नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, भारत सरकारने या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा समावेश असलेले पाच प्रमुख टार्गेट भारताच्या रडारवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लष्कराने नवी रणनीती आखल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईबाबत गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. असे मानले जाते की, भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करू शकतो आणि अशा परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अनेक मास्टरमाइंड असलेल्यांचे अड्डे देखील भारताच्या टार्गेटवर आहेत. त्यापैकी पहिले नाव हाफिज सईदचे आहे. याशिवाय इतरही काही जण हे आता प्रामुख्याने भारताच्या टार्गेटवर आङेत.
1. हाफिज सईद आणि लष्कर-ए-तैबाचा मुख्यालय
हाफिज सईद हा 20085 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैय्यबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पहलगाम हल्ल्यामागेही त्याचा हात असल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैय्यबाच्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या प्रॉक्सी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सईद सध्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहत असून, तो तिथे सामान्य लोकांमध्ये मोकळेपणाने फिरत आहे. सॅटेलाइट छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे त्याच्या घराची आणि जवळच्या मशिदीची पुष्टी झाली आहे. लष्कर-ए-तैय्यबाचे मुख्यालय मुरिदके येथे आहे, जे लाहोरजवळ आहे. हे ठिकाण दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि हल्ल्यांचे नियोजन करण्याचे केंद्र आहे. भारतासाठी हे ठिकाण प्राथमिक टार्गेट असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी सैन्याच मोठं 'गुपित' केलं उघड, भारताचा हल्ला करण्याचा मार्ग झाला सोप्पा!
2. मसूद अझहर आणि जैश-ए-मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र
जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर हा दुसरा महत्त्वाचा टार्गेट आहे. 2019 मधील पुलवामा हल्ल्यासह अनेक मोठ्या हल्ल्यांमागे जैश-ए-मोहम्मदचा हात आहे. अझहर सध्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथून आपली कारवाया चालवतो. तिथेच जैश-ए-मोहम्मदचे मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या रडारवर हे केंद्र आले असून, याला नष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
3. पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आणि जनरल आसिम मुनीर
पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल आसिम मुनीर हे 2022 पासून या पदावर आहेत. त्यांच्यावर पुलवामा हल्ला (2019) आणि पहलगाम हल्ला (2025) यांसारख्या दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देण्याचा आरोप आहे. या काळात ते आयएसआय (इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स) चे प्रमुख होते. पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय रावळपिंडी येथे आहे, जे त्यांच्या सैन्य रणनीती आणि कारवायांचे केंद्र आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आसिम मुनीर यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया भडकवण्याचा आरोप लागला आहे. त्यांनी लष्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. काही अहवालांनुसार, भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने ते रावळपिंडीतील एका बंकरमध्ये लपले आहेत, परंतु 26 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान सरकारने त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून या अफवा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आसिम मुनीर यांची भारतविरोधी वक्तव्ये आणि कट्टरपंथी प्रतिमा यामुळे ते भारताच्या हिटलिस्टवर आहेत.
हे ही वाचा>> Pahalgam Attack: 'त्या' बैठकीत PM मोदींसह अजित डोवालही, म्हणजे प्लॅन ठरलाय.. काय आहे Inside स्टोरी?
4. आयएसआयचे मुख्यालय
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय हे भारतातील सीमेपलीकडील दहशतवादाचे मुख्य प्रायोजक मानले जाते. पहलगाम हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे आयएसआयचा हात असल्याचा आरोप आहे. आयएसआयचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे, जिथून दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठिंबा दिला जातो. या हल्ल्यानंतर भारताने आयएसआयच्या कारवायांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
5. स्कर्दू एअरबेस आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांचा तळ
पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर आपली लढाऊ विमाने भारताच्या सीमेजवळील स्कर्दू एअरबेसवर तैनात केली आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमधील हे एअरबेस सामरिदृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथून तैनात जे-एफ 17 थंडर आणि एफ-16 विमाने काही मिनिटांत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकतात. भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने ही खबरदारी घेतली आहे. या एअरबेसवर हल्ला करून भारत पाकिस्तानच्या हवाई दलाच्या सामर्थ्याला मोठा धक्का देऊ शकतो.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध होता आणि त्यात गैर-मुस्लिम पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामागे पाकिस्तानी सैन्याचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट आहे.
पाकिस्तानामध्ये घबराट
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानात घबराट पसरली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पाकिस्तानने आपली लष्करी तयारी वाढवली असून, सीमेवर तोफखाना रेजिमेंट तैनात केली आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन यांनी भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान एकजूट होईल, असे म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी 30 वर्षांपासून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
पहलगाम हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. भारताने या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले असून, हाफिज सईद, मसूद अझहर, आसिम मुनीर, आयएसआय आणि स्कर्दू एअरबेस ही प्रमुख टार्गेट्स असण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील या तणावामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी पूर्ण केली असून, आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT
