पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधींच्या रांगेत 'या' नेत्यांना जागा, फोटो व्हायरल

सुशांत काळे

16 Nov 2026 (अपडेटेड: 16 Nov 2026, 09:11 PM)

Sonia Gandhi Book Launch : नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे बिलॉन्गिंग - अ जर्नी ऑफ लव्ह या त्यांच्या आत्मचरित्र्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारण्यापासून ते त्यांच्या जीवनातील आतापर्यंतचे अनेक महत्त्वाचे टप्पे नमूद करण्यात आलेत. या पुस्तकाची देशभरात जोरदार चर्चा होताना दिसते. यासाठी दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. याच सोहळ्यादरम्यान काही ठराविक दिग्गजांना सोनिया गांधी यांच्या शेजारी बसता आले, त्यांचे फोटो व्हायरल झालेत. 

Google CTA
Belonging - A Journey of Love

1/5

नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे बिलॉन्गिंग - अ जर्नी ऑफ लव्ह या त्यांच्या आत्मचरित्र्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारण्यापासून ते त्यांच्या जीवनातील आतापर्यंतचे अनेक महत्त्वाचे टप्पे नमूद करण्यात आलेत. या पुस्तकाची देशभरात जोरदार चर्चा होताना दिसते. यासाठी दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. याच सोहळ्यादरम्यान काही ठराविक दिग्गजांना सोनिया गांधी यांच्या शेजारी बसता आले, त्यांचे फोटो व्हायरल झालेत. 

Belonging - A Journey of Love

2/5

प्रकाशन संस्था हार्पर कॉलिन्स यांच्या माहितीनुसार, 2 लाख पुस्तकांच्या प्रत विकत घेण्यात आल्यात. तसेच पुस्तकाच्या विक्रीत मोठी वाढ होऊ लागली आहे. या पुस्तकाच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली होती. याच पुस्तक उद्घाटनाच्या सोहळ्यादरम्यान सोनिया गांधी यांच्या रांगेत बसलेले नेते नेमके कोण आहेत? त्यांचे फोटो व्हायरल झालेत. 

Belonging - A Journey of Love

3/5

पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान सोनिया गांधी यांच्या शेजारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, सी. जोसेफ विजय, काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल दिसत आहेत. तसेच फारुख अब्दुला दिसत आहेत, मेहबुब मुफ्ती अगदी एका कोपऱ्यात दिसत आहेत. 

Belonging - A Journey of Love

4/5

या फोटोत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव दिसत आहेत, ते सोनिया गांधी यांच्या शेजारी बसलेत. तर अखिलेश यादव यांच्या शेजारी डाव्या बाजूला उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार डिंपल यादव बसलेल्या आहेत. 

Belonging - A Journey of Love

5/5

प्रियांका गांधी या सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांच्या मागे बसलेल्या दिसून येतात. या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसेच या सोहळ्यासाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आल्या होत्या, तसेच इतर दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली होती. 

हे वाचलं का?