Baramati Lok Sahba : सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी फुंकले रणशिंग; केली मोठी घोषणा

मुंबई तक

04 Feb 2024 (अपडेटेड: 04 Feb 2024, 08:02 AM)

Baramati Lok sabha 2024 election : अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरूद्ध उमेदवार देणार असल्याची घोषणा केली.

Ajit Pawar will announce candidate in Baramati Lok Sabha Constituency against Supriya Sule

Ajit Pawar will announce candidate in Baramati Lok Sabha Constituency against Supriya Sule

follow google news

Ajit Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha 2024 Election : (वसंत मोरे, बारामती) सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध 2024 मध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात असताना अजित पवारांनी मोठं विधान केलं. ‘शेवटची निवडणूक आहे, असे सांगितले जाऊन भावनिक केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहित?’, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं. ()

हे वाचलं का?

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली.

सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवारांचा उमेदवार

अजित पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले, “आपल्या शब्दाला किंमत आली आहे. एका व्यावसायिकाने काम करायला एक कोटी दिले. बारामतीतील काम करायला पक्षाचे पैसे घातले. एकीकडे अजित सांगतो आहे आणि दुसरीकडे वरिष्ठ सांगतो आहे, कुणाचे ऐकायचे? इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका.”

हेही वाचा >> छगन भुजबळांनी फोडला राजकीय बॉम्ब, शिंदे काय करणार?

“उद्या आपल्या विचारांचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेल की आता माझ्या लोकांनी खासदार दिला आहे. आता माझी कामे झाली पाहिजेत. आपल्या अडचणीला कोण उपयोगी येतो, याचा विचार करा”, असे सांगत अजित पवारांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंच्याविरोधात दंड थोपटले.

‘मी उमेदवार आहे, असे म्हणून मतदान करा’

अजित पवार असंही म्हणाले की, “आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक असणार आहे. अनेक प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले. लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहे. मी उमेदवार आहे, असे म्हणून मतदान करा.”

हेही वाचा >> Ganpat Gaikwad: BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

शरद पवारांवर अजित पवारांचं टीकास्त्र

बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचलं. ते म्हणाले, “शेवटची निवडणूक आहे, असे सांगून भावनिक आवाहन केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहिती?”, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना राजकीय निवृत्तीवरून चिमटा काढला.

    follow whatsapp