Rahul Gandhi On Delimitation : लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याच्या संभाव्य प्रस्तावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा लोकशाहीसाठी एक मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : INDIA आघाडीची बैठक संपली! डिलिमिटेशनबाबत खर्गेंचा मोठा दावा; राहुल गांधी 5 वाजता काय बोलणार?
जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याची काय गरज आहे?
महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, "महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी सध्याच्या 546 लोकसभा जागांवर केली जाऊ शकते. मग, जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याची काय गरज आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय केवळ राज्यांमध्ये जागांच्या वाटपापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट करत राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, 850 जागांच्या प्रस्तावामुळे भाजपला आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार देशाचा निवडणूक नकाशा आपल्या बाजूने बदलण्याची संधी मिळेल.
काँग्रेसकडन कडाडून विरोध
सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रणालीवर नियंत्रण मिळवण्याचा, काही ठराविक उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याचा आणि पर्यायाने लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रस्तावाला काँग्रेसकडून कडाडून विरोध केला जाईल, तसेच या मुद्द्यावर इतर विरोधी पक्षांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : कोल्हापूर: भरधाव वेगानं आलेल्या कारनं सख्ख्य़ा भावांना उडवलं अन्..
तसेच पत्रकारपरिषदेदरम्यान त्यांना एका पत्रकाराने महिला आरक्षणाबाबत विचारले असता, राहुल गांधी म्हणाले की, महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच, पण ते विधेयक पूर्वीच आणलं गेलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, 850 मतदारसंघ निर्माण झाल्यास देशाची लोकशाही आणि संविधान नक्कीच धोक्यात येईल. याचा जेन झींना सामना करावा लागेल.
ADVERTISEMENT












