Mock Drills in Maharashtra : देशातील 259 ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये संवेदनशीलतेच्या दृष्टीने कॅटेगरी 1,2,3 अशी विभागणी करण्यात आली आहे. कॅटेगिरी-1 मध्ये देशातली 13 शहरं आहेत. ज्यामध्ये 3 शहरं महाराष्ट्रातले आहेत. तर एकूण यादीमध्ये महाराष्ट्रातले 16 ठिकाणं आहेत.
ADVERTISEMENT
गृह मंत्रालयाच्या सूचना काय?
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते, हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन कधी आणि कसा वाजेल, याबद्दल एक मॉक ड्रिल असणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यासाठी सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> "तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?
महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणी मॉक ड्रिल होणार?
कॅटेगिरी 1
1. मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे वेगवेगळ्या अंगानी महत्वाचं शहर आहे. मुंबईजवळ ट्रॉम्बे अणूअर्जा प्रकल्प आहेत, मालाडमध्ये Combined Defence Station आहे. तसंच अपोलो बंदर, कोस्ट गार्ड हेडक्वाटर, नेव्हीचे लढाऊ जहाज, डॉकयार्ड आहेत. BSE, RBI आणि BKC सारखी महत्वाची कार्यालयं आहेत.
2. उरण : नेव्ही बेस आहे. तसंच जेएनपीटी जे संवेदनशील भाग आहेत.
3. तारापूर : अणूउर्जा क्षेत्र
कॅटेगिरी 2
1.ठाणे : एअर फोर्स स्टेशन
2. पुणे : खडकी - अम्युनेशन फॅक्टरी, लोहगाव एअरपोर्ट – सुखोई बेस, सदन कमांड (द. मुख्यालय आर्मीच) NDA अशी अनेक महत्वाची केंद्र आहेत.
3. नाशिक : नाशिकमध्ये सैन्याचं तळ आहे.
4. सिन्नर
5. मनमाड
6. पिंपरी चिंचवड : इथेही सैन्याचा मोठा कॅम्प आहे.
हे ही वाचा >> पास झाला, पण मार्क कमी मिळाले... जळगावच्या ऋषिकेशने स्वत:ला संपवलं, आईनं खोलीत काय पाहिलं?
कॅटेगिरी - 3
1. औरंगाबाद - सैन्याची छावणी
2. भुसावळ – शस्त्रांची फॅक्टरी
3. रायगड - समुद्र किनारी भाग
4. रत्नागिरी - समुद्र किनारी भाग
5. सिंधुदुर्ग - समुद्र किनारी भाग
6. थळ वायशेत, रायगड
7. नागोठाणे
मॉक ड्रिल दरम्यान काय होणार?
- हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनच्या संचालनाची सूचना.
- हल्ल्याच्या दरम्यान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षिततेच्या प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण दिलं जाईल.
- गरज पडल्यास वीज बंद करता यावी यासाठी क्रॅश ब्लॅक आऊट उपायांचं प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून शत्रूला लक्ष्य गाठता येऊ नये.
- महत्त्वाचे कारखाने, कार्यालये आणि ठिकाणे लपवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल.
- परिस्थिती बिघडल्यास ठिकाण कसं सोडायचं याचा सराव करण्यात येईल.
ADVERTISEMENT
