Aparna Mahadik: अपघात झाला त्याच Air India विमानात होत्या सुनील तटकरेंच्या नातेवाईक, अपर्णा महाडिक कोण आहेत?

मुंबई तक

• 07:49 PM • 12 Jun 2025

एअर इंडियाच्या ज्या AI171 विमानाचा अपघात झाला त्यामध्ये क्रू मेंबर म्हणून अपर्णा महाडिक या प्रवास करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत.

अपर्णा महाडिक कोण आहेत?

अपर्णा महाडिक कोण आहेत?

Google CTA

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये गुरुवारी (12 जून) एक भीषण विमान अपघात झाला. याच विमानात सीनियर क्रू मेंबर म्हणून अपर्णा महाडिक या कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. 

हे वाचलं का?

कोण आहेत अपर्णा महाडिक?

अपर्णा महाडिक या एअर इंडिया फ्लाइट AI171 मधील वरिष्ठ केबिन क्रू मेंबर आहेत. ज्या 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात होत्या. अहमदाबादहून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांतच या विमानाचा अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

दरम्यान, याच विमानात क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी, म्हणजेच अमोल महाडिक यांच्या पत्नी आहेत. 

अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी आहेत. अमोल हे स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. काही तासांपूर्वी ते दिल्लीत लँड झाले. दरम्यान, या अपघाताचं वृत्त समजताच ते अहमदाबादला रवाना झाले आहेत. 

200 हून अधिक मृतदेह हाती

अपर्णा यांच्यासह इतर केबिन क्रू मेंबर्समध्ये श्रद्धा धवन, सायनिता चक्रवर्ती, मधुरा पाटील, मनीषा थापा, रोशनी राजेंद्र सोंगारे, नगंथोई शर्मा कोंगब्रायलटपम, दीपक पाठक, इरफान शेख आणि लम्नुंथेम सिंगसोन यांचा समावेश होता. या विमान अपघाताचं वृत्त समजताच महाडिक आणि तटकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

या दुर्घटनेत 204 मृतदेह सापडले आहेत, तर 41 जण जखमी झाले असल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते.