Parth Pawar on VSR plane travel : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाले, त्याच कंपनीच्या विमानाने पार्थ पवारांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, खासदार शरद पवारासोबत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी या विमानाचा वापर केला.
ADVERTISEMENT
एकीकडे आमदार रोहित पवारांनी या VSR कंपनीवर गंभीर आरोप केले असताना आणि खुद्द जय पवारांनी कारवाईची मागणी केलेली असताना, पार्थ पवारांनी घेतलेल्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता पार्थ पवारांनी 'X' (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? 'त्या' संपूर्ण कुटुंबाचा नेमका कसा झाला अंत?
पार्थ पवारांचे ट्वीट जसेच्या तसे
मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती.
ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? 'त्या' संपूर्ण कुटुंबाचा नेमका कसा झाला अंत?
ADVERTISEMENT











