Ladki Bahin Yojana : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. ही योजना अशीच सुरु राहणार असून यासाठी योग्य ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. लाडकी बहिण योजनेविषयी फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
लाडक्या बहिणींसाठी भरीव तरतूद
फडणवीस म्हणाले की, 'येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. '
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर विरोधकांनी समोरून काही टिप्पणी केली. ज्यावर फडणवीस म्हणाले की, 'काळजी करू नका.. तुमच्या मनातील एक-एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार.. फक्त कोर्टात जाऊ नका. योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका.'
हे ही वाचा : पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता सुसाट, ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा, किती कोटी खर्च होणार?
'लखपती दिदी'बद्दलही फडणवीसांची मोठी घोषणा
लखपती दीदींविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एक महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल. महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानातंर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे.'
ADVERTISEMENT











