PM Narendra Modi vs Indira Gandhi : भारत-पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने मध्यस्ती केल्याने युद्धबंदी करण्यात आलीय. युद्धविराम लागल्यानंतर लोकांना इंदिरा गांधी यांची आठवण आली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. इंदिरा गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत आहेत, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावरही इंदिरा गांधींचा ट्रेंड सुरु झाला आहे. 1971 च्या युद्धात जेव्हा भारताने पाकिस्तानला सडतोड उत्तर दिलं होतं, तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर इंदिरा गांधीचं का होतंय कौतुक?
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, इंदिरा गांधी होणं सोपं नसतं. त्यांनी सैनिकांसोबत इंदिरा गांधी यांचाही फोटो शेअर केला आहे. काँग्रेस नेते श्रीनेत यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटलंय, अमेरिकेच्या डोळ्यात डोळा घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. जगाचा भुगोल बदलला होता. अशा होत्या इंदिरा गांधी.
हे ही वाचा >> Ind vs Pak युद्ध थांबताच IPL चाहत्यांसाठी खास बातमी, BCCI करणार मोठी घोषणा
बिहार काँग्रेसने एक्सवर पोस्ट करत म्हटलं, इंदिरा गांधी यांनी म्हटलं होतं, हिंदूस्थान कोणालाही घाबरत नाही. तर काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी एक्सवर म्हटलं, जोपर्यंत तोडलं नाही, तोपर्यंत सोडलं नाही. इंदिरा गांधी अमर रहे..काँग्रेस नेते पवन खेडा यांनी एक्सवर म्हटलंय, इंडिया मिस इंदिरा..
तसच एका यूजरने पोस्ट करत म्हटलं, आज इंदिरा गांधी ट्रेंडमध्ये राहणार. आयरन लेडी इंदिरा गांधी..अन्य एका यूजरने म्हटलं, इंदिरा गांधी यांनी युद्धही जिंकलं होतं आणि सन्मानही..दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, इंदिरा गांधी यांनी युद्धही जिंकलं होतं आणि सन्मानही..निवडणूक लढणं आणि युद्ध लढण्यात फरक असतो, असंही एका यूजरने म्हटलं.
हे ही वाचा >> 'भारत दहशतवादाचा पुरस्कर्ता नसून..', युद्धविरामानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT
