मॉस्को (रशिया): रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये India Today / आज तकला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. ही मुलाखत इंडिया टुडेच्या परराष्ट्र व्यवहार संपादक गीता मोहन आणि सीनियर मॅनेजिंग एडिटर अंजना ओम कश्यप यांनी घेतली. या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पुतिन यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आवर्जून केला आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर भविष्यात दूरगामी परिणाम होऊ शकतो. वाचा पुतिन यांची हीच मुलाखत मराठीमध्ये.
ADVERTISEMENT
व्लादिमीर पुतिन यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत जशीच्या तशी...
अंजना: आपल्या सर्वांना नमस्कार आणि मनःपूर्वक स्वागत. आपण इंडिया टुडे आणि आज तक पाहत आहात, आणि मी आहे अंजना ओम कश्यप. आज आपण क्रेमलिनमध्ये उपस्थित आहोत. आणि आज आपण इतिहास घडताना पाहणार आहोत — एक अत्यंत ऐतिहासिक क्षण. म्हटलं जातं की जेव्हा दोन जुने मित्र भेटतात, तेव्हा त्यांच्यात काही खाजगी गप्पा असतात, खूप सारे हास्य-विनोद असतत आणि एक अनोखी मैत्रीची ऊब असते, जी पाहून खोलीत उपस्थित इतर लोकांना थोडंसं अस्वस्थही वाटू शकतं. आणि मी आज हे का म्हणत आहे? कारण जेव्हा रशियन फेडरेशनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींना भेटतील, तेव्हा संपूर्ण जग त्यांच्याकडे अत्यंत जवळून पाहत असेल. व्लादिमीर पुतिन निःसंशयपणे जगातील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांचे निर्णय फक्त रशियाच नाही तर जगातील अनेक देशांवर परिणाम करतात. ते जागतिक मंचावर एक अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय व्यक्तिमत्व आहेत. आणि खरं सांगायचं तर यापेक्षा अधिक रोमांचक काही असूच शकत नाही.
गीता: अगदी बरोबर म्हटलंत अंजना. नमस्कार आणि स्वागत आहे. मी गीता मोहन. आज आपल्या सोबत आहेत जगातील सर्वात जास्त काळ सेवा देणाऱ्या नेत्यांपैकी एक. एक असे व्यक्तिमत्त्व, ज्यांनी सर्व काही पाहिलं आहे. युद्धांपासून ते जागतिक आर्थिक मंदीपर्यंत, देशांच्या विघटनापासून ते बदललेल्या जागतिक व्यवस्थेपर्यंत. बोरिस येल्त्सिनपासून डोनाल्ड ट्रंपपर्यंत आणि अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह ते नरेंद्र मोदींपर्यंत त्यांनी जगाला आपल्या डोळ्यांसमोर बदलताना पाहिलं आहे. त्यांनी रशियाला अत्यंत कठीण आणि उलथापालथीच्या काळातून बाहेर काढलं आहे आणि तरीही आज आपल्या नेतृत्वक्षमतेने अशी ओळख निर्माण केली आहे, जी जग दुर्लक्षित करू शकत नाही. मिस्टर प्रेसिडेंट, आमच्यासोबत जोडल्याबद्दल आपले खूप-खूप आभार. आपण पाहत आहात इंडिया टुडे आणि आज तकसोबत रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची ही खास मुलाखत.
अंजना: आमच्या नेटवर्कशी जोडल्याबद्दल आपले खूप-खूप आभार, सर. आपण कसे आहात?
पुतिन: मी आशा करतो की तुम्हाला रशिया, मॉस्को आणि क्रेमलिन—जिथे आम्ही काम करतो—इथे येऊन चांगलं वाटलं असेल. तुम्ही पाहू शकता की इथं सर्व काही सुरळीत चाललं आहे. एकूणच आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की माझी भेट माझे मित्र पंतप्रधान मोदींशी होणार आहे. भारतातील या भेटीसंदर्भात मी खूप आधीच सहमती व्यक्त केली होती. आमच्याकडे चर्चा करण्यासारखं खूप काही आहे, कारण भारतासोबत आमच्या व्यापक सहकार्याचा विस्तार खूप मोठा आहे. मी इथे आपल्या संबंधांच्या इतिहासाबद्दल तर बोलतच नाही आहे, कारण आपल्या नात्यांचा इतिहास खरोखरच अनोखा आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने जो रस्ता निवडलाय.. 77 वर्षं झालीत, तसं इतिहासाच्यादृष्टीने छोटासा काळ आहे.. पण भारताने या काळात फार मोठी प्रगती केली. मी याविषयी आणखी बोलेनच पण वर्तमानात आम्ही स्वतःला जेव्हा पाहतो तेव्हा इतका बदल नजरेस पडत नाही. पण जेव्हा मागे वळून भगतो, तेव्हा हे चमत्कारापेक्षा कमी नाही असं लक्षात येतं. हे फार कमी लोकांना माहित असेल की भारतात लोकांचे सरासरी वय 77 वर्षांत दुप्पट झालंय. आम्ही यावर बोलूतच पण भारतासोबतच आमचे संबध नवे लक्ष गाठतंय हे खरं आहे. माझे मित्र प्रधानमंत्री मोदी यांच्या भेटीचा योग येतोय, याचा आनंद आहे. फक्त व्यापार, आर्थिक संबधंच नव्हे तर वैयक्तिक भेट ही महत्त्वाची आहे.
अंजना: आपण आत्ताच भारत-रशिया संबंधांविषयी बोललो. हे संबंध सात दशकांहूनही जुने आहेत. हिंदीत ‘दोस्ती’ आणि रशियनमध्ये ‘द्रूझ्बा’ या संबंधांना सात दशकांपेक्षा जास्त काळ झाला. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की आपण या मैत्रीच्या नात्याला आजच्या काळात किती मजबूत मानता आणि या प्रसंगी आपले मित्र पंतप्रधान मोदींबद्दल आपण काय सांगू इच्छिता?
पुतिन: पंतप्रधान मोदींबद्दल? जग वेगाने बदलत आहे आणि काळाबरोबर बदलाचा वेग वाढत आहे. सर्वांना हे माहित आहे. नवीन समीकरणे आणि नवीन सत्ताकेंद्रे उदयास येत आहेत.
या समीकरणांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या शक्ती देखील काळानुसार बदलत आहेत. अशा परिस्थितीत, जगातील महान राष्ट्रांमधील स्थिरता महत्त्वाची आहे आणि ही स्थिरता जागतिक विकासाचा पाया आहे.
दोन देशांमधील बाब असो किंवा जागतिक समस्या असो, पंतप्रधान मोदींशी असलेले आमचे संबंध महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठीच दोन देशांमधील बाब असो किंवा जागतिक समस्या असो, पंतप्रधान मोदींशी असलेले आमचे संबंध महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठीच महत्त्वाचे नाही तर आमच्यातील परस्पर ध्येयांना साध्य करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. एकूणच, आपसातील सहकार्य आमच्या ध्येयांच्या साध्यते साठीची हमी देते. पंतप्रधान मोदींनी सरकार आणि देशासाठी अनेक ध्येये निश्चित केली आहेत. मेक इन इंडिया प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ते नेहमीच माझ्याशी काहीतरी नवीन उपक्रमाबद्दल बोलतात; त्यांचा काम करण्याचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक असतो.
अंजना: एससीओ बैठकीदरम्यान, तुम्ही आणि पंतप्रधान मोदी कारमध्ये एकत्र बसला होतात. याबद्दल तुम्ही आधी बोलला होतात का आणि गाडीत बसताना तुमच्या दोघांमध्ये कोणती चर्चा झाली?
पुतिन: आम्ही फक्त चालू विषयांवर बोललो, आणि कोणतेही पूर्व नियोजन नव्हते. आम्ही बाहेर पडलो... मला माझी गाडी पुढे दिसली, म्हणून मी त्यांना माझ्यासोबत येण्यास सांगितले. तसेच जसं मित्रांमध्ये होत असते. त्यात आणखी काही नव नव्हते. वाटेत, आम्ही फक्त सामान्य मित्रांसारखे बोललो. आमच्याकडे नेहमीच काहीतरी बोलायला असते. आम्ही संभाषणात इतके गुंतलो होतो की आम्हाला नंतर असे वाटले की लोक कदाचित आमची वाट पाहत असतील. त्याच विशेष असं काही नव्हते; आमच्याकडे चर्चा करण्यासाठी बरेच काही असते आणि आम्ही अशा संभाषणांना खूप महत्त्व देतो.
गीता: राष्ट्रपती पुतिन, तुमच्या भारत भेटीदरम्यान कोणत्या घोषणा अपेक्षित आहेत? आम्ही तंत्रज्ञान हस्तांतरण, व्यापार करार याबद्दल ऐकले आहे... आणखी काय अपेक्षा करू शकतो? तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जग सध्या तुमच्या भेटीकडे लक्ष ठेवून आहे.
पुतिन: संपूर्ण जग पाहत आहे! यात काही विशेष आहे असे मला वाटत नाही. भारत हा एक विशाल देश आहे. हा १.५ अब्ज लोकसंख्येचा देश आहे. आणि ७.७ टक्के विकास दर असलेला विकसनशील देश आहे. पंतप्रधान मोदींची ही एक मोठी कामगिरी आहे. भारतातील नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. टीकाकार म्हणतील की ते अधिक चांगले असू शकले असते. परंतु त्याचे परिणाम सर्वांसमोर आहे. भविष्यात, आम्ही येणाऱ्या काळासाठी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास तयार आहोत आणि त्यातीलच एक म्हणजे उच्च तंत्रज्ञान. भारत आणि रशियामध्ये स्पेस टेक्नोलॉजी, न्यूक्लियर टेक्नोलॉजीपासून जहाजबांधणी आणि विमान बांधणीपर्यंत आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य केले जात आहे. उदाहरणार्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण यावर पुढे चर्चा करू. आजचे तंत्रज्ञान जे आहे ते भविष्याची दिशा निश्चित करेल. ते आपल्या प्रगतीला गती देऊ शकते. परंतु हे देखील खरे आहे की त्यात अनेक आव्हाने येतात. पंतप्रधान मोदींसोबत या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि आताच्या काळासाठी सर्वात योग्य मार्ग निवडू.
गीता: तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कराराबद्दल सांगायचे आहे का?
पुतिन: कदाचित आत्ताच याबद्दल मी काहीही बोलू नये, कारण माझ्या भारत भेटीदरम्यान संयुक्तपणे आम्ही याची घोषणा करूच. तेव्हाच या करारांवर औपचारिक स्वाक्षरी ही केली जाईल.
गीता: व्यापाराच्या बाबतीत, भारत आणि रशिया दोघांनाही मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करावा लागतो. पाश्चात्य दबावामुळे, विशेषतः तेलाच्या बाबतीत, भारताचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि रशिया पश्चिमेकडील या दबावाला एकत्रितपणे कसे तोंड देऊ शकतात?
पुतिन: तुम्ही ज्या दबावाबद्दल बोलत आहात ते प्रत्यक्षात राजकारणाचा फायदा घेऊन आर्थिक हितसंबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, भारतासोबतचा आमचा ऊर्जा सहकार्य अशा अल्पकालीन राजकीय दबावामुळे प्रभावित होत नाही. भारतासोबतचा आमचा ऊर्जा करार खूप जुना आहे आणि विश्वासावर आधारित आहे. युक्रेनमधील घटनांशी त्याचा काहीही संबंध नाही. खरं तर, आमच्या एका मोठ्या तेल कंपनीने भारतात तेल शुद्धीकरण कारखाना विकत घेतला आहे. हे विदेशी कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेत केलेल्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. आम्ही येथे २० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. आमची कंपनी तिच्या भागीदारांसह ही रिफायनरी यशस्वीरित्या चालवत आहे. भारत सध्या युरोपियन बाजारपेठांना मोठ्या प्रमाणात तेल पुरवू शकतो कारण ते आमच्याकडून स्वस्त दरात तेल खरेदी करतात. परंतु हे आमच्या दशकांच्या जुन्या संबंधांमुळे शक्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, रशियाच्या मदतीने भारत बाजारपेठेत तेलाचा प्रमुख पुरवठादार बनला आहे याबद्दल बरेच लोक नाराज आहेत. आणि म्हणूनच ते नवीन राजकीय डावपेचांनी भारताला त्रास देत आहेत. ते देशाच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत.
अंजना: माझा पुढचा प्रश्न संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. भारत हा रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. या क्षेत्रात भारताने रशियाकडून केलेल्या एकूण खरेदीपैकी अंदाजे ३८% खरेदी आहे. भारताला अमेरिकेकडून निर्बंधांचा सामना करावा लागत असल्याने, या बदललेल्या परिस्थितीत रशिया भारताला कसा पाठिंबा देईल?
पुतिन: मला वाटते, जगातील कोणताही देश आज भारताशी तसा संवाद साधू शकत नाही जसा संवाद तो 77 वर्षांपूर्वी साधत होता. भारत आज एक शक्तिशाली राष्ट्र आहे, पूर्वीसारखा आता ब्रिटिश राजवटीखाली नाही आणि प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे. विशेषतः पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारत आता परकीय दबावाखाली राहणार नाही. भारतातील लोकांना अभिमान वाटू शकतो की त्यांचे पंतप्रधान कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत. शिवाय, ते कोणाशीही संघर्ष करू इच्छित नाहीत. खरं तर, आम्ही कोणाशीही संघर्ष करू इच्छित नाही; आम्हाला फक्त आमच्या कायदेशीर हितांचे रक्षण करायचे आहे. आमचे ९० टकक्यांपेक्षा जास्त व्यवहार आमच्या राष्ट्रीय चलनात केले जातात. मध्यस्थांसोबत काही समस्या असू शकतात तरी, आम्ही एक समान प्रणाली तयार करू शकतो, जिथे रशियन आणि भारतीय बँका अखंडपणे व्यवहार करू शकतील. आम्ही यावर सतत काम करत आहोत. एकदा ही प्रणाली लागू झाली की, व्यापारावरील बाह्य दबावाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
अंजना: ऑपरेशन सिंदूर दरम्यान, रशियाने पुरवलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने भारताने युद्धात दणदणीत विजय मिळवला. म्हणूनच, आज आम्हाला जाणून घ्यायचे आहे की रशिया भारताला मिळणाऱ्या पाच S-400 हवाई संरक्षण प्रणाली कधी देईल. दुसरे म्हणजे, S-500 कधी मिळण्याची अपेक्षा आहे? आणि तिसरे म्हणजे, भारताला पाचव्या पिढीतील Su-57 लढाऊ विमान कधी मिळतील?
पुतिन: तुम्ही तर या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात असे दिसते. मला असे वाटतंय की, मी संरक्षण करारांशी संबंधित बैठकीला उपस्थित आहे. पण मी येथे हे सांगू इच्छितो की भारत हा आमच्या सर्वात विश्वासार्ह भागीदारांपैकी एक आहे. आम्ही आमची शस्त्रे फक्त भारताला विकत नाही आहोत आणि भारत फक्त ती खरेदी करत नाही. आमचे संबंध त्याही पलीकडे जातात. आम्ही भारताइतकेच परस्पर सहकार्याला महत्त्व देतो. आणि आम्ही फक्त शस्त्रे विकत नाही आहोत, तर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण देखील करतो. संरक्षण क्षेत्रात हे सहसा केले जात नाही, कारण त्यासाठी दोन देशांमधील अढळ विश्वास आवश्यक असतो. परंतु आमचे सहकार्य यापुरते मर्यादित नाही. आम्ही जहाजांपासून ते क्षेपणास्त्रे आणि विमानांपर्यंत सर्वकाही संयुक्तपणे विकसित करत आहोत. तुम्ही Su-57 चा उल्लेख केला. परंतु भारत इतर अनेक प्रकारच्या रशियन युद्धनौका वापरतो. तसेच, T-90 टँक, जे भारत स्वतः विकसित करत आहे. ते उत्कृष्ट टँक आहेत. आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील, जी की भारत मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत रशियाच्या सहकार्याने विकसित करत आहे. यामध्ये कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल देखील समाविष्ट आहे. तथापि, येथे आपण प्रगत तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत. आणि म्हणूनच, युद्धात आधुनिक शस्त्रांचा वापर पाहता त्यांचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. आणि आता, रशियन सहकार्यामुळे, भारतीय संरक्षण तज्ञांना वेगवेगळ्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा आणि शस्त्रांचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे देखील चांगले समजते.
गीता: मी तुम्हाला पुन्हा एकदा तेल व्यापाराशी संबंधित एक प्रश्न विचारू इच्छिते, तुम्ही भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेबद्दल बोललात. हे भारताच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे का?
पुतिन: हे खरे आहे की वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत भारतासोबतच्या द्विपक्षीय व्यापारात थोडी घट झाली आहे. पण याच्याकडे एक प्रकारचे समायोजन म्हणून पाहिले पाहिजे.पण एकूणच रशियाचा भारतासोबतचा व्यापार जवळजवळ सारखाच आहे. मी आत्ता महिनानिहाय अचूक आकडेवारी देऊ शकत नाही पण रशियाचा भारतासोबत हायड्रोकार्बन आणि तेलाचा व्यापार सातत्याने सुरू आहे. या मुद्द्यावर रशियन तेल कंपन्या आणि भागधारकांचे विचार मला नीट माहिती आहेत. त्यांचे भारतीय भागीदार पूर्णपणे विश्वासार्ह आहेत असे त्यांचे मत आहे.
गीता: भारत आणि रशियामधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अणु सहकार्य. या क्षेत्रात भारताला आतापर्यंत रशियाकडून सर्वाधिक सहकार्य मिळाले आहे. यावेळी आपण एका मोठ्या अणु कराराची अपेक्षा करू शकतो का?
पुतिन: हो, आम्ही निश्चितच याबद्दल घोषणा करणार आहोत. हे खरे आहे की आम्ही या क्षेत्रातील सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक आहोत.खरंतर आम्ही केवळ भागधारकच नाही तर अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह उपकरणांचे जगातील सर्वात मोठे उत्पादक आहोत. या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी ही रशियन कंपनीच आहे. या कंपनीने आतापर्यंत परदेशात २२ न्यूक्लिअर रिएक्टर्स बनवल्या आहेत आणि त्या सर्व अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. रशियाचे जगभरात लहान न्यूक्लिअर प्लांट बांधण्यात प्रभुत्व आहे यात शंका नाही. यापैकी बरेच रशियामध्ये आधीच वापरात आहेत. आम्ही जमिनीवर, समुद्रात किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर त्यांचा वापर करण्याचा पर्याय देखील देऊ शकतो. अशा प्रकारे, ते अशा भागात वापरले जाऊ शकतात जिथे मोठे पावर प्लांट बांधणे हा पर्याय नाही किंवा जिथे प्रवेश करणे कठीण आहे.
गीता: तुम्ही भारत-रशिया सहकार्य, मेड इन इंडिया आणि मेक इन रशियावर खूप भाष्य केलं आहे. यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय असेल असं तुम्हाला वाटतं?
पुतिन: हे बघा, मी किंवा पंतप्रधान मोदी कधीही कोणाच्या दबावाखाली येत नाही. पण मी हे देखील स्पष्ट करतो की आम्ही आमच्या संयुक्त कार्याचा वापर कधीही कोणाविरुद्ध करत नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची स्वतःची धोरणे आणि समस्या आहेत आणि आमच्याही आहेत. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. रशिया आणि भारत तर फक्त एकमेकांच्या हिताचा विचार करतायत. आम्हाला कोणाचेही नुकसान करायचे नाही. मला वाटते की आमच्या या धोरणाचे इतर देशांनी कौतुक केले पाहिजे.
अंजना: दुसरा प्रश्नही डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आहे. अलीकडेच ते भारताला असं म्हणाले की जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करत असाल तर तुम्ही रशिया-युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करत आहात. या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनाकडे तुम्ही कसं बघता?
पुतिन: मी कधीच माझ्या सहकाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत नाही. ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे त्यांच्याबद्दलही नाही. आणि विशेषतः राष्ट्रप्रमुखांबद्दल तर अजिबात नाही. मला वाटते की ज्या देशाच्या नागरिकांनी त्यांना सत्तेत आणलं, त्यांनी विचार करावा. रशियाकडून भारताच्या ऊर्जा संसाधनांच्या खरेदीबाबत बोलायचं झालं तर मी हे स्पष्ट करतो की अमेरिका अजूनही त्यांच्या न्यूक्लियर पावर प्लांट्ससाठी आमच्याकडून अणुऊर्जा खरेदी करते. यामध्ये अमेरिकेत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठीच्या युरेनियमचा पण समावेश आहे. जर अमेरिका स्वतःच्या ऊर्जेच्या गरजा रशियाद्वारे पूर्ण करत असेल, तर ते भारताच्या खरेदीवर आक्षेप का घेतायत? या मुद्द्यावर सखोल विचार होणं आवश्यक आहे. आणि आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी यावर चर्चा करण्यास तयार आहोत.
गीता: तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल खूप संयमी प्रतिक्रिया दिली. तुम्ही म्हणता की तुम्हाला व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं नाही पण ते तुमच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी विशेषतः टॅरिफचा वापर शस्त्र म्हणून करण्याची सुरूवात केली. त्यांनी ते भारताविरुद्ध देखील वापरलं. ते त्यांच्या पद्धतीने याचा वापरतात. ट्रम्पच्या या धोरणाचा रशिया आणि भारताने कसा प्रतिकार करावा असं तुम्हाला वाटतं?
पुतिन: हे त्यांचं स्वतःचं धोरण आहे. मला वाटते की त्यांच्या सल्लागारांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे टॅरिफ लादल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल पण आमच्या अर्थशास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की असं धोरण धोकादायक आहे. शेवटी अशा धोरणांबाबतचा निर्णय देशाचा आणि त्याच्या सर्वोच्च नेत्याचा आहे. पण आम्ही कधीही असे केलं नाही आणि आम्हाला तसं करायचंही नाही. आम्ही खुल्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आम्हाला फक्त अशी आशा आहे की जागतिक व्यापार संघटनेच्या ज्या नियमांचं उल्लंघन होतंय, त्यात सुधारणा केल्या जातील.
गीता: मिस्टर प्रेसिडेंट, अलिकडच्या काळात रशिया आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये बदल झाल्याचे आपण पाहिले आहे. अमेरिका आता रशियाशीच चर्चा करण्याची ऑफर देते. तुम्ही अलिकडेच जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांना भेटलात. ही एक महत्त्वाची बैठक होती. तुम्ही काय चर्चा केली? आणि रशियाने काही मुद्द्यांवर माघार घेण्यास नकार दिला का? या बैठकीत नेमके काय घडले?
पुतिन: या संभाषणाचे निष्कर्ष काढणे थोडे घाईचे ठरेल. तुम्ही तिथे असता तरी ते ऐकून तुम्हाला काही मिळाले असते असे मला वाटत नाही. बैठक पाच तास चालली. मला स्वतःला त्या लांबलचक बैठकीचा कंटाळा आला होता. पण ती एक आवश्यक बैठक होती. आणि कल्पना करा, या संपूर्ण बैठकीत मी विटकॉफ आणि कुशनरसोबत एकटाच होतो. पण खरे सांगायचे तर, ती एक अतिशय महत्त्वाची बैठक होती. जरी चर्चा अलास्कामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी झालेल्या करारांवर आणि संबंधित मुद्द्यांवर केंद्रित असली तरी, यावेळी आम्ही प्रत्येक मुद्द्यावर तपशीलवार चर्चा केली, जी एकूणच अर्थपूर्ण होती.
अंजना: पण या बैठकीत असा काही मुद्दा होता का की ज्यावर चर्चा पुढे जाऊ शकली नाही?
पुतिन: हो, असे अनेक मुद्दे होते ज्यांवर मतभेद होते. हा एक अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे, ज्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतली आहे. मी व्यंग्यात्मक बोलत नाहीये. पण दोन्हीकडच्या पक्षांना सहमती मिळवून देणे हे खूप गुंतागुंतीचे काम आहे. तथापि, मला वाटते की अध्यक्ष ट्रम्प खरोखरच एक उपाय शोधू इच्छितात आणि म्हणूनच आम्ही ज्या मुद्द्यावर सहमती किंवा असहमत होतो त्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही तपशीलवार चर्चा केली. सध्या या विषयावर भाष्य करणे घाईचे ठरेल, कारण कोणताही निष्कर्ष काढल्याने प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यांचे राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. ते प्रथम युक्रेनियन प्रतिनिधींशी बोलले, नंतर युरोपला गेले, नंतर आमच्याकडे परत आले आणि त्यानंतर आता ते पुन्हा युरोपियन भागधारक आणि युक्रेनियन प्रतिनिधींशी बोलतील.
गीता: तर मग तुम्हा दोघांमध्ये २८ मुद्द्यांवर शांतता प्रस्तावाबद्दल काही चर्चा झाली का?
पुतिन: हो, आम्ही त्यावरही चर्चा केली. तथापि, नंतर त्यांनी ते २८ मुद्दे कमी करून २७ केले आणि नंतर त्यांना चार पॅकेजेसमध्ये विभागले आणि त्यावर चर्चा केली. तथापि, ते पूर्णपणे त्या सुरुवातीच्या २८ मुद्द्यांवर आधारित होते.
अंजना: आपण त्या विषयाकडे परत जाऊ शकतो का आणि सध्या त्यात काय प्रगती झाली आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? अलास्कामध्ये काय घडले? तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटलात आणि ते सगळं शांतता कराराबद्दल सुरू होते. तिथे काय घडले? त्यातून काही निष्पन्न झाले का? तुम्हाला काही स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू दिसला का?
पुतिन: हो, अगदी तसंच घडलं. आमची एक भावना होती... कदाचित त्यापेक्षाही जास्त. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही खरी इच्छा आहे याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. ठिक आहे, यामागचं खरं कारण काय आहे आणि कोणी खरी इच्छा प्रकट केली याबद्दल बोलू नये, पण हे नक्की आहे की ती अस्तित्वात आहे. खरं तर, अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हे शक्य तितक्या लवकर का संपले पाहिजे याची जाणीव आहे. मानवतावादी विचार केल्यास, मला ठामपणे वाटते की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वर्तनामागील हे एक कारण आहे. कारण ते नेहमीच म्हणत आलेत, आणि मला खात्री आहे नुकसान कमीत कमी राहण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि मला खात्री आहे की त्यांच्या मनात मानवतावादी पैलू आहेत, तसेच राजकीय आणि आर्थिक दोन्ही विचारही आहेत. आणि मला खात्री आहे की युनायटेड स्टेट्स तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
गीता: बरोबर, ते त्यांच्या हेतूंबद्दल बोलले आहेत, आणि तुम्ही त्याबद्दल बरोबर आहात. तुम्हाला माहिती आहे का, ते नेहमीच युद्धे संपवल्याचा दावा करत आले आहे. ते असाही दावा करतात की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणली. आणि आता ते रशिया - युक्रेन आणि इस्रायलकडे पाहत आहे. तुम्हाला खरोखर वाटते का की ट्रम्प शांतता प्रस्थापित करणारे आहेत?
पुतिन: अर्थात, युक्रेनबद्दल निश्चितच. मी पुन्हा एकदा सांगू शकतो की मी याबद्दल सकारात्मक आहे. मला यात काही शंका नाही की ते शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करू शकतो की यासाठी अमेरिकेची वेगवेगळी कारणे असू शकतात. मानवतावादी कारणे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे वैयक्तिक मानवतावादी विचार, कारण त्यांना खरोखरच शत्रुत्व आणि जीवितहानी संपवायची आहे. परंतु रशिया आणि युक्रेनमधील गतिरोध संपवण्यात त्यांचे राजकीय हितसंबंध देखील असू शकतात. आणि उदाहरणार्थ, ऊर्जा क्षेत्र आणि इतर क्षेत्रे. अमेरिका आणि रशियामधील आर्थिक संबंध पुनर्स्थापित करणे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरू शकते असे अनेक मुद्दे आहेत - रशिया आणि अमेरिकामध्ये. त्यांनी मला काही प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी आम्हाला लिहिलेली काही पत्रे दाखवली. हो, अमेरिकन कंपन्यांनी लिहिलेली पत्रे. ज्यात म्हटले आहे की ते सर्व समस्या सोडवल्यानंतर परत येण्यास तयार आहेत आणि ते तसे करू इच्छितात. यात इतके आश्चर्यकारक काय आहे? तुम्हाला इतके आश्चर्य का वाटते? बरेच लोक रशियाला परत येऊ इच्छितात. परंतु ट्रम्प यांनी त्यांची बाजू मांडणे, त्यांच्या वतीने त्यांची बाजू मांडण्यासाठी कंपन्यांकडून पत्रे घेऊन येणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.
गीता: कंपन्यांकडून त्यांची बाजू मांडण्यासाठी पत्रे आणणे. त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणे. हे अगदी अनोखे आहे.
पुतिन: नाही, नाही. तुमचा गैरसमज होतोय. आमच्याकडे अमेरिकन कंपन्यांची पत्रे आहेत. आमच्याकडे खरोखरच अमेरिकन कंपन्यांची पत्रे आलेली आहेत.
अंजना: ही मुलाखत खरोखरच रंजक होत चालली आहे, कारण त्यात विचार करण्यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि तुम्ही त्यावर इतक्या सहजतेने चर्चा करत आहात हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. पण आता आपण एका अतिशय गंभीर मुद्द्याकडे वळूया: रशिया-युक्रेन युद्ध. तुमच्या मते, या युद्धात रशियासाठी विजय काय मानला जाईल? रेड लाईन्स काय आहेत? कारण तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की रशियाने दावा केलेल्या क्षेत्रांमधून कीव्हच्या सैन्याने माघार घेतली तरच रशिया मागे फिरेल. ते भूभाग कोणते असतील?
पुतिन: तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, हे विजयाबद्दल नाही. तर रशिया स्वतःचे रक्षण करत आहे. आणि तसेच तिथे राहणाऱ्या लोकांच्या हितांचे रक्षण करत राहील. हे आमच्या पारंपारिक मूल्यांचे, रशियन भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याबद्दल आहे. तसेच त्या प्रदेशांमध्ये शतकानुशतके अस्तित्वात असलेल्या धर्म आणि श्रद्धांचे रक्षण करण्याबद्दल देखील आहे. तुम्हाला माहिती आहे, युक्रेनमध्ये रशियन ऑर्थोडॉक्स चर्सेसवर जवळजवळ बंदी घालण्यात आली आहे. चर्चवर जबरदस्तीने कब्जा करण्यात आला आहे आणि लोकांना हाकलून लावण्यात आले आहे. मी रशियन भाषेवरील बंदीबद्दलही बोलत नाही. हे एक गुंतागुंतीचे आणि व्यापकस्तरावरील मुद्दे आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की युद्ध सुरू करणारे आम्ही नव्हतो. पश्चिमेकडील देशांनी युक्रेनशी संगनमत करून सत्तापालट घडवून आणला आणि त्यानंतर युक्रेनमध्ये, विशेषतः आग्नेय आणि नंतर डोनबासमध्ये, त्यानंतरच्या घटना घडल्या. हे टेबलावरही नाही. आठ वर्षांपासून - एकूण आठ वर्षे - आम्ही शांततापूर्ण मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही मिन्स्क करारादरम्यान शांततापूर्ण तोडगा म्हणून त्याची नोंद केली. या आशेने की ते शांततापूर्ण मार्गाने सोडवले जाईल. नंतर, आम्हाला कळले की ज्या पाश्चात्य नेत्यांनी हे जाहीरपणे सांगितले त्यांचा कधीच मिन्स्क करार पूर्णत्वास नेण्याचा हेतू नव्हता. त्यांनी युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याची संधी मिळावी आणि त्याचवेळी आमच्याविरोधात सशस्त्र संघर्ष सुरू ठेवता यावा यासाठीच त्यावर स्वाक्षरी केली. म्हणूनच डोनबासमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हत्यांच्या आठ वर्षांनंतर, ज्याची आठवण पश्चिमेकडील कोणीही ठेवत नाही, त्यांना प्रथम प्रजासत्ताक म्हणून मान्यता द्यावी लागली आणि दुसरे म्हणजे त्यांना पाठिंबा द्यावा लागला. आणि आता, ही विशेष लष्करी कारवाई युद्धाची सुरुवात नाही. आम्ही ते युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात आहोत ज्याला युक्रेनियन राष्ट्रवादींच्या माध्यमातून पश्चिमेकडील देशांनी आमच्याविरोधात सुरू केले होते. हेच वास्तव आहे. हेच वादाचे मूळ आहे. ज्या भूभागाला मुक्त करण्यासाठी आम्ही लष्करी कारवाई सुरू केली होते, ते लक्ष्य साध्य झाल्याचं लक्षात आल्यावर आम्ही तेव्हाच हे युद्ध संपवू.
अंजना: युक्रेनमध्ये व्लादिमीर पुतिन यांचे अंतिम ध्येय काय आहे?
