pradeep purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू यशवंत पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरच्या रात्री हत्या झाली. पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तसेच त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. या प्रकरणात सुरुवातीला पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी पप्या शिंदे हा हल्ल्याच्या वेळी पूर्णेकर यांच्या कार्यालयातच उपस्थित होता. दरम्यान, आज या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बनावट नावाने ओयो रुम घेतली अन् मध्यरात्री साधला डाव, महिला बँक कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?
पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना संपूर्ण घटनाक्रम सांगितला
ठाणे गुन्हे शाखेने दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आरोपींनी हत्येच्या वेळी वापरलेल्या बाईकही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
हेही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवणार - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पोहोचताच कार्यकर्त्यांनी ‘बाळू दादाला न्याय द्या’ अशा घोषणा दिल्या. यावेळी पूर्णेकर यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवणार.. सर्वांनी मिळून गुन्हेगारांना फासावर लटकवण्याचं काम करू. त्याशिवाय शांत बसणार नाही", असा शब्दा उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांना दिला.
"आम्ही सगळे पूर्ण ताकदीने पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, हा विश्वास देण्यासाठीच आम्ही त्यांची भेट घेतली. जो तुमच्यासोबत उभा होता, त्याच्या कुटुंबीयांच्या सोबत उभे राहा", असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जमलेल्या लोकांना केलं.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या हत्येवरून प्रतिक्रिया दिली. “सुसंस्कृत ठाण्याची अवस्था बीडपेक्षा वाईट झालीये. भाजपचे ठाण्याचे सुसंस्कृत पुढारी संजय केळकर यांनी आवाज उठवावा. ठाण्यातील भाजपच्या उपमहापौरांनाही आमच्याप्रमाणे संशय आहे. मीनाक्षी शिंदेंवर राम पूर्णेकरांनी पुरावे दाखवून आरोप केलेले आहेत. पूर्णेकरांच्या हत्येमागे 100 टक्के स्थानिक राजकीय गट आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT












