NCP Verdict : "हा अपेक्षित निर्णय, कारण...", ECI च्या निर्णयावर फडणवीसांचं विधान

ECI Verdict on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय?

what did say devendra fadnavis on NCP Split Verdict by ECI

अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

योगेश पांडे

• 08:45 AM • 07 Feb 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे केले अभिनंदन

point

फडणवीसांनी निकालावर काय मांडली भूमिका?

point

अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Election Commission Verdict in Ncp Case : अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (6 फेब्रुवारी) दिला. निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. हा निकाल अपेक्षितच होता, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर निकाल दिला. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळालं. हा निकाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

ECI Verdict on NCP : फडणवीसांनी काय मांडली भूमिका?

फडणवीस म्हणाले, "माझं मत असं आहे की, हा अपेक्षित निर्णय आहे. याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने सातत्याने जी भूमिका घेतली. अगदी यापूर्वी समाजवादी पक्षाच्या प्रकरणातही, जेव्हा वाद निर्माण झाला होता, त्यावेळी जी निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आहे किंवा इतर प्रकरणात घेतलेली भूमिका आहे."

"निवडणूक आयोगाची सातत्याने हीच भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे, तो अपेक्षित निर्णय आहे. शेवटी बहुसंख्य जो निर्णय घेतात, तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. 

अजित पवारांचं फडणवीसांनी केलं अभिनंदन

ते पुढे म्हणाले की, "सगळ्यात महत्त्वाचं हे की पक्षाचं जे संविधान आहे, त्याचं किती पालन केलं गेलं आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की, त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल", असे सांगत फडणवीसांनी अजित पवारांचं  अभिनंदन केलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "बहुमताला महत्त्व आहेच. हा निर्णय केवळ बहुमताच्या आधारावर झालेला नाहीये. सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. वेळोवेळी पक्षाचे संविधान काय होतं? त्याचं पालन गेलं का? निवडणुका झाल्या की नाही? त्यामुळे आता पक्ष नेमका कुणाचा आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार हा त्यामध्ये झालेला आहे."

देवेंद्र फडणवीस

"तुम्ही जे २०१९ चं विचारत आहात... मला असं वाटतं २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, लोकशाही काय असते, आज त्यांना समजलं असेल. मला असं वाटतं की, एवढं निश्चित आहे की, आज जे लोकशाहीच्या मुद्द्यावर ओरडताहेत. त्यांनी खरं लोकशाहीचा मुडदा पाडला होता. मुडदा पाडल्यानंतर लोकशाहीने त्यांना जागा दाखवली", असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

    follow whatsapp