पुतिन: बघा, आठ वर्षे आपण या स्वयंघोषित स्वतंत्र प्रजासत्ताकांना मान्यता दिली नाही. आठ वर्षे त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य घोषित केले होते आणि आम्ही या प्रजासत्ताक आणि उर्वरित युक्रेनमध्ये काही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत राहिलो. मग आम्हाला जाणवले की हे शक्य नाही; त्यांचा फक्त संपवले जात आहे. तेव्हाच आम्हाला त्यांना मान्यता द्यावी लागली. आणि फक्त काही प्रदेशच नाही, सोव्हिएत काळात आणि स्वतंत्र युक्रेनच्या निर्मितीनंतरही ज्या प्रशासकीय सीमा अस्तित्वात होत्या त्यांना मान्य करावे लागले. मग तिथल्या लोकांनी जनमत चाचणी घेतली आणि सैन्य मागे घेण्याच्या आणि लष्करी कारवाई न करण्याच्या बाजूने मतदान केले. पण त्यांनी नंतर युद्ध निवडले. आणि आता हे प्रकरण स्पष्ट आहे आणि ते एकाच गोष्टीवर येऊन थांबते. एकतर आम्ही सैन्य कारवाईद्वारे ते प्रदेश मुक्त करावे किंवा युक्रेनचे सैन्य तिथून हटवावे. तसेच ते प्रदेश मुक्त करावे आणि लोकांच्या हत्या थांबवाव्यात.
अंजना: आणखी एक प्रश्न, ८ मार्च रोजीच्या तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला होतात की कीव्ह हे सर्व रशियन शहरांची जननी आहे.
पुतिन: हे काही कपोलकल्पित नाही; ते एक ऐतिहासिक सत्य आहे. रशियाच्या निर्मितीच्या कथेत, नोव्हगोरोद ही राजधानी होती, त्यानंतर विल्युकी, आणि नंतर कीव्ह. त्यानंतरच, कीव्ह जुन्या रशियाचा एक भाग बनला आणि तेव्हापासून त्याला रशियन शहरांची जननी मानले जाऊ लागले. त्यानंतर इतिहासात अनेक घटना घडल्या आणि हा प्राचीन रशिया विविध भागांमध्ये विभागले गेले: एक भाग मॉस्कोला गेला आणि कीव्हचा एक भाग लाटवियाला गेला. कीव्ह एकेकाळी पोलंडशी जोडलेला होता, परंतु १८ व्या शतकात तो रशियात पुन्हा विलीन झाला.
गीता: मी तुम्हाला ऐकत असताना, मला त्यावेळची एक गोष्ट आठवली... ज्यावेळेस ही सैन्य कारवाई सुरू होती. मी जेव्हा दोनेस्तक, लुहान्स्क, जेपोरेजिया आणि खेरसन येथील लोकांना भेटले तेव्हा ते कीव्हवर खूप नाराज होते... पण ते गोंधळलेले देखील होते आणि विचारत होते, "पुतिनने आम्हाला अनाथ का सोडले?" सीमेच्या दोन्ही बाजूला त्यांचे स्वतःचे लोक होते आणि रशिया आणि युक्रेनमध्ये त्यांचे दररोज येणे-जाणे होते.
पुतिन: मला समजलं नाही ते कशासाठी चिंताग्रस्त होते?
गीता: पूर्व युक्रेनमध्ये, जिथे लोकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली
पुतिन: याचे उत्तर फार सोपे आहे: ते भाग कीव्हच्या नियंत्रणाखाली होते आणि जे भाग कीव्हच्या नियंत्रणाखाली नव्हते ते कीव्हने पूर्णपणे नष्ट केले होते, आणि म्हणून आम्हाला नाईलाजास्तव उद्धवस्त झालेल्या भागांना पाठिंबा द्यावा लागला. लोकांनी उघडपणे जनमत चाचणीची मागणी करण्यास सुरुवात केली. ज्यांना स्वातंत्र्य हवे होते ते येथे येऊ शकतात आणि ज्यांना नाही ते दुसऱ्या मार्गाने जाऊ शकतात. आम्ही त्यांना थांबवणार नाही; ते नक्कीच जाऊ शकतात.
गीता: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीबद्दल तुमचे काय मत आहे? त्यांना नाटोचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांना युरोपियन युनियनचेही आश्वासन देण्यात आले होते. नाटोमध्ये त्यांना कधी समाविष्ट केले जाईल का?
पुतिन: जेव्हा झेलेन्स्की सत्तेत आले, तेव्हा त्यांनी सांगितलेले की, ते कोणत्याही परिस्थितीत शांततेसाठी ते प्रयत्न करतील, यासाठी त्यांना त्यांची कारकीर्द पणाला लावावी लागली तरी चालेल. पण आता, सर्वकाही वेगळ्या पद्धतीने घडताना दिसतंय. ते आता एका लहान गटाच्या, राष्ट्रीय कट्टरपंथी फॅसिस्टांच्या मदतीने उपाय शोधत आहेत. हे सरकार विचारसरणीत नव-नाझी आहे. राष्ट्रवाद आणि नव-नाझीवादाची त्यांची व्याख्या सारखीच आहे आणि म्हणूनच संपूर्ण वातावरण युद्धासारखे बनले आहे. ते अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक समस्या केवळ शांततापूर्ण संवादाद्वारे सोडवता येते हे समजून घेणं. आणि हेच आम्ही २०२२ पासून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्यांना नेमकं काय करायचंय हे फक्त तेच सांगू शकतात.
अंजना: याबद्दल त्यांचे म्हणणे महत्त्वाचे असेल. तुम्ही नेहमीच म्हटले आहे की नाटोचा पूर्वेकडील विस्तार तुमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, परंतु युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळालेले नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे की, नाटोचा विस्तार तुमच्यासाठी चिंतेचा विषय आहे की ते प्रदेश परत मिळवण्याचे निमित्त आहे?
पुतिन: हे पाहा, नाटो हा एक वेगळा मुद्दा आहे. रशियन भाषा, संस्कृती, धर्म आम्ही येथे काहीही वेगळं मागत नाही आहोत. प्रथम, प्रत्येकाला लागू होणारा मुद्दा असा आहे की, कोणत्याही देशाची सुरक्षा दुसऱ्या देशाच्या सुरक्षेचे उल्लंघन करून साध्य होत नाही. प्रत्येक देशाला स्वतःच्या पद्धतीने स्वतःची सुरक्षा कायम ठेवण्याचा अधिकार आहे. आपण हेच युक्रेनला नाकारू शकता का? तर अजिबात नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी रशियाच्या सुरक्षेला हानी पोहोचवावी. नाटोमध्ये सामील होऊन युक्रेनला स्वतःला सुरक्षित करायचं होतं आणि ही गोष्ट रशियासाठी हानिकारक आहे. दुसरं म्हणजे, आम्ही अशा कोणत्याही अवास्तव मागण्या केल्या नाहीत की, ज्यामुळे त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. आम्ही फक्त त्या आशेवर आहोत की, जे ठरलं होतं ते आम्हाला मिळवं, आणि आम्ही हे काही अगदी कालच ठरवलेले नाही. हे सोव्हिएत काळात ठरवले गेले होते. ९० च्या दशकात आमच्यासाठी हा धोका होता, जसे की स्वाक्षरी केलेल्या पहिल्या कागदपत्रांवरून दिसून येते. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, जेव्हा युक्रेन वेगळा झाला तेव्हा त्यांनी स्वतःला तटस्थ देश घोषित केले.
