Maratha Reservation: 'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे घडतं आहे', सदावर्तेंचा हायकोर्टात खळबजनक दावा

Maratha Reservation High Court: राज्यात मराठा समाजाचा मुख्यमंत्री नाही म्हणून हे आंदोलन घडतं आहे असा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात केला आहे.

maratha reservation live this is happening because the chief minister is not a maratha gunaratna sadavarte sensational claim in the high court

Maratha Reservation

विद्या

• 04:10 PM • 01 Sep 2025

follow google news

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ज्याचा आज चौथा दिवस आहे. दुसरीकडे सरकारच्या पातळीवर याबाबत महत्वपूर्ण बैठका सुरू आहेत. या सगळ्या आंदोलनावरून हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अॅमी फाऊंडेशन आणि गुणरत्न सदावर्ते हे जरांगे-पांटलांच्या आंदोलनाविरोधात युक्तिवाद करत आहेत. याच युक्तिवादादरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबजनक असा दावा केला आहे.

हे वाचलं का?

युक्तिवादादरम्यान सदावर्ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री मराठा समाजाचे नाहीत आणि म्हणूनच हे घडत आहे. गेल्या वेळी त्यांना वाशी येथे थांबवण्यात आले होते. ते इथे येऊ शकले नव्हते.' असा दावा करत सदावर्तेंनी या आंदोलनाला राजकीय किनार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे. 

पाहा कोर्टात नेमका काय-काय युक्तिवाद झाले

  • जरांगेंचं आंदोलन,कोर्टात सुनावणी 
  • याचिकेवर कोर्टात तातडीची सुनावणी
  • हायकोर्टामध्ये आंदोलनाविरोधात याचिका
  • अॅमी फाऊंडेशनतर्फे करण्यात आली होती याचिका
  • हायकोर्टाने आंदोलनासंदर्भात सरकारला दिले होते निर्देश
  • सद्यस्थिती पाहता याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात धाव
  • हायकोर्टात सुनावणीला सुरुवात 
  • सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय - महाधिवक्ता 
  • जरांगेंच्या विरुद्ध अनेक याचिका - महाधिवक्ता 
  • दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय - महाधिवक्ता
  • जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थीचे उल्लंघन - सदावर्ते 
  • सामान्य मुंबईकर सुद्धा त्रासले आहेत - सदावर्ते 
  • मराठा आंदोलक आक्रमक होतायेत - सदावर्ते 
  • काही अटी घालून आंदोलन करायला सांगितले होते - सदावर्ते 
  • मात्र या अटी जुमानल्या जात नाहीयेत - सदावर्ते
  • हमीपत्र देताना अटींचे पालन करू असे सांगितले - महाधिवक्ता 
  • मात्र नंतर अजिबात पालन केले नाही - महाधिवक्ता 
  • उल्लंघन होतय तर नोटीस बजावली का ? - कोर्ट
  • ५ हजार लोकांना परवानगी दिली होती - महाधिवक्ता 
  • मात्र ५ हजारपेक्षा जास्त लोक आलेत - महाधिवक्ता 
  • गणेशोत्सव सुरू असताना आंदोलन सुरू - महाधिवक्ता 
  • गाड्या रोखणे, रस्ते अडवणे असे प्रकार होतायेत - महाधिवक्ता
  • शनिवार- रविवारचे आंदोलन विनापरवानगी- सरकारची माहिती 
  • परवानगी फक्त ६ वाजेपर्यंत होती - याचिकाकर्ते 
  • मात्र ६ नंतर मैदान खाली नाही केले - याचिकाकर्ते
  • ध्वनीक्षेपकाचा वापर विनापरवानगी- याचिकाकर्ते 
  • कोर्टाच्या आदेशाचे पालन केले गेले नाही - महाधिवक्ता
  • csmt संवेदनशील ठिकाण, तरीही आंदोलन - सदावर्ते 
  • CSMT परिसरात आवश्यक यंत्रणा ठप्प - सदावर्ते 
  • आमरण उपोषणाला पोलिस परवानगी देत नसतात - महाधिवक्ता 
  • आमरण उपोषण करणार नाही जरांगेंचे हमीपत्र- महाधिवक्ता 
  • तसे हमीपत्र जरांगेनी दिले होते - महाधिवक्ता
  • हमीपत्रावर जरांगेंची सही आहे - महाधिवक्ता
  • आझाद मैदानात तंबू बांधले जातायेत- महाधिवक्ता 
  • यावर तोडगा काय? कोर्टाचा सरकारला सवाल 
  • कोर्टाच्या आजूबाजूलाही आंदोलक आहेत - सदावर्ते 
  • पोलिस लोकांमध्ये समतोल राखतायेत- महाधिवक्ता
  • पोलिसांनी अजूनही बळाचा वापर केला नाहीये - महाधिवक्ता 
  • मुंबई पोलिसांची अर्धी यंत्रणा आंदोलनात व्यस्त- महाधिवक्ता 
  • पोलिसांवर जास्तीचा ताण येतो आहे - महाधिवक्ता
  • आंदोलनात राजकीय हस्तक्षेप होतोय - सदावर्ते 
  • पवार, ठाकरेंची माणसे धान्य पुरवत आहेत - सदावर्ते
  • काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली - सदावर्ते 
  • अंतरवालित महिला पोलीसला मारहाण केली - सदावर्ते
  • कोर्टाने निर्णय द्यावा, आम्ही कारवाई करू - महाअधिवक्ता 
  • लोक रस्त्यावर उतरले तुम्ही गप्प का राहिलात - कोर्ट 
  • तुम्ही रस्ते ताबडतोब खाली का नाही केले ? - कोर्ट 
  • आम्ही प्रयत्न केला होता - महाधिवक्ता
  • ते नियम पाळतील, असं आम्हाला वाटलं - महाधिवक्ता
  • मुंबईतील जनजीवन विस्कळणार अशी हमी दिल्या गेली – कोर्टा
  • सरकारने दुसरे मैदान द्यायला हवे होते – महाधिवक्ता
  • सरकार तुम्ही आहात तुम्हाला बघायचंय – कोर्ट
  • तुम्ही त्यांना नोटीस पाठवू शकत नाही का – कोर्ट
  • माझ्या याचिकेत तेच म्हटलंय – शाह
  • त्यांना इतरत्र मैदान द्यायला हवे – शाह
  • त्यांना यासंदर्भात पत्र देण्यात आले होते – महाधिवक्ता
  • त्यांनी वाचले आणि बाजूला ठेवले – महाधिवक्ता
  • ही स्थिती रोखली जाऊ शकते – सदावर्ते
  • आमरण उपोषणाला परवानगी नसताना सुरू केल्या गेलं – सदावर्ते
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता - सदावर्ते
  • मुख्यमंत्री मराठा समाजाचे नाहीत – सदावर्ते
  • त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे- सदावर्ते
  • मी तक्रार नोंदवायला तयार आहे – सदावर्ते
  • कोर्टाला सगळीकडून वेढा पडलेला आहे- सदावर्ते
  • कोर्टाने मराठा आंदोलकांकडून आलेल्या वकिलांना खडसावले
  • तुम्ही आझाद मैदानावर का नाही - कोर्ट
  • तुम्हाला कोर्टरुमची सुनावणी ऐकू येतेय का- कोर्ट
  • हे शांतेतत आंदोलन सुरूये असं तुम्हाला वाटतंय का- कोर्ट
  • शांतता कुठेय? सांगा तरी की शांतात कुठेय – कोर्ट
