शशिकांत चुयेकर यांनी सांगितली सतेज पाटील यांची विजयाची रणनीती

मुंबई तक

21 Oct 2026 (अपडेटेड: 21 Oct 2026, 09:47 AM)

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांची फौज पाठीशी असतानाही महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, तर सतेज पाटील यांच्या अचूक राजकीय धोरणाने हा विजय खेचून आणला.

Gokul Election

Gokul Election

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोकुळ निवडणूक 2026

point

महायुतीचा पराभव का झाला?

point

काय होती सतेज पाटील यांची रणनिती?

Gokul Election : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने महायुतीचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. तीन मंत्री, दोन खासदार आणि अनेक आमदारांची फौज पाठीशी असतानाही महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, तर सतेज पाटील यांच्या अचूक राजकीय धोरणाने हा विजय खेचून आणला.

हे वाचलं का?

महायुतीचा दावा फोल

निवडणुकीच्या सुरुवातीलाच समविचारी आघाडीने पारदर्शक भूमिका घेत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपले विचार पोहोचवले. महायुतीकडून 25-0 असा दावा करत विजयाचे दावे केले जात असले, तरी सहकारात पक्षीय राजकारण चालत नाही हे सुजाण मतदारांनी दाखवून दिले. गावागावांतून आणि विविध पक्षांतील ठरावधारकांनी पक्षीय भेद बाजूला सारून समविचार आघाडीला भरघोस मतदान केले, ज्यामुळे महायुतीचा हा दावा फोल ठरला.

हे ही वाचा : Maharashtra Weather : हवामानाचा लपंडाव, कधी पाऊस, तर कधी कोरडं हवामान; IMD चा अलर्ट

शशिकांत चुयेकर यांचा मोठा विजय

मागील निवडणुकीत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाची आणि राजकारणाची जाणीव ठेवून मतदारांनी यावेळी शशिकांत चुयेकर यांना मोठा विजय मिळवून दिला. विरोधकांकडून झालेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे स्वाभिमानी दूध उत्पादक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी जाणीवपूर्वक महायुतीविरोधात कौल दिला. हा सर्व विजय सामान्य दूध उत्पादक शेतकरी आणि चुयेकर यांच्या विचारांना समर्पित असल्याचे नवनिर्वाचित विजयी उमेदवाराने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : Personal Finance: सोनं न विकताही करता येईल कमाई, नेमकी कोणती आहे गुंतवणूक?

सतेज पाटली यांचे खंबीर नेतृत्त्व

मागील निवडणुकीत ऐनवेळी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे चेअरमनपदाची संधी हुकली असली, तरी आता परमेश्वराच्या न्यायाने आणि सतेज पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे न्याय मिळाल्याची भावना शशिकांत चुयेकर यांनी व्यक्त केली. हा संघ दूध उत्पादकांच्या मालकीचा ठेवून त्यांच्या हितासाठी आणि संस्थापक चुयेकर यांच्या विचाराने संघ अत्यंत पारदर्शकपणे चालवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.