पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता सुसाट, ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा, किती कोटी खर्च होणार?

मुंबई तक

• 02:57 PM • 06 Mar 2026

Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्ग. या महामार्गामुळे आता पुणे ते संभाजीनगर हा प्रवास सुसाट होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी किती खर्च येणार आहे, जाणून घेऊया.

Maharashtra Budget 2026

Maharashtra Budget 2026

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता सुसाट

point

ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा

point

किती कोटी खर्च होणार?

Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्ग. या महामार्गामुळे आता पुणे ते संभाजीनगर हा प्रवास सुसाट होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी किती खर्च येणार आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Budget 2026 Live Updates : अजितदादांचं स्मारक उभारणार, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री भावूक

असा असेल ग्रीनफिल्ड महामार्ग

फडणवीसांनी शिरुर पुणे ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा केली आहे. हा महामार्ग 192 किलोमीटर लांबीचा असणार आहे. यासाठी 14 हजार 886कोटी रुपये किंमतीचा हा महामार्ग असणार आहे. सध्या या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे ते छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा असा उद्देश यामागे आहे.

यासोबतच पुणे ते शिरुर या 53 किमीच्या उन्नत मार्गासाठी 7 हजार 514कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच तळेगाव ते चाकण पर्यंतचा 25 किमीच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. चाकण ते शिक्रापूर पर्यंतच्या रस्त्याचेदेखील सहापदरीकरण होणार आहे.