CJP Protest : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर एक मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत लँड केल्यानंतर काही मिनिटांतच दिल्ली पोलिसांच्या पथकाने विमानामध्ये प्रवेश केला आणि अभिजीत दीपके, सौरभ दास तसेच आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. विमानामध्येच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
'मी कोणालाही घाबरत नाही'
पोलिसांनी कारवाई करताना अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेराव घातला, मात्र या संपूर्ण प्रसंगादरम्यान दीपके अत्यंत ठाम आणि शांत राहिले. दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच आपण अटकेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पोलिसांना सामोरे जाताना त्यांनी कोणतीही भीती दाखवली नाही. यावेळी प्रसारमाध्यमांशी किंवा इतरांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी अत्यंत आक्रमक आणि निर्भय भूमिका घेतली. "मी अटकेसाठी पूर्णपणे तयार होतो. मी कोणालाही घाबरत नाही," असे स्पष्ट उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे या संपूर्ण प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा : सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी! युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?
नाट्यमय घडामोडी
विमानतळावर ही धडक कारवाई पूर्ण केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिन्ही जणांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि विमानतळावरून सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले. या अचानक घडलेल्या नाट्यमय घटनाक्रमाने विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण केले होते, तर सद्यस्थितीत या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हे ही वाचा : बॉडी कॅमेरे लावून आंदोलकांवर नजर, CJP आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांचे चक्रव्यूह!
ध्रुव राठीदेखील ताब्यात
याआधी यूट्यूबर ध्रुव राठी, लीगल हेड रत्ना सिंह यांनाही ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सकाळी सुमारे पन्नास साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गुरुग्राममधील राठी यांच्या घरी पोहोचले आणि सकाळी आठ वाजता त्यांना ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT












