पोलीस अधिकाऱ्याला रोखलं, भर रस्त्यात सपासप वार करुन संपवलं, नागपूरला हादरवणारी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम यांच्या पोटात आणि छातीत धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करणारे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:42 AM • 01 Jul 2025

follow google news

अमरावती : शनिवारी संध्याकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर आणि पोलीस खात्यात खळबळ उडाली. वलगांव पोलीस ठाण्यात कार्यरत असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) अब्दुल कलाम यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. ड्युटीवरून बाईकवरून घरी परतत असताना मध्यरात्री गुंडांनी त्यांना घेरून हल्ला केला आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेमुळे पोलीस खात्यात आणि शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हे वाचलं का?

हल्ल्यात तिघांचा समावेश; दोन आरोपी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम यांच्या पोटात आणि छातीत धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करणारे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोन विशेष तपास पथके स्थापन केली.

हे ही वाचा >> गाडीवर भारत सरकारचा बोर्ड, IAS असल्याचं ओळखपत्र दाखवून सगळ्यांना गंडवलं, पोलिसांनी कसं पकडलं?

अवघ्या 12 तासांत हत्येत सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख जियाउद्दीन अहसानुद्दीन (22) आणि आवेज अयूब खान (22) अशी आहे. तिसरा आरोपी फाजिल साबिर खान (23) याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याला 
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अटक केली जाईल.

70 हजाराच्या वादातून हत्या? 

प्राथमिक तपासात ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचं समोर आलं आहे. अब्दुल कलाम यांच्या भावानं एका महिलेकडून 70,000 रुपये उसने घेतले होते. या पैशांवरून महिलेच्या मुलांशी, कलाम यांचा भाऊ आणि पुतण्याशी बराच काळ वाद सुरू होता. याप्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. अब्दुल कलाम आपल्या भावाच्या बाजूने उभे राहिल्यानं संतप्त झालेल्या आरोपींनी रागातून ही हत्या केल्याचं तपासातून उघड झालं.

पोलिसांची तातडीने कारवाई; स्थानिकांमध्ये संताप

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हत्येचा कट रचणाऱ्यांना उघड केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती पोलिसांनी काही तासांतच आरोपींना शोधून काढले. सध्या पोलिस या प्रकरणाच्या इतर पैलूंचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याची अशी हत्या होणं ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं म्हणत नागरिकांनी दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिले आहे. या घटनेनं शहरात सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस खाते या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत आहे.

    follow whatsapp