  • आम्हाला जनजीवन सुरळीत पाहिजे – कोर्ट
  • आम्हाला जरांगेंच्या तब्यतेची काळजी आहे – कोर्ट
  • तुम्हाला काहीच माहित नाही, असं तुम्ही दर्शवू शकत नाही – कोर्ट
  • लोक रस्त्यावर अंघोळ करतायत, स्वंयपाक करतायत – कोर्ट
  • रस्त्यांवर नैसर्गिक विधी पार पाडले जातायत – कोर्ट
  • आझाद मैदानावर चिखल आहे – वकील
  • तिथे कुणीही बसू शकत नाही - वकील
  • तुम्हाला काय काँक्रीटचे मैदान हवे होते – कोर्ट
  • तुम्हाला माहिती नव्हते का की सध्या पावसाळा आहे – कोर्ट
  • तरी तुम्ही आलात, संधी घेतली – कोर्ट
  • पावसाला सामोरे जाण्याचे तुम्ही ठरवले, तरी आलात – कोर्ट
  • तिकडे कबड्डी खेळली जातेय हे तुम्ही नाकारणार का - कोर्ट
  • लोकांना मुलभूत गरजा मिळायला हव्यात – कोर्ट
  • विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेज बुडायला नको – कोर्ट
  • आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचा पालं व्हावं – कोर्ट
  • सरकारची मागणी की कोर्टाने आदेश काढावेत - महाधिवक्ता
  • जरांगेंना सार्वजनिक कर्तव्याची जाणीव करून द्यावी - महाधिवक्ता
  • आंदोलनाला विरोध नाही पण नियमांच पालन व्हावं - कोर्ट
  • कोर्टाने जरागेंच्या वकिलाना विचारलं की तुम्ही आदेश पाळाल असं वचन देऊ शकता का
  • तुम्ही आदेश पाळून परत जाल हे शपथपत्र द्याल का ? कोर्टाचा जारंगेंच्या वकिलांना सवाल
  • तुम्ही आम्हाला आश्वासित करतायत का – कोर्ट
  • की आदेशांचे पालन केले जाईल – कोर्ट
  • तुम्ही प्रेसनोट काढू शकतात का – कोर्ट
  • जे इथे आलेले आहेत ते सगळे परत जातील – कोर्ट
  • गर्दी होऊ शकते आणि ती आमच्या नियंत्रणात नाही - पिंगळे
  • ब्रेब्रॉन स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियम देऊ शकतात का – पिंगळे
  • तुम्ही म्हणतायत की पाच हजार लोक परत जाणार नाही – कोर्ट
  • लोक आधीच आलेली आहेत – पिंगळे
  • मी स्टेडियमची नाही तर किमान स्टँड तरी द्यावे असे म्हणतोय - पिंगळे
  • आंदोलनकारी रस्त्यांवर आहेत – पिंगळे
  • पण त्यांना पर्याय उपलब्ध नाहीत – पिंगळे
  • मी याबाबतीत जरांगेंशी बोलेन, लोकांनी येऊ नये म्हणून – पिंगळे
  • पण पाच हजार लोकांना स्टेडियम स्टँड उपलब्ध केले जावे - पिंगळे
  • जरांगेंच्या वकिलांकडून कोर्टात युक्तिवाद
  • सार्वजनिक स्वच्छतागृहे आम्हाला उपलब्ध नव्हती – पिंगळे
  • लोकांनी मग तिथेच नैसर्गिक विधी करायला सुरूवात केली - पिंगळे
  • त्यानंतर आमच्यासाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली – पिंगळे
  • कोर्टाने आंदोलन थांबवावे असे आदेश द्यावेत - महाधिवक्ता 
  • नियमांचे पालन करताना कठोर व्हा- कोर्ट 
  • मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा - कोर्ट 
  • पोलिस हेल्पलेस करवाईचे आदेश द्या - सदावर्ते
  • नियमांचे पालन होत नाहीये हे स्पष्ट आहे - कोर्ट 
  • नियमांचे २ दिवसात पालन होईल ह्याची खात्री घेता का? - कोर्ट 
  • उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी घेऊ - कोर्ट 
  • उद्या ३ नंतर काय ते सुनावणीत ठरवू - कोर्ट
  • जरांगे आणि विरेंद्र पवार दोघांना नोटीस देऊ शकता का ? - कोर्ट 
  • शांततापूर्ण आंदोलन होईल अशी हमी देऊ शकता ? - कोर्ट 
  • कोर्टाची जरांगेंच्या वकिलांना विचारणा
  • ५ हजार पेक्षा जास्त आंदोलक नकोत - कोर्ट 
  • सकाळी ९ ते संध्याकाळी ६ आंदोलन व्हावे - कोर्ट 
  • उपोषण करण्याची परवानगी दिली नव्हती - कोर्ट 
  • आझाद मैदानात ५ हजार पेक्षा जास्त आंदोलक नकोत - कोर्ट 
  • जरांगेंचे वकील म्हणतायेत परवानगी दिली होती
  • नियमांचे पालन करण्यात आलेले नाही - कोर्ट 
  • नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे - कोर्ट 
  • जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाचा ठपका 
  • ज्या अटी घातल्या होत्या त्या पाळल्या नाहीत - कोर्ट
  • कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही - कोर्ट
  • आंदोलक रस्त्यावर कबड्डी खेळतायेत -कोर्ट
  • आंदोलक रस्त्यावर आंघोळ करतायेत - कोर्ट
  • जरांगेच्या आमरण उपोषणाची कोर्टाने घेतली गंभीर दखल
  • सरकारने कायदा सुव्यस्थेचा विचार करून पावले उचलावीत- कोर्ट
  • कोर्टाचा आंदोलनावर मोठा आदेश
  • जरांगेनी रस्त्यावर असणाऱ्या आंदोलकांना आझाद मैदानात येण्यास सांगावे - कोर्ट
  • उद्या ४ वाजण्याच्या आधी सगळ्यांनी आझाद मैदानात यावे - कोर्ट

    follow whatsapp