Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result: छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

Chhatrapati Sambhajinagar ZP Election Results 2026: छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

chhatrapati sambhajinagar zp election result 2026 see chhatrapati sambhajinagar zilla parishad election results live

Chhatrapati Sambhajinagar ZP Eelection Result

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 03:57 PM)

follow google news

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026 Results : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

हे वाचलं का?

छ. संभाजीनगर जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • छ. संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • 63 / 58

    भाजप :   21
    शिवसेना :   16
    शिवसेना UBT:   10
    NCP : 3
    NCP SP ; 1
    काँग्रेस :   1
    वंचित :    00
    MIM:  1
    अपक्ष : 5

  • सिल्लोड तालुक्यातील 6 जिल्हा परिषदेतील 5 जिल्हा परिषदेच्या जागेवर अब्दुल सत्तार यांचे नेतृत्वात फडकला शिंदेसेनेचा भगवा 

    अजिंठा, शिवना, अंभई, घाटनांद्रा आणि डोंगरगाव येथील 5 उमेदवार शिवसेनेचे विजयी तर उंडणगाव येथे भाजपाचा उमेदवार विजयी 

    अपक्ष उमेदवार विजयी

    संभाजी नगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड 1 मताने विजयी, 

    ईव्हीएम मध्ये 17 मतांनी आघाडीवर होता, पण पोस्टल मतदान 16 झालं सगळे मतदान शिवसेना शिंदे यांच्या उमेदवार यांना मिळाले होते. नंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली असता, गरड 1 मताने विजयी झाले. 

    छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती - 

    1)छत्रपती संभाजीनगर एकूण  (20)
    भाजप :  7
    शिवसेना :   3 
    शिवसेना UBT:  1
     NCP :  

    2)पैठण तालुका (18)

    भाजप : 2  
    शिवसेना :  9
    शिवसेना UBT:  1
     NCP : 0

    3)गंगापूर तालुका (18)

    भाजप :   6 
    शिवसेना :  4
    शिवसेना UBT: 1
    NCP :  2

    4)वैजापूर तालुका (16)

    भाजप :  4
    शिवसेना :  7 
    शिवसेना UBT: 2
    NCP :  0

    5)कन्नड तालुका (16)

    भाजप :  4 
    शिवसेना :  5
    शिवसेना UBT:  2 
    NCP :  2

    6)खुलताबाद तालुका (6)

     भाजप :  3 
    शिवसेना :   2 
    शिवसेना UBT:  1 
    NCP :  

    7)फुलंब्री तालुका (8) : 

    भाजप :  4
     शिवसेना :  2 
    शिवसेना UBT: 1
     NCP : 

    8)सिल्लोड तालुका (18)
    भाजप : 3   
     शिवसेना :  9
    शिवसेना UBT:  2, 
    NCP :  

    9)सोयगाव तालुका (6) :

    भाजप : 1 
    शिवसेना : 3 
    शिवसेना UBT:   1
    NCP :

  • भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुलगी माहीन इद्रिस मुलतानी फर्दापूर जिल्हा परिषद गटातून विजयी. 

    शिवना जि प गट- डॉ.अनिता राजू बाबा काळे शिंदेंची शिवसेना 1005 मतांनी विजयी...

    शिवना गण - शेख सलीम शिंदेंची शिवसेना 1159 मतांनी विजयी...

    पानवडोद गण- नेहा सुमित खरात भाजपा 1620 मतांनी विजयी.