राणांविरुद्धचं ‘ते’ वक्तव्य राऊतांना भोवणार? युवा स्वाभिमानीची नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरुन सध्या राज्यात रणकंदन सुरु आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ज्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलत असताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फुट खड्ड्यात गाडले जाल असं वक्तव्य केलं होतं. या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:55 AM • 26 Apr 2022

follow google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरुन सध्या राज्यात रणकंदन सुरु आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ज्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलत असताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फुट खड्ड्यात गाडले जाल असं वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्याची दखल घेत युवा स्वाभिमानी पक्षाने संजय राऊत यांच्याविरुद्ध नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या एका शिष्ठमंडळाने आज नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांची भेट घेत त्यांच्याकडे आपली तक्रार दिली आहे. तक्रारीसोबत संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा पेन ड्राईव्हही युवा स्वाभिमानीच्या नेत्यांनी नागपूर पोलिसांना दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

यापुढे शिवसेनेच्या नादाला लागाल तर त्याने आपल्या गोवऱ्या स्माशानात रचून यावं. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका नाहीतर 20 फूट जमिनीत गाडले जाल. तुम्ही पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून अशा या शिखंडीना पुढे केलं जात असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

    follow whatsapp