गीता: रशियासाठी एकमेव बंदर असलेल्या क्रिमियन बंदरावर तुम्ही कब्जा करण्याचे हेच कारण होते का, आणि म्हणूनच तुम्ही G-8 मधून माघार घेतली होती का आणि अनेकांच्या मते, रशिया एकाकी पडण्याचे हेच कारण होते?
पुतिन: आम्हाला क्रिमियन बंदर घेण्याची गरज नाही. ते आमचेच आहे. युक्रेनशी झालेल्या करारानुसार आमचे नौदल आधीच तिथे होते. सोव्हिएत युनियनच्या विलयीकरणानंतरही सैन्य सेविस्तोपोलच्या नौदल बंदरात राहिले. हे खरे आहे. पण गोष्ट एवढीच नाही. आम्ही क्रिमियन बंदर ताब्यात घेतलेले नाही. आम्ही त्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आलो ज्यांनी आपलं भविष्य या लोकांच्या हाती सोपावलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, जेव्हा सोव्हिएत संघाचे विलीनीकरण झाले तेव्हा त्यांना त्यांची मतं विचारली गेली नव्हती. पण आता, लोकशाही प्रक्रिया स्वीकारल्यानंतर, त्यांनी हे स्वीकारले नाही. पण कोणाला वाटत असेल की, रशिया दुसरं काहीतरी करेल तर ते चुकीचं आहे. रशिया नेहमीच स्वतःच्या हितांचे रक्षण करेल.
गीता: तुम्हाला G8 ला जायला आवडेल का? तुम्ही त्याबद्दल विचार करत आहात का?
पुतिन: नाही
अंजना: तुमचे उत्तर रंजक आहे. तुमचे विचार अगदी स्पष्ट आहेत.
पुतिन: मला याच्या तपशीलात जायचे नाही, पण मी खूप दिवसांपासून त्याबद्दल विचार करणे थांबवले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, G-8 देश स्वतःला इतके महान का मानतात हे मला समजत नाही. असं काय आहे त्यात? उदाहरणार्थ, भारत आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण याबाबतीत युके कुठे आहे? कदाचित ते दहाव्या क्रमांकावर आहेत. युक्रेन हा एक मजबूत देश आहे, परंतु त्यांची अर्थव्यवस्था सतत आकुंचन पावत आहे. जर्मनी मंदीच्या सावटाखाली आहे.पण, येथे प्रत्येकजण अजूनही भेटतो आणि चर्चा करतात, एकमेकांच्या समस्या सोडवतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. सर्व काही ठीक आहे, परंतु मी खूप पूर्वीच तिथे जाणे थांबवले आणि ते युक्रेनच्या घटनेशी संबंधित नाही. असं का? याच्या तपशिलात मला जायचं नाही, परंतु मी अमेरिकेला त्याबद्दल माहिती दिली होती.
अंजना: या बैठकीत तुम्ही त्यांना ही माहिती दिली?
पुतिन: हो, मी आधीही माहिती दिली होती आणि यावेळीही दिली.
अंजना: हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.
पुतिन: तुम्हाला असं वाटतं का? मला ते महत्त्वाचं वाटत नाही.
अंजना: तर पुन्हा मुद्द्याकडे येऊया. पुढे जाण्यापूर्वी मला फक्त याचा संदर्भात जोडायचा होता. तुम्ही आम्हाला सांगत होतात की, स्टीव्ह विटकॉफसोबतच्या तुमच्या अलिकडच्या भेटीत तुम्हाला G8 मध्ये परतण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता आणि तुम्ही हे अगदी स्पष्ट केले की, तुम्हाला त्यात अजिबात रस नाही.
पुतिन: नाही, हा विषय आताच समोर आला आहे. बघा, मी स्टीव्ह विटकॉफला समजावून सांगितले की, मी पूर्वीपासूनच G8 बैठकींना का उपस्थित राहणे बंद केले आहे. खरे सांगायचे तर, कोणताही प्रस्ताव आला नव्हता. खरं तर, जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा मला तो काळ आठवला जेव्हा मी जाणे बंद केले होते. तो २०१२ चा काळ होता, रशियातील अध्यक्षीय निवडणुकीनंतरचा. मग मी काही काळासाठी गेलो आणि त्यानंतर गेलो नाही. हो, ते एक व्यासपीठ आहे, ठीक आहे, त्यांना काम करू द्या. पण तुम्हाला माहिती आहे, इतर प्रमुख संघटना उदयास येत आहेत. जसे की BRICS, SCO आणि G20 अजूनही सक्रिय आहेत आणि आम्ही या सर्व व्यासपीठांमध्ये सहभागी होतो. आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही. पण आता दुसरा पैलू पाहा, रशिया आणि युरोपियन युनियनमधील संबंधांची सध्याची स्थिती काय आहे? ती सामान्य नाही. तर कल्पना करा, जर मी G8 मध्ये गेलो तर, आणि G8 सदस्य माझ्याशी बोलूच इच्छित नसतील तर मी त्यांच्याशी कसं बोलू? मी तिथे काय करावं? बरं, याबद्दल आपण कदाचित नंतर बोलू.
अंजना: आता तुम्ही तीन मुद्दे मांडले. पहिला मुद्दा, तुम्ही म्हणत आहात की भारतासारखा देश, ज्याचा विकास दर अनेक युरोपीय देशांपेक्षा खूपच जास्त आहे, त्यांनी शांत राहावे आणि समजून घ्यावे की, गोष्टी कशा पुढे जात आहेत. दुसरा मुद्दा, तुम्ही म्हणत आहात की G7 सारख्या संस्था त्यांची प्रासंगिकता गमावत आहेत, आणि जर त्यांना माझ्याशी बोलायचेही नसेल, तर मी तिथे काय करावे? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही BRICS चा उल्लेख केला. आता माझा प्रश्न असा आहे की, एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येत आहे का? कारण तुम्ही G7 मध्ये जात नाही आहात, तर तुम्ही नुकतीच चीनला भेट दिली आहे आणि तुम्ही आता भारतातही जात आहात. रशिया, भारत, चीन, RIC, BRICS, SCO, ग्लोबल साऊथ. बहुध्रुवीय जगात तुम्ही या नवीन सत्तेच्या केंद्राकडे कसे पाहता?
