ममता दीदींची सत्ता तळ्यात-मळ्यात?, धक्का देणारे Exit Poll चे आकडे समोर

West Bengal Election Exit Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 पार पडली, पश्चिम बंगाल हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सध्याचे काही एग्जिट पोलचे अंदाज पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवलेली आहे, पण यावर आताच भाष्य करणं योग्य नाही.

West Bengal Election Exit Poll

West Bengal Election Exit Poll

मुंबई तक

30 Apr 2026 (अपडेटेड: 30 Apr 2026, 09:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 एग्जिट पोल

point

एक्जिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? 

West Bengal Election Exit Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 पार पडली, पश्चिम बंगाल हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सध्याचे काही एग्जिट पोलचे अंदाज पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवलेली आहे, पण यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीत 91 टक्के नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट केली. पण, आता निवडणुकीनंतर निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच एग्झिट पोलने वर्तवेले अंदाज हे आश्चर्यकारक आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, ठाकरेंच्या उमेदवाराबाबत केली मोठी घोषणा

एक्जिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? 

टूडे चाणक्या एग्जिट पोल

टूडे चाणक्या या एग्जिट पोलने पश्चिम बंगाल निवडणूक 2026 च्या निकालाचा अंदाज वर्तवला. भाजप सर्वाधिक 192 जागांवर विजय मिळवू शकतो असा अंदाज आहे, तर तृणमूल काँग्रेस हा पक्ष 100 जागांवर विजय मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अन्य 2 जागा, असा टूडे चाणक्या या एग्जिट पोलचा अंदाज आहे. 

 JVC एग्जिट पोल

याच पश्चिम बंगालमध्ये JVC या एग्जिट पोलने तृणमूल काँग्रेसला 131-152 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला. तसेच भाजपला 138 - 159 जागांवर विजय मिळेल, असा JVC या एग्जिट पोलने अंदाज वर्तवला. तसेच काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा एग्जिट पोलचा अंदाज आहे. 

P-MARQ एग्जिट पोल

P-MARQ एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस पक्षाला 118-138 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर भाजप 150-175 जागांवर विजय मिळवेल, काँग्रेस पक्षाला भोपळा फोडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 

Matrize एग्जिट पोल

Matrize एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस पक्षाला 125 ते 140 जागांवर विजय मिळवता येईल. भाजप 146-161 जागांवर विजयी होईल असा Matrize एग्जिट पोलने अंदाज वर्तवलाय, तर काँग्रेसला भोपळा देखील फोडता येणार नाही.  

Peoples Pulse एग्जिट पोल

Peoples Pulse एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस 177-187 जागांवर विजय मिळवेल. भाजप 95 ते 110 जागांवर विजय होईल असा अंदाज आहे, काँग्रेस 1 ते 3 जागांवर विजय मिळवू शकते. 

Chanakya Strategies एग्जिट पोल

Chanakya Strategies एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस 130 ते 140 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवला आहे, तर दुसरीकडे भाजप 150-160 जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज Chanakya Strategies एग्जिट पोलने वर्तवलेला आहे. 

Poll Diary एग्जिट पोल

Poll Diary एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस केवळ 99 ते 127 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवत आहे, तर भाजप सर्वाधिक 142-171 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवत आहे, तर काँग्रेस 3-5 जागांवर अडून राहील असा अंदाज आहे. 

हे ही वाचा :  भाजप नेत्याचं कांड, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण, कुटुंबीयांनी देखील.. लाज आणणारी घटना

Janmat Polls एग्जिट पोल

Janmat Polls ने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विजयी होईल असा अंदाज वर्तवला, जिथे तृणमूल काँग्रेसला 195-205 जागांवर विजय मिळेल. तर भाजप 80-90 जागांवर विजय मिळवेल, काँग्रेस 1 ते 3 जागांवर विजय मिळवेल असा Janmat Polls एग्जिट पोलचा अंदाज आहे. 

थोडक्यात काय तर वरील एग्जिट पोलनुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे, पण यावर आताच भाष्य करता येणार नसून 4 मे 2026 रोजी स्पष्ट होईल, तसेच ही लढत अतितटीची होती हे देखील तितकंच खरं आहे.