बाप नाही हैवान! दारूच्या नशेत लेकीच्या खांद्यावर कुऱ्हाडीने सपासप वार, पत्नीलाही... नेमकं घडलं काय?

Maharashtra Crime : जन्मदात्या बापाने आपल्या लेकीवर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केला. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा तालुक्यातील शेळगावातील धक्कादायक घटना.

maharashtra crime

maharashtra crime

मुंबई तक

01 Jul 2025 (अपडेटेड: 01 Jul 2025, 01:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा तालुक्यात धक्कादायक घटना

point

दारूड्या पित्याने पत्नीसह लेकीला संपवलं

Maharashtra Crime : धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा तालुक्यातील शेळगावात एक धक्कादायक घटना घडली. जन्मदात्या बापाने आपल्या लेकीवर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केला. गौरी ज्ञानेश्वर जाधव (वय 9) असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. तर हत्या करणाऱ्या पित्याचे नाव ज्ञानेश्वर जाधव असे आहे. ज्ञानेश्वरने आपल्या लेकीसह आपल्या पत्नीला जाळलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी 4. 30 च्या दरम्यान घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शुक्र ग्रह राशी बदलतोय, 30 जूनपासून 'या' राशीतील लोकांवर धोक्याची घंटा

नेमकं प्रकरण काय? 

गौरीची वारंवार प्रकृती बिघडत होती. गौरी काही दिवसांपूर्वी सायकलवरून पडली होती. या कारणांवरुन संतापलेल्या ज्ञानेश्वर जाधवने राहत्या घरी रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने डोक्यात, दोन्ही खांद्यांवर घाव घातले. या प्रकरणी ज्ञानेश्वर जाधव यांच्याविरोधात आंबी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणीला सुरुवात केली. 

दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वर जाधवला दारूचे व्यसन होते. यामुळे गौरी आपली आजी मंगल जाधवकडे राहत होती. शनिवारच्या रात्री ती घरी आल्यानंतर ज्ञानेश्वर जाधवने तिच्यावर कुऱ्हाडीने घाव करत खून केला. या घटनेची माहिती कोणालाच सांगू नको अशी ज्ञानेश्वरने आपल्या आईला धमकी दिली. 

हेही वाचा : लग्नाचा बनाव, कोल्हापुरातल्या कुटुंबाची फसवणूक आणि मुलीच्या बापाचा मृत्यू... जळगावचं भैय्या पाटील प्रकरण काय?

ज्ञानेश्वर इथवर न थांबता त्याने आपल्या पत्नीला जिवंत जाळलं. एकाच कुटुंबातील दोघांचा क्रूर अंत झाल्याने धाराशिव हादरून गेलंय. आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी सामान्य लोकांनी मागणी केली.  

    follow whatsapp