आई-वडील गेले, भावानेही स्वत:ला संपवलं म्हणून मानसिक धक्का, अनूपने 3 वर्ष स्वत:ला एकाच फ्लॅटमध्ये...

अनूप यांच्या फ्लॅटची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. फ्लॅटमध्ये कोणतेही फर्निचर नव्हते आणि सगळीकडे फक्त कचऱ्याचे ढीग साचले होते. ते फक्त ऑनलाइन अन्न मागवून आपला उदरनिर्वाह करत होते.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Jul 2025 (अपडेटेड: 01 Jul 2025, 09:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईतील हादरवून टाकणारी घटना

point

तीन वर्ष एकाच फ्लॅटमध्ये बंद होती व्यक्ती

नवी मुंबई : जुईनगर येथील सेक्टर 24 मधील घरकुल सोसायटीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 55 वर्षीय अनूप कुमार नायर या माणसाची हादरवून टाकणारी कहाणी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वतःला या व्यक्तिने आपल्या फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं होतं. मानसिक उदासीनता, एकटेपणा आणि कौटुंबिक दु:खद घटनांमुळे त्यांनी बाह्य जगापासून पूर्णपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अनूप हे पूर्वी संगणक प्रोग्रामर म्हणून काम करत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्या माता-पित्याचे निधन झालं आणि 20 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावानं आत्महत्या केली होती. या घटनांनी त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती.

हे ही वाचा >> भाजप नेत्याचे हात-पाय बांधून चिखलाने घातली आंघोळ, महिलांनी असं केलं तरी का?

फ्लॅटमध्ये झाले होते कचऱ्याचे ढीग

अनूप यांच्या फ्लॅटची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. फ्लॅटमध्ये कोणतेही फर्निचर नव्हते आणि सगळीकडे फक्त कचऱ्याचे ढीग साचले होते. ते फक्त ऑनलाइन अन्न मागवून आपला उदरनिर्वाह करत होते. स्थानिक रहिवासी आणि सोसायटीचे अध्यक्ष विजय शिबे यांनी सांगितलं की, अनूप अत्यंत कमी वेळा दरवाजा उघडत असत आणि कचरा बाहेर टाकत नसत. स्थानिकांनी वेळोवेळी त्यांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली होती.

सील संस्थेची मदत

या प्रकरणाची माहिती एका तरुणाला मिळाल्यावर त्याने सील संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे कार्यकर्ते अनूप यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना अनूप गंभीर अवस्थेत आढळले. त्यांच्या पायाला गंभीर संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. सध्या अनूप यांना पनवेलमधील सील आश्रमात ठेवण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा दिसत आहे.

हे ही वाचा >> Sangli: आधी मित्राला हळदीला नेलं, येताना केली 'ती' घाणेरडी मागणी, मित्राने नकार देताच...

अनूप यांनी स्वतः कबूल केलं की, माता-पिता आणि भावाच्या निधनानंतर एकटेपणा आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं.  सील संस्थेच्या प्रयत्नांमुळे फक्त त्यांची शारीरिक प्रकृतीच नाही, तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण अशाच पद्धतीच्या नैराश्यात आहेत. अनेकजण दुर्लक्ष करत चालतात, तर अनेकांना असा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शारिरीक आरोग्यासोबतच, मानसिक आरोग्य जपणंही किती गरजेचं आहे हे या प्रकरणातून अधोरेखित झालंय.  

 

    follow whatsapp