मविआच्या जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांनी उघड केली अनेक रहस्य, वाचा Inside Story

रोहिणी ठोंबरे

08 Mar 2024 (अपडेटेड: 08 Mar 2024, 09:31 AM)

Prakash Ambedkar On MVA Seat Sharing : वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी (MVA) च्या जागावाटपाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या.

Mumbaitak
follow google news

Prakash Ambedkar On MVA Seat Sharing : वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी (MVA) च्या जागावाटपाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. प्रकाश आंबेडकरांना मविआसोबतच्या जागा वाटपाची अडचण कुठे आहे? असा प्रश्न विचारला असता यावर ते म्हणाले, 'मविआच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी बोलावले होते, त्यामुळे आम्ही कालच्या बैठकीला उपस्थित राहिलो. या बैठकीत निकाल लागला की नाही हे तेच सांगतील. यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही.'

हे वाचलं का?

तसंच, आंबेडकरांनी 27 जागांची मागणी केली अशी चर्चा रंगली होती. यावर ते म्हणाले की, 'आम्ही 27 जागांची मागणी केली नव्हती. आम्ही एकूण 48 जागांपैकी 27 जागांसाठी पूर्ण तयारी केली आहे. मात्र बैठकीला गेल्यावर समजलं की, अजूनपर्यंत त्यांचाच निर्णय झालेला नाही आहे.' 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, '10 ते 15 जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात समन्वय नाही. त्या जागांवर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार की एकत्र लढणार, हे ठरल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ शकतो. त्यापूर्वी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. 2019 मध्ये त्यांनी आमचे 8 जागांचे नुकसान केले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुस्लिम मते मिळाली, मात्र उर्वरित वंचितांना मते मिळू शकली नाहीत.'

ते म्हणाले की, 'आज परिस्थिती अशी आहे की 48 जागांपैकी 46 जागांवर 2 लाखांहून अधिक मते मिळू शकतात. उमेदवार दिल्यास आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. ज्यांना काळजी आहे त्यांनी काळजी करत रहावे. भाजपला आपण एकटेच टक्कर देऊ शकतो, याची खात्री आहे.'

'आम्ही एकत्र जाणार नाही, असं आम्ही म्हणत नाही. समस्या त्यांची आहे. त्यांच्या 15 जागांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू. आम्ही उमेदवारावर विसंबून नाही, आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून आहोत. मविआच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येणे ही त्यांची मजबुरी असल्याचे ते म्हणाले. आम्ही एकत्र येऊ असे दिसते. कोणासोबत जाणार की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. सध्या मी तिघांसोबत जाण्याचं ठरवलं आहे.'

    follow whatsapp