NCP : ”दादा, दादा करत तुमचं…”, अजित पवारांच्या खासदाराने सुप्रिया सुळेंना डिवचलं

प्रशांत गोमाणे

24 Nov 2023 (अपडेटेड: 24 Nov 2023, 12:55 PM)

83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

ajit pawar mp sunit tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision

ajit pawar mp sunit tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision

follow google news

Sunil Tatkare Criticize Supriya Sule, NCP crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दाखल झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च अपयश झाकण्यासाठी आणि नैराश्यापोटी दुसऱ्यावरती असे आरोप करत असल्याची टीका सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.  (ajit pawar mp sunil tatkare criticize sharad pawar mp supriya sule ncp election commision)

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना मणिपूर हिंसाचारात अविश्वास ठरावाच्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांनी सरकाराच्या बाजूने मतदान केल्याचं म्हटलं होतं. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खरमरीत टीका केली.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला.. 17 वर्षीय मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार, नंतर..

आदरणीय दादांनी 30 वर्षात बारामती उभी केली. दादा, दादा, दादा बोलता बोलता ज्यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. तसेच दादांविरूद्ध याचिका दाखल करताना, मग मात्र सांगणार की राजकीय विचारधारा वेगळी असल्यामुळे आम्ही ते तशापद्धतीने केल्याचे तटकरे यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पाटील यांच्या वयावर आक्षेप घेतला होता. श्रीनिवास पाटील यांच्याबाबत मला कमालिचा आदर आहे. माझे अनेक वर्षाचे त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत. आम्हाला सर्वांनाच ते पितृतुल्य आहे. राजकीय लढाई होत असते त्यावेळेस वयोमर्यादा हा काय विषय येत नसतो. तसेच मला इतकंच म्हणायचय की, 83, 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहे.

हे ही वाचा : Deep fake : रश्मिका मंदानानंतर रतन टाटांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत काय?

महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळेला मी उपस्थित नव्हतो.मतदान केले नाही.खरं आहे, मोदींचे भाषण मी पुर्णपणे ऐकलं. आणि माझ्या वारंवार पत्रकार परिषदेत सांगितले की, गणपतीचा तो पहिला दिवस होता, म्हणून मला जाव लागलं. लोकसभेचे 542 सदस्य आहेत. मतदानामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती. त्यामुळे उरलेले सगळे महिलाविरोधी आहे, असे सातत्याने म्हणणे चुकीचे आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.

    follow whatsapp