Astrology : आज 'या' राशीतील लोकांचा खर्च वाढेल, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
मुंबई तक
• 12:23 PM • 13 Nov 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीतील लोकांच्या खर्चात वाढ होईल असे राशीभविष्य सांगतं, अशातच या राशीने सावधानतेनं विचार करूनच आर्थिक खर्च करावा. तसेच व्यापाराशी निगडित खर्चाशी वाढ होईल. कार्यक्षेत्रात यश मिळणार असून जाणून घ्या 13 नोव्हेंबर 2026 रोजी एकूण राशींचे भविष्य.
ADVERTISEMENT


1/13
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीतील लोकांच्या खर्चात वाढ होईल असे राशीभविष्य सांगतं, अशातच या राशीने सावधानतेनं विचार करूनच आर्थिक खर्च करावा. तसेच व्यापाराशी निगडित खर्चाशी वाढ होईल. कार्यक्षेत्रात यश मिळणार असून जाणून घ्या 13 नोव्हेंबर 2026 रोजी एकूण राशींचे भविष्य.


2/13
मेष
मेष राशीतील लोकांना सामाज जीवनात मान सन्मान मिळणार आहे.तु्म्ही घेतलेला निर्णय योग्य असण्याची शक्यता आहे. जुन्या नातेसंबंधात सुधारणा होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेलून काम करणे अधिक फायदेशीर ठरेल. तसेच व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/13
वृषभ
कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारे, मानसिक ताण निर्माण होऊन तुमचा आत्मविश्वास वाढेल. कर्ज घेणे टाळावे, सतत वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची अधिक गरज आहे. व्यवसाय क्षेत्रात नवीन गुंतवणूक टाळावी.


4/13
मिथुन
प्रत्येक काम सावधगिरीने करावे, तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. खोळंबलेले पैसे परत मिळतील. कोणाशीही वाद घालू नये.
ADVERTISEMENT


5/13
कर्क
कर्क राशीतील लोकांचा ताण कमी होईल. तसेच करिअरबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. नवीन योजना आखल्या जातील, तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.


6/13
सिंह
आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरची परिस्थिती सुधारेल, संभाषणात संयम बाळगावा. लोकांच्या सल्ल्यानुसार आपला दृष्टिकोन बदलू नका. तुमचे आरोग्य चांगले राहील प्रलंबित काम लवकर पूर्ण होईल.
ADVERTISEMENT


7/13
कन्या
कन्या राशीतील लोकांना काही बाबतीत चिंता वाटेल, आपले शब्द वितारपूर्वक वापरा. कुटुंबातील चालू असलेले मतभेद मिटतील. लांबचा प्रवास टाळावा. व्यवसायात नवीन गुंतवणूकीचा विचार करावा


8/13
तूळ
तूळ तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मालमत्तेसंबंधीत निर्णय सुक्षपणे घ्या. तुमच्या सुखसोयी आणि ऐषरामात वाढ होईल. काम करताना राग दाखवणे टाळावे. तुमचे आरोग्य चांगले राहील.


9/13
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांचे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या कामाची व्यप्ती वाढेल. प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळावे. लांबचा प्रवास टाळावा, व्यावसायिक खर्च वाढेल.


10/13
धनु
धनु राशीतील लोक आपले काम उत्साहाने करतील. करिअरमध्ये प्रगती करण्याची ही योग्य वेळ आहे. तुमचा आदर वाढेल, काळजीपूर्ण शब्दांचा वापर करावा. इतरांच्या आणि स्वत: देखील वादात पडणे टाळावे.


11/13
मकर
मकर राशीतील लोकांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. मानसिक गोंधळ दूर होईल, तसेच शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा होईल, तसेच मोठे निर्णय घेताना विलंब करू नका.


12/13
कुंभ
कुंभ राशीतील लोकांचे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने असेल, तसेच तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. कुटुंबात शांतता आणि आनंदात वाढ होईल.


13/13
मीन
घाईचे निर्णय घेणे टाळा. तुमची नवीन लोकांशी भेट होईल. तुम्हाला परदेशातून नफ्याची बातमी मिळेल.
ADVERTISEMENT











