सर्वात मोठी बातमी... पाकिस्तानकडून भारतावर मोठा हल्ला, फतेह-1 बॅलिस्टिक मिसाइल सोडलं; भारताचंही चोख प्रत्युत्तर!

पाकिस्तानने आता भारतावर सर्वात मोठा हल्ला केला आहे. आतापर्यंत ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट बॅलिस्टिक मिसाइलने भारतावर हल्ला केला.

पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 बॅलिस्टिक मिसाइल सोडलं (फाइल फोटो)

पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 बॅलिस्टिक मिसाइल सोडलं (फाइल फोटो)

मुंबई तक

• 06:38 AM • 10 May 2025

follow google news

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यातच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानने भारतावर अत्यंत मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने त्यांच्याकडील फतेह-1 या अतिघातक क्षेपणास्त्राने भारतावर हल्ला केला. मात्र, भारताकडील हवाई संरक्षण यंत्रणेने  (एअर डिफेन्स सिस्टम) पाकिस्तानचं हे मिसाइल हवेतच नष्ट केलं. फतेह-1 हे एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. जे अत्यंत धोकादायक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मानले जाते. हे क्षेपणास्त्र भारताच्या पश्चिम भागात कुठेतरी एका रणनीतिक लक्ष्याला टार्गेट करत होते.

हे वाचलं का?

फतेह-1 क्षेपणास्त्र (Missile) म्हणजे काय?

पाकिस्तानचे फतेह-1 हे एक मार्गदर्शित बहु-प्रक्षेपण रॉकेट प्रणाली आहे. जी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राची (Missile) मारक क्षमता सुमारे 140 किलोमीटर आहे. फतेह-1 अनेक प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास देखील सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र ट्रक-आधारित लाँचरमधून डागता येते.

पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र (एअरस्पेस) पूर्णपणे बंद

भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आतपर्यंत जे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यावेळी त्यांनी आपलं हवाई क्षेत्र (एअरस्पेस) खुलंच ठेवलं होतं. मात्र, फतेह-1 च्या हल्यानंतर पाकिस्तानने  आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे. रावळपिंडी आणि रफीकी हवाई तळांवर झालेल्या स्फोटांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील 32 विमानतळ बंद

पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. ही लष्करी कारवाई सातत्याने सुरू आहे, त्यामुळे सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने भारतातील चार राज्यांमधील 26 शहरांमधील नागरी भागांवर शेकडो ड्रोन हल्ले केल्यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 32 विमानतळांवरील कामकाज 14 मे पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (10 मे) संरक्षण प्रमुख (CDS) आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत सद्य परिस्थितीवर उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

    follow whatsapp