ADVERTISEMENT
मागील अनेक महिन्यांपासून Whatsapp मल्टिपल अकाउंट लॉगिन फीचर टेस्ट करत आहे.
या फीचरने यूजर्स आपल्या अकाउंटला सेकेंडरी डिव्हाइसमध्ये कनेक्ट करु शकतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, यासाठी प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेटची गरज नाही.
हे फीचर कंपनी अधिकृत बीटा लेबलसह देणार आहे.
हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनसाठी जारी करण्यात आलं आहे.
जरी यूजरच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल किंवा तो ऑनलाइन नसेल तरीही सेकेंडरी डिव्हाइसमधून मेसेज सेंड आणि रिसिव्ह होईल.
पहिले Whatsapp वेब वापरण्यासाठी यूजर्सला मेन डिव्हाइस किंवा स्मार्टफोन इंटरनेटने कनेक्ट असणं गरजेचं होतं.
या फीचरला आपल्या स्मार्टफोनला एनेबल करण्यासाठी आपल्या ते फीचर ऑप्ट करावं लागेल
एकदा आपण एनेबल झाल्यानंतर तुमचं Whatsapp जुन्या सगळ्या डिव्हाइसमधून अनलिंक होईल. ज्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लिंक करावं लागेल.
ADVERTISEMENT











