प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्याने सुवेंदू बनले 'अधिकारी'?

अजित बायस

26 Nov 2026 (अपडेटेड: 26 Nov 2026, 03:07 PM)

ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाच सल्ला होता, असे अधिकारी यांनी कोलकाता येथे आयोजित इकॉनॉमिक टाईम्सच्या बंगाल शिखर संमेलात बोलताना सांगितले.

Suvendu adhikari claims that pranab mukherjee advised him to join bjp

सुवेंदू अधिकारी

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"तुला कर्मचारी राहायचंय की स्वतःच्या ताकदीवर पुढे जायचंय?"

point

तृणमूल काँग्रेस म्हणजे खासगी कंपनी!

कोलकाता: आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात मोठी भूमिका बजावणाऱ्या एका दिग्गज नेत्याने देशाचे राष्ट्रपती असताना तृणमूल काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जाण्याचा सल्ला दिला असेल, यावर कोणाचा विश्वास बसेल का?  मात्र, असाच दावा करून भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी एकच खळबळ उडवून दिलीये. आपल्याला 2020 मध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला प्रणव मुखर्जी यांनीच दिला होता, असा गौप्यस्फोट अधिकारी यांनी केलाय. 

हे वाचलं का?

"तुला कर्मचारी राहायचंय की स्वतःच्या ताकदीवर पुढे जायचंय?"

ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचाच सल्ला होता, असे अधिकारी यांनी कोलकाता येथे आयोजित इकॉनॉमिक टाईम्सच्या बंगाल शिखर संमेलात बोलताना सांगितले.

हे ही वाचा>> ओवैसी, आजम खान का भिडलेत? युपीतला मुस्लीम कुणाच्या बाजूने?

अधिकारी यांनी प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख आपले 'मूळ सल्लागार' आणि 'पालक' असा केलाय. अधिकारी यांनी सांगितलं की, "प्रणबदा म्हणाले की तुला काय करायचंय याचा नीट विचार कर. जर  कर्मचारीच राहायचं असेल, तृणमूलमध्येच रहा आणि जर स्वतःच्या बळावर राजकीय कारकीर्द घडवायची असेल तर मोदीजींसोबत जा."

तारीख सांगण्यास नकार; म्हणाले, "वाद नको"

प्रणव मुखर्जींसोबतची ही चर्चा नेमकी कधी झाली, असा प्रश्न विचारला असता अधिकारी यांनी अधिक तपशील देणं टाळलं. "मी याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही. ते आता आपल्यात नाहीत. यावरून विनाकारण वाद निर्माण होऊ शकतो," असं म्हणत त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन प्रत्येक भारतीय प्रणव मुखर्जींचा आदर करतो, अशी भावना व्यक्त केली.

तृणमूल काँग्रेस म्हणजे खासगी कंपनी!

अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरही जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करतते म्हणाले की, तृणमूल हा पक्ष एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे आहे. खासगी कंपनीमध्ये ज्याप्रमाणे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असतो, तशीच काहीशी गत तृणमूलची आहे. मीही तिथे होतो, पण मला कर्मचारी बनून राहायचं नव्हतं, म्हणून मी बाहेर पडलो," असं अधिकारींनी स्पष्ट केलं.

माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांचे काँग्रेसच्या वरिष्ट नेतृत्वाशी बिघडलेल्या संबंधांची चर्चा या ना त्या नेहमीच होत असते. नुकत्याच सोनिया गांधी यांच्या आत्मचारित्राच्या निमित्ताने देखील हा मुद्दा चर्चेत आला होता. प्रणव मुखर्जी यांनी 2010 मध्ये पक्षात नेतृत्व बदलाचे सुतोवाच करत पंतप्रधान बनण्याचा मनोदय व्यक्त केल्याने आपल्याला धक्का बसल्याचा दावा सोनिया गांधी यांनी केला होता. 

हे ही वाचा>> पश्चिम बंगालचं नाव बदलणार; 'हे' असेल नवे नाव!

सोनिया गांधी यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी, "यात धक्का बसण्यासारखे काय? प्रणव मुखर्जी  यांनी राजकीय आयुष्यात जे काही मिळवलं, ते मेहनतीच्या जोरावर मिळवलं, त्यांच्यावर घरणेशाहीचा वरदहस्त नव्हता" असा पलटवार केला होता. आता सुवेंदू अधिकारी यांच्या या दाव्यानंतर देखील अनेकांच्या भुवया उंचावल्यात .