CBSE Class 12th Result 2025: CBSE बोर्डाच्या बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. CBSE ने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी बोर्डाने 13 मे रोजी निकाल जाहीर केला होता. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई 12 वीचे निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येतील.
ADVERTISEMENT
मुलींची टक्केवारी
यावर्षी बारावीच्या परीक्षेत 16 लाख 92 हजार 794 विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि त्यापैकी 14 लाख 96 हजार 307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण 44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. दहावीच्या परीक्षा 18 मार्च रोजी संपल्या, तर बारावीची अंतिम परीक्षा 4 एप्रिल रोजी झाली. सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या निकालात लिंगनिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी पाहता, यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.64 इतकी आहे आणि ट्रान्सजेंडरच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 100 इतकी आहे. या वर्षीचा निकाल 2024 पेक्षा चांगला लागला आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा 5.94 टक्क्यांनी जास्त आहे.
पुढील संकेतस्थळावर पाहा निकाल
- cbse.gov.in
- cbseresults.nic.in
- results.cbse.gov.in
कसा पाहाल 12 वी बोर्डाचा निकाल
1. निकाल पाहण्यासाठी results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या CBSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होम पेजवर 'CBSE 12th Result Direct Link' वर क्लिक करा.
3. लॉगिन पेज उघडल्यानंतर तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
4. तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
5. विद्यार्थी त्यांच्या निकालाची डिजिटल कॉपी डाउनलोड करून स्वत:कडे ठेवू शकतात.
हे ही वाचा: CBSE 12th Result: CBSE 12 वीचा निकाल जाहीर, किती टक्के विद्यार्थी झाले पास? असा पाहा तुमचा निकाल
डिजिलॉकर वर तपासा निकाल
1. DigiLocker अॅप डाउनलोड करा.
2. digiLocker.gov.in वेबसाइटवर जा.
3. तुमचा रोल नंबर, इयत्ता, शाळा क्रमांक आणि 6 अंकी पिन टाका.
4. सत्यता तपासण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी भरा.
5. तुमच्या स्क्रिनवर तुमचा निकाल दिसेल.
Umang अॅपमधून पाहता येईल निकाल
1. Umang अॅप डाउनलोड करा.
2. अॅप उघडल्यानंतर शिक्षण विभागात जाऊन CBSC वर क्लिक करा.
3. निकाल पाहण्यासाठी त्यात आवश्यक डिटेल्स भरा.
SMS च्या साहाय्याने चेक करा निकाल
1. मॅसेजिंगचं अॅप उघडा.
2. cbse 12 असं टाइप करा.
3. 7738299899 नंबरवर मॅसेज पाठवा.
4. तुमचा निकाल SMS च्या माध्यमातून तपासा.
ADVERTISEMENT











