Pune crime news : पुणे शहरात दररोज नव्याने गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. एका तरुणाने 18 वर्षीय तरुणीवर आर्थिक वादातून धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये 11 मे दिवशी घडली. या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून केलेल्या तरुणीचे नाव कोमल जाधव (18 वय) आहे. तर खून करणाऱ्या व्यक्ती उदयभान यादव (45 वय) आणि त्याच्या सख्खा भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाच जणांचा बुडून मृत्यू, आत्महत्या की अपघात?
संबंधित प्रकरणात खून करण्यात आलेली तरुणी ही पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास होती. तर खून करणारी व्यक्तीही कोमलच्याच शेजारी राहत होती. दोघांचा आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. त्यानंतर त्याने कोमलला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. रविवारी उदयभानने आपल्या भाच्याला सोबत घेऊन कोमलला तिच्या घराखाली बोलावले. त्यानंतर उदयभानने कोणताही विलंब न करता तिच्यावर वार केले.
या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तपास केला असता, मृत कोमल जाधव आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहत असल्याचे समोर आले. तसेच त्या दोघांमध्ये संबंधही होते. त्यामुळे त्यांच्यातील आर्थिक व्यवहार वाढू लागला. याच आर्थिक प्रकरणातून पीडितेची हत्या करण्यात आली. यामुळे आता पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा : sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: दहावीतही मुलींचीच बाजी, मुलं किती टक्क्यांनी मागेँ?
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या खूनत मदत करणाऱ्या उदयभानच्या भाच्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दोघांमध्ये नातेसंबंध होते आणि त्यातून त्यांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात कोमलचा आरोपींनी कट रचून हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