पुतिन: तुम्ही विचारले की, जग बदलत आहे का, एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येत आहे का? पाहा, मुद्दा असा आहे की, जग नेहमीच बदलत असतं. सर्व काही बदलतं. पण आजकाल, बदलाचा वेग वाढला आहे आणि आपण ते अनुभवू आणि पाहू शकतो. मी हे आधी नमूद केले आहे. खरं तर, आपण जागतिक आर्थिक बदल आणि त्यातील उलथापालथ याचे साक्षीदार आहोत. हे बदल युक्रेन किंवा इतर संघर्ष क्षेत्रांशी संबंधित नाहीत. आपण याबद्दल आणखी एक तास बोलू शकतो आणि मला आनंद होईल, परंतु तुमचे प्रेक्षक आपल्या या चर्चेला कंटाळतील. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, विकासाची नवीन केंद्रे उदयास येत आहेत, जलद विकास, मजबूत विकास. हा बदल विशेषतः जागतिक दक्षिणेत होत आहे. मी दक्षिण आशियाबद्दल बोलत आहे. आणि फक्त भारतच नाही, तर इंडोनेशिया देखील वेगाने उदयास येत आहे. त्याची लोकसंख्या जवळजवळ ३० कोटी आहे. भारताच्या १.५ अब्ज लोकसंख्येइतकी नसली तरी, तो अजूनही वेगाने विकसित होणारा देश आहे. त्याचप्रमाणे, आफ्रिका देखील वेगाने विकसित होत आहे. आणि ही वाढ वेगवान होईल कारण तेथे तरुण लोकसंख्या आहे, त्यांचे भविष्य आहे आणि ते उच्च राहणीमानाची मागणी करतील. एकूणच, हे थांबवता येणार नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलाचा वेग वाढतच जाईल. आपण अनेकदा ऐकतो की, रशिया अलीकडेच जागतिक दक्षिण आणि आशियाशी आपले संबंध सुधारत आहे. पण सत्य हे आहे की, आम्ही हे बऱ्याच काळापासून करत आहोत.
अंजना: मिस्टर प्रेसिडेंट, या फोटोने खरोखरच जगभरात खळबळ उडवून दिली आहे. पुतिन, शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी - तिन्ही देशांचे प्रमुख एकत्र. आणि लोक सोशल मीडियावर आणि अमेरिकेत यावर सगळीकडे चर्चा करत आहेत. पण त्या फोटोकडे पाहता, प्रश्न असा आहे की, जेव्हा अशा गटाच्या मुख्य सदस्यांमध्ये मूलभूत मुद्दे अनुत्तरीत असतात, तेव्हा असे पर्यायी गट कसे तयार होऊ शकतात आणि एक खरी शक्ती कसे बनू शकतात?
पुतिन: पाहा, संघर्ष नेहमीच अस्तित्वात असतो. अशी एकही वेळ नव्हती की, जेव्हा जगात संघर्ष नव्हता. जगभरातील प्रमुख प्रदेशांचा आणि प्रमुख शक्ती केंद्रांचा इतिहास पाहा. प्रत्येक युगात, प्रश्न, वाद आणि संघर्ष होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या संघर्षांतून मार्ग कसा काढता. या आव्हानांना तोंड देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कसा ठरवायचा. ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेसारखे मोठे गटच घ्या. या संघटनांमध्ये, आपली एक सामायिक समज आहे जी आपल्याला एकत्र आणते. आणि ती म्हणजे आपली मूल्ये, आपल्या पारंपारिक मूल्य प्रणाली, ज्यांनी आपल्या संस्कृतींना शेकडो, हजारो वर्षे टिकवून ठेवले आहे. मागील पिढ्यांकडून ही मूल्ये वारशाने मिळाल्यामुळे, आपण या संधी दडपून न टाकता आपले प्रयत्न एकत्रित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जेव्हा तुम्ही एकत्र काम करता तेव्हा परिणाम एका प्रकारच्या समन्वयावर आधारित असतात आणि तो परिणाम अत्यंत प्रभावी असतो. आणि याच गोष्टींना आम्ही या संघटनांमध्ये प्राधान्य देतो. असा एकही काळ आला नाही जेव्हा आपण कोणाला फसवण्यासाठी किंवा कोणाच्या प्रगतीत अडथळा आणण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमचा अजेंडा नेहमीच सकारात्मक राहिला आहे.
गीता: तुम्ही एक मोठे विधान केले आहे, पण ते आर्थिकदृष्ट्या कसे व्यवहार्य बनवाल? तुम्ही पर्यायी व्यवहार प्रणाली तयार कराल का? तुम्ही चलनात बदल कराल का, की फक्त राष्ट्रीय चलनात पैसे द्याल? म्हणजे, हे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल नाही का?
पुतिन: आपल्याला घाई करून चालणार नाही, कधीकधी आपण मोठ्या चुका करतो. तुम्ही युरोपकडे पाहा, जिथे अमेरिकन व्यवस्था आहे आणि अनेक देश ज्यांच्या आर्थिक व्यवस्था एकाच चलन प्रणालीसाठी तयार नाहीत, हीच समस्या आहे. आपण ते दुरुस्त करत आहोत. तुम्हाला माहिती आहेच की, आपण आपल्या स्वतःच्या चलनात सहज व्यवहार करू शकत नाही. का? कारण तिथे एकच चलन प्रणाली आहे. आपले ध्येय एकच चलन प्रणाली विकसित करणे नाही. आपण जे करणार आहोत ते अतिशय काळजीपूर्वक आणि हुशारीने केले पाहिजे. आपण आपले स्वतःचे चलन वापरले पाहिजे आणि ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपली अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साउथ विकसित करण्यासाठी, आपण एक गुंतवणूक व्यासपीठ तयार केले पाहिजे, जे व्यापारासाठी इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा वापर करतील आणि, ज्याची सुरुवातीची क्षमता शंभर अब्ज डॉलर्स एवढीच असावी. मला वाटते की, हे विलक्षण असेल. याचा फायदा केवळ लाभार्थी देशांनाच होणार नाही, तर आपल्यालाही होईल. आपण परवडणाऱ्या किंमतीत उच्च गुणवत्तेच्या वस्तूंचे उत्पादन करू शकतो. यामुळे ग्लोबल साउथमधील देशांचा विकास होईल आणि आम्हालाही फायदा होईल. आणि हो, आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली वेगाने विकसित होत आहेत आणि हे कोणालाही संपविण्यासाठी केले जात नाही. सर्वांनी समन्वयाने काम करावे.
गीता: रुपया आणि रूबल व्यवहारांवर?
पुतिन: कोणताही अडथळा नाही; हा एक आर्थिक मुद्दा आहे आणि मला समजते की आपल्यातील व्यापारात असंतुलन आहे. उदाहरणार्थ, भारताने कोणतेही अडथळे निर्माण केलेले नाहीत. कारण त्यांना तेल आणि तेलापासून बनवलेल्या उत्पादनांची गरज आहे. भारत सरकारला त्यांच्या शेतकऱ्यांसाठी रशियन-निर्मित खतांची आवश्यकता आहे आणि पंतप्रधान मोदी नेहमीच माझ्यासमोर हा मुद्दा उपस्थित करतात. आणि हां रुपयांमधील देवाणघेवाणीचा मुद्दा नाही. मी नेहमीच म्हणतो की, हे असंतुलन दुरुस्त करणे आवश्यक आहे, मर्यादित नाही. आपल्या व्यापाराचा फायदा दोन्ही देशांना झाला पाहिजे, फक