मिसिंग लिंकवर वाहतूक नियम मोडला तर.., फडणवीसांचा इशारा, पण 'त्या' लोकांची मागितली माफी

Devendra Fadnavis on missing link : मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..

Devendra Fadnavis on missing link

Devendra Fadnavis on missing link

मुंबई तक

01 May 2026 (अपडेटेड: 01 May 2026, 04:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मिसिंग लिंकवर वाहतूक नियम मोडला तर..

point

फडणवीसांचा इशारा, पण 'त्या' लोकांची मागितली माफी

Devendra Fadnavis on missing link  : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पाला आलेला खर्च, त्यासाठी कोणी कोणी यासाठी मेहनत घेतली आणि या मिसिंग लिंकवर वाहतूक कोंडी झाल्यास कोणती कारवाई होणार? या संदर्भात प्रकल्पाचे लोकार्पण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलंय. ते काय म्हणाले जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

फडणवीसांनी कोणाची मागितली माफी, कोणाला दिला इशारा? 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांची मला माफी मागायची आहे. त्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. सुप्रिया सुळे देखील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. मी सुप्रियाताईंना सांगतो, तुम्ही लास्ट टाईममध्ये या ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. आता मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध आहे. मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात अनेकांनी काम केलं. त्यांचंही अभिनंदन करतो. ज्या मजूरांनी या प्रकल्पासाठी काम केलं, त्यांना मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो..सात देशांच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी आणि इन्सिट्युशन्सनी सहभाग घेतला. हवा खेळती राहण्यासाठी बोगद्यामध्ये व्हेंटीलेशनची सोय करण्यात आली आहे. जो मिसिंग लिंकचे वाहतूक नियम पाळणार नाही, त्याला घरात मोठं चलान मिळेल. हे त्याला भरावं लागेल.

हेही वाचा : Govt Jobs : ITI उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कामाची संधी, 'असा' करा अर्ज

मिसिंग लिंकसाठी पैसा कसा मॅनेज केला? 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये काय फरक आहे? हे मला आपल्याला सांगायचं आहे. मिसिंग लिंकची संकल्पना 2010 साली तयार झाली. त्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले. त्याचा एक रिपोर्ट तयार झाला. 2014 साली तत्कालीन सरकारने हा प्रकल्प का होऊ शकत नाही? याची अनेक कारणं दिली. फाईल बंद केली. लोणावळा तलावाच्या खालून हा प्रकल्प जातोय, त्यामुळे मिसिंग लिंक करता येत नाही, असं कारण देखील त्यांनी दिलं होतं. 13 कारणं देऊन हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांनी बंद केला. डिसेंबर 2015 ला जुन्या सरकारचा निर्णय आम्ही बदलला आणि मिसिंग लिंक करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठून? हा देखील प्रश्न होता. त्यावेळी मी सांगितलं की, हा सेल्फ फायनान्स केला पाहिजे. याची सर्व इक्विटी आपल्याला मुंबई-पुणे दरम्यानच्या टोलमधून मिळू शकते. त्याच पद्धतीने आपण याचं काम केलं. हे इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. याच डिझाईन करायला तीन वर्ष लागले. 

आपल्या इथं निसर्ग चक्री वादळाने मोठं नुकसान केलं होतं. त्याचा वेग तासी 130 ते 1500 किमी होता. आपण तयार केलेला पूल  240 किमी. प्रति तास वाऱ्याला थोपवू शकतो. प्रति सेकंद 70 मीटर वाऱ्याचा वेग असला तरी त्याला काहीही होणार नाही. हा पूल इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण या पूलाच्या उभारणीच्या प्रक्रियेत भारतासह सात देश होते. याचं प्राथमिक डिझाईन कॅनडामध्ये तयार झालं. फोर्स टेक्नॉलॉजी डेनमार्कमध्ये तयार झाली. केबल्सच्या चाचण्या या ऑस्ट्रियातील विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं उत्पादन मलेशियातील कंपनीने केलं. रस्त्याच्या बाजूचे कठडे हे ऑस्ट्रिया आणि आपल्या भारतातील गोदरेज यांनी संयुक्तपणे केलं. याची अग्निशामन चाचणी स्पेनमध्ये केली. पूलाचे आरेखन तैवानच्या कंपनीने केलं. वेरिफिकेशन कंसल्टंट ऑस्ट्रियाचे होते. केबल एक्सपर्ट सिंगापूरचे होते, असंही फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई पुणे प्रवासादरम्यानचं अर्ध्या तासाचं अंतर कमी 

आम्ही जे स्वप्न पुणे- मुंबई आणि मुंबई -पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाहिले होते, त्याचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण याला सुरुवात केली नव्हती, तेव्हा ती मिसिंग लिंक होती. त्यामुळे आता नाव बदललं पाहिजे, त्याला कनेक्टिंग लिंक नाव द्या.. आम्ही सगळे मिळून त्याला काय नाव द्यायचं? हे देखील ठरवणार आहोत. पण आता यामध्ये मिसिंग आता काही नाहीये. मी MSRDC मनापासून अभिनंदन करतो. हा अतिशय आयकॉनिक प्रकल्प तयार झाला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मिसिंग लिंकमधील टनेलला वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेलचा दर्जा दिला आहे. आपण जागतिक विक्रम तयार केला आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई -पुणे यामधील 6 किलोमीटर अंतर आणि अर्धा तासाचा वेळ कमी होणार आहे. आपण मिसिंग लिंकच्या ज्या पुलावरुन आलो, त्याची उंची 182 मीटर आहे. दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे रोज कोट्यावधी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदुषण कमी होणार आहे. लोकांचा वेळ देखील वाचणार आहे, असंही फडणवीस यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'वडिलांचे अंत्यसंस्कार झाले , तिथेच आमचे..'; नागपुरात माय-लेकीचं टोकाचं पाऊल, पोलिसांना वेगळाच संशय