BMC आयुक्त चहल ED च्या रडारवर आलेत, कारण… समजून घ्या प्रकरण काय?

दिव्येश सिंह

16 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case: मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते आज (16 जानेवारी) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कोरोना काळात जे मुंबई महापालिकेने जे निर्णय घेतले त्याबाबत चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना (Corona) काळात मुंबईत जी कोव्हिड […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case: मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) नोटीस बजावण्यात आल्यानंतर ते आज (16 जानेवारी) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कोरोना काळात जे मुंबई महापालिकेने जे निर्णय घेतले त्याबाबत चहल यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोरोना (Corona) काळात मुंबईत जी कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospital) उभारण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे याच प्रकरणी आता थेट मुंबई महापालिका आयुक्तांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. (why bmc commissioner iqbal singh chahal has come under ed radar understand what is actual case)

हे वाचलं का?

मुंबईत जे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते त्याची कंत्राटं ही संजय राऊतांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या कंपनीला दिला असल्याचा आरोप करण्यात आलं आहे. पुण्यातील एक जम्बो कोव्हिड सेंटर आणि मुंबईतील दोन सेंटरसाठी सुजित पाटकरांच्या कंपनीला कंत्राट दिली ज्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच प्रकरणी आता आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची चौकशी करण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी जामीन आदेश ऐकताच कोर्ट रुममध्ये काय घडलं? सुनिल राऊतांनी दिलं उत्तर

नेमकं प्रकरण काय?

ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक एफआयआर नोंदविण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या गंभीर कलमांन्वये सुजित पाटकर आणि लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर या प्रकरणाची चौकशी पुढे EOW मुंबई पोलीस यांच्याकडे देण्यात आली. EOW या प्रकरणी चौकशी करत असताना त्यांनी मुंबई महापालिकेकडे माहिती मागवली होती. त्याच दरम्यान ED ने देखील याच संदर्भात एक ईसीआर दाखल केली. त्यानंतर ईडीने याप्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवत चौकशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावलं.

भाजप आरोप करत असलेले सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण?

इक्बाल सिंह चहल हे मुंबई पालिकेचे आयुक्त आहेत किंवा महापालिकेचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कोव्हिड सेंटरची कंत्राटं देण्यात आली होती. त्यातच सुजित पाटकर यांच्या कंपनीला दोन ते तीन कोव्हिड सेंटर चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. या कोव्हिड सेंटरसाठी जी कंपनी त्यांनी वापरली होती लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट तिची नोंदणी झालेली नव्हती. तर हा यातील प्रमुख मुद्दा आहे. तरीही त्यांना कंत्राट देण्यात आलं.

हे कंत्राट जून 2020 रोजी देण्यात आलं. त्यानंतर एका वर्षानंतर त्यांच्या कंत्राटाचा करार महापालिकेबरोबर पार पडला. सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये जो एक वर्षाचा कालावधी होता त्यात 32 ते 35 कोटींचा फंड सुजित पाटकर यांच्या कंपनीला देण्यात आला. मुंबईशिवाय पुण्यातही सुजित पाटकर यांना अशीच कंत्राटं मिळाली होती.

याच प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले होते आणि ते त्यासाठी पुण्यातही गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. हे प्रकरण वेगळं आहे. पण मुंबईतील प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली होती.

त्याच दरम्यान ईडीने जी चौकशी सुरू केली आहे त्याबाबत त्यांना अशी शंका आहे की, जे पैसे 32 ते 35 कोटी किंवा 100 कोटींचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. 100 कोटीपर्यंतचा फंड सुजित पाटकरांना मिळाला होता. त्यामुळे याप्रकरणी ईडीकडून देखील याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी सुरू केली.

कोण आहेत सुजित पाटकर?

सुजित पाटकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्याशिवाय संजय राऊतांच्या मुलींबरोबर एका कंपनीत सुजित पाटकर हे भागीदार होते.

याशिवाय अलिबागमध्ये जी जागा खरेदी झाली होती. 8-10 प्लॉट संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. त्याच प्लॉटमध्ये सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांचं नाव देखील होतं. त्याच प्रकरणात पत्रा चाळ घोटाळ्याची देखील चौकशी झाली होती आणि ज्यामध्ये संजय राऊत यांना अटकही झालेली.

ED चा फास BMC पर्यंत : आयुक्त इक्बालसिंह चहल रडारवर; चौकशीसाठी समन्स

जेव्हा पत्रा चाळ प्रकरणी सुजित पाटकरांच्या घरी छापे मारण्यात आले होते तेव्हा त्यात ईडीला कोव्हिड सेंटर आणि अलिबागच्या जागेबाबत काही कागदपत्रं सापडली होती. त्यानंतर हा एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यात आता नवीन ईसीआयर नोंदविण्यात आला. त्यातच ईडीने ही नवी चौकशी सुरू केली आहे.

इक्बाल सिंह चहल यांना ईडीने का बोलावलं?

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना फक्त चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. त्यांच्याकडून फक्त माहिती घेतली जाईल. कोव्हिड सेंटर कंत्राटाचं कसं वाटप केलं जातं, करारात काय अटी असतात? या सगळ्याबाबत चहल यांच्याकडून माहिती घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यावेळी चहल यांना याबाबतही विचारणा केली जाईल की, सुजित पाटकर यांची कंपनी नोंदणीकृत नव्हती तरीही त्यांना हे कंत्राट कसं देण्यात आलं?, त्याशिवाय महापालिकेने एक वर्षभर कंपनीसोबत करार का केला नाही? ही सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार आहे.

सध्या तरी इक्बाल सिंह चहल यांच्याकडून प्राथमिक स्वरुपाची माहिती घेतली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी पुढे काय कारवाई करायची हे ठरवतील.

    follow whatsapp