चर्चा होती ठाकरेंच्या आणखी एका खासदाराची, पण फुटला भलताच नेता.. शिंदेंनी 'असा' दाखवला कात्रजचा घाट!

Eknath Shinde's shock tactics: शिवसेना UBT पक्षातील आणखी एका खासदाराच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा राजकीय डाव साधला आहे.

another blow to thackeray faction amidst talk of a split among mps mlc sachin ahir joins shinde faction eknath shinde political shock tactics back in spotlight

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो सौजन्य: फेसबुक)

मुंबई तक

• 02:52 PM • 30 Jun 2026

follow google news

मुंबई: शिवसेना UBT पक्षाचे सहा खासदार फोडून एकनाथ शिंदेंनी नुकतंच 'ऑपरेशन टायगर' पार पाडलं होतं. यानंतर देखील ठाकरेंचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा  राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. ठाकरेंकडे उरलेल्या तीन खासदारांपैकी आणखी कोणता खासदार फुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त धक्कातंत्राचा वापर केला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शिंदेंनी शिवसेना UBT चे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना आपल्या पक्षात प्रवेश देत थेट विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारीही दिली. 

हे वाचलं का?

शिंदेंच्या या नव्या खेळीमुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, शिंदे यांच्या 'धक्कातंत्राची' राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान अनपेक्षित राजकीय घडामोड

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील एका खासदाराच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्या घडामोडीकडे लागले होते. मात्र, त्याच दरम्यान विधान परिषदेचे आमदार आणि ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत राजकीय समीकरणांनाच नवे वळण दिले. या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा>> अरुण गवळीचे भाचे सचिन अहिर कसे लागतात दिग्गज नेत्यांच्या गळाला?

Sachin Ahir Joins Shinde Sena: मुंबईतील प्रभावी चेहरा शिंदे गटात

सचिन अहिर हे मुंबईतील कामगार चळवळ, गिरणगाव आणि वरळी परिसरात प्रभाव असलेले नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून त्यांनी तीन वेळा आमदारकी भूषवली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटातील उपनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

हे ही वाचा>> सचिन अहिर सोडून गेले, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, ट्वीट तुफान व्हायरल

अशा प्रभावी नेत्याचा शिंदे गटात प्रवेश हा केवळ संख्याबळ वाढवणारा नाही, तर मुंबईतील आगामी राजकीय लढतींसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.

Eknath Shinde Strategy: एकनाथ शिंदेंचे 'धक्कातंत्र' पुन्हा चर्चेत

2022 मधील शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी ठाकरे गटातील नेत्यांना आपल्या गटात आणण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर अनेक माजी आमदार, खासदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेते शिंदे गटात दाखल झाले. नुकतंच ठाकरे गटातील 6 खासदार फोडल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, खासदार फुटीच्या चर्चांमध्ये असतानाच अचानक एक आमदार फुटल्याने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र दाखवून दिलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नेमकी पडद्यामागे या सगळ्या घडामोडी कशा घडवल्या आणि आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती समजले जाणारे सचिन अहिर यांना नेमकं कसं गळाला लावलं याबाबत राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Mumbai Politics: मुंबईतील ठाकरेंच्या राजकारणावर होणार परिणाम

सचिन अहिर यांच्यासारख्या मुंबईतील प्रभावी नेत्याचा शिंदे गटात प्रवेश हा आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. वरळी, परळ, शिवडी, लालबाग आणि गिरणगाव परिसरात असलेला त्यांचा प्रभाव शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो, तर ठाकरे गटासाठी ही संघटनात्मक पातळीवरील मोठी हानी मानली जात आहे.

Shiv Sena UBT Crisis: ठाकरे गटासमोर नवे आव्हान

सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर ठाकरे गट आधीच दबावाखाली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही पक्षाला रामराम ठोकल्याने पक्षासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

पुढील काळात आणखी काही नेते पक्षांतर करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.