Maharashtra Budget 2026 Live Updates : महाराष्ट्राचे दिवगंत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याच जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.6) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. ते कोणत्या घोषणा करतात..याच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
कृषी क्षेत्र : ‘अॅग्री स्टॅक’ योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत शेतकरी आयडी (Farmers ID) तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी शेतकरी आयडी आधीच तयार करण्यात आले आहेत.
‘नवीन औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा धोरण 2025’
महाराष्ट्राने ‘नवीन औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा धोरण 2025’ लाँच केले आहे. या धोरणाचा उद्देश महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवणे आणि 2047 पर्यंत राज्याच्या GDP मध्ये औद्योगिक क्षेत्राचा वाटा 30% पर्यंत वाढवणे हा आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार उच्च क्षमतेच्या मूल्य साखळ्या (High-capacity value chains) विकसित करणे, प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्लस्टर उभारणे आणि MSME क्षेत्राला समर्पित केंद्रे व आर्थिक मदतीद्वारे प्रोत्साहन देणे यावर भर देणार आहे. भारतामध्ये परकीय थेट गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या बळावर सरकार “Invest Maharashtra” हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. तसेच MSME आणि सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र संचालने (Directorates) स्थापन केली जाणार असून, या उपक्रमांमुळे सुमारे 5 कोटी थेट रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
CM Devendra Fadnavis सादर केली शायरी
'इरादा बबना लिया है ऊँची उड़ान का
तो देखना फिजूल है कद आस्मां का..!'
अजितदादांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
"माझं अंतःकरण जड झालं आहे. अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावामुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम राहिली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्यात येईल." - नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
- 21 हजार 867 कोटी रुपयांची जिल्हा वार्षिक निधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 हजार 708 कोटींनी अधिक तरतूद केली आहे
- राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी 8 हाय परफॉरमेंस केंद्र सुरू असून चार प्रशिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार आहे. राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारस्याचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे.
- नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सातारा येथे शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जतन करण्यात येईल
- नागपुरात महाराष्ट्र आरोग्यसंस्था उभारणार
- राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यात आणखी 75,000 हजार पदांची पदभरती
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार असून राज्यातील आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करणार
- राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पिक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर
- पुणे ते शिरुर उन्नत मार्गाला मंजुरी
- लातूर, बारामती इथं रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल
- मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार
- 1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल
- 2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे
- 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च
- यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे
- दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत
- 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल
- राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल
- राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील
- नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडोर विकसित केले जाईल.
- मुंबई ते नवी मुंबई विमानतळादरम्यान 22865 कोटींचा नवा मेट्रो मार्ग हाती घेणार - सातपाटीत आधुनिक मत्स्यबंदर उभारणार
- अटल सेतू महामार्गाजवळ तिसरी मुंबई विकसित केली जाईल तर, वाढवणजवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजन
- निवडक 50 पर्यटन स्थळी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल
- वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे
- राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल
- चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य करणार
- 5 ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहे, त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल
- शाश्वत विकासासाठी सक्षम प्राधिकरण स्थापन करणार
- वाहतूक केंद्रीच विकास व 100 टक्के डिजिटायझेशन करणार
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम 2027 पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल
- तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
- चौथी मुंबई वाढवण येथे होईल; एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
- नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
- यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या पायाभूत सुविधांवर भर
- पुण्यात नवीन 11 किलोमीटरच्या मेट्रोमार्गाला मंजूरी
- मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे
- 1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला
- 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे
- बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल
ADVERTISEMENT











