दिल्लीहून आला महत्त्वाचा निरोप अन् तारीखही ठरली; भाजप विधानपरिषदेवर कोणा-कोणाला पाठवणार?

मुंबई तक

28 Apr 2026 (अपडेटेड: 28 Apr 2026, 11:12 AM)

Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपची अंतिम यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates

Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्लीहून आला महत्त्वाचा निरोप अन् तारीखही ठरली

point

भाजप विधानपरिषदेवर कोणा-कोणाला पाठवणार?

Maharashtra bjp mlc candidate list delhi meeting updates  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात मोठी हालचाल सुरू असून, उमेदवारांची अंतिम यादी 30 एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. मुंबई वगळता राज्यातील उर्वरित पाच विभागांमधून सक्षम उमेदवारांना संधी देण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. सध्या विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत असून, पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पवित्रा घेतला असून ऐनवेळी नावे जाहीर करून धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या नावांच्या अंतिम निश्चितीसाठी दिल्लीत तळ ठोकून असून, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

हे वाचलं का?

दिल्लीहून आला 'यादी निम्मी करा' असा निरोप; आता 14 नावांवर होणार विचार

सुरुवातीला महाराष्ट्र भाजपकडून 6 जागांसाठी जवळपास 25 ते 30 नावांची मोठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती. मात्र, दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडून ही यादी निम्मी करून पुन्हा पाठवण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार आता 14 नावांची सुधारित यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावेळी संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा : 'भाजपचं जिल्हा उपाध्यक्ष व्हायचं असेल तर माझ्यासोबत चल..', जिल्हाध्यक्षाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा कयास असल्याने, यावेळी कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न दिल्ली स्तरावरून केला जात असून, यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे कशा प्रकारे बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 6 जागांसाठी होणाऱ्या या मुख्य निवडणुकीत विभागीय संतुलन राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. यादीत समाविष्ट असलेल्या नावांमध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नेत्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न कोअर कमिटीने केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत ठाण मांडून असल्याने, 30 तारखेला जाहीर होणाऱ्या यादीत नेमकं कोणाचं नाव झळकणार आणि कोणाला डावललं जाणार, याची चर्चा आता सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील राजकारणापर्यंत सुरू झाली आहे. या निवडीद्वारे भाजप आगामी निवडणुकांसाठी आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 

कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत?

माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?