखला जाईल. B.1.526 या व्हेरिएंटला आयोटा हे नाव देण्यात आलं आहे. फिलीपीन्समध्ये कोरोना व्हायरसचा स्ट्रेन P.3 आढळून आला होता त्याला थीटा असं नाव देण्यात आलं आहे. काही देशात आढळून आलेल्या B.1.525 या व्हेरिएंटला ईटा हे नाव देण्यात आलं आहे.

    follow whatsapp