मुंढवा जमीन घोटाळा, पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? हायकोर्टानं काय सांगितलं?

मुंबई तक

09 Sep 2026 (अपडेटेड: 09 Sep 2026, 08:29 PM)

Parth Pawar Mundhwa Land Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्यावर अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना आरोपी करण्याची मागणी सूर्यकांत गुलाबराव यांनी केली होती. त्यांच्याच याचिकेच्या मागणीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे निर्देश आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. 

Parth Pawar Mundhwa Land Scam

Parth Pawar Mundhwa Land Scam

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशात काय? 

point

न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने केलेले निरीक्षण

Parth Pawar Mundhwa Land Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्यावर अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना आरोपी करण्याची मागणी सूर्यकांत गुलाबराव यांनी केली होती. त्यांच्याच याचिकेच्या मागणीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे निर्देश आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नेते ते अभिनेते.. AI च्या 'या' ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड, कसे बनवाल 80s च्या हिरो-हिरोईनसारखे फोटो?

न्यायालयाच्या आदेशात काय? 

'मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी' या कंपनीच्या जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोन संचालक आहेत. अशातच दिग्विजय पाटील यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असले तरीही, पार्थ पवार यांना अद्यापही आरोपी करण्यात आले नाही, कारण ते प्रभावशाली असून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत', असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने केलेले निरीक्षण

दरम्यान, न्यायमू्र्ती माधव जमादार यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची दखल घेतली होती, अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेल्या 40 एकर जमिनीच्या प्रकरणात कंपनीचे विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोन संचालक आहेत, असे खंडपीठाने निरीक्षण केले. पार्थ पवार हे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव आहेत. 

पुण्यातील बडतर्फ करण्यात आलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर या खंडपीठाने सुनावणी केली होती, पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणात दिलासा मिळवण्यासाठी येवले यांनी हा अर्ज केला होता, त्यांची बाजू वकील हर्षद व्ही. निंबाळकर, सत्यम निंबाळकर आणि अभिषेक आरोटे यांनी मांडली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. येवले यांना दिलासा देत, खंडपीठाने निर्देश दिले असले तरीही त्यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये, असे सांगितले. 

हे ही वाचा : अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला अन् आज 'या' महानगरपालिकेत तुफान राजकीय राडा

दरम्यान कथितरीत्या पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या 'अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी' या कंपनीला केवळ 300 कोटी रुपयांना विकण्यात आले. या जमिनीचा बाजारभाव हा 1,800 कोटी रुपयांइतका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. या प्रकरणातील आणखी एक आरोपी शीतल तेजवानी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना, खंडपीठाने तोच प्रश्न विचारला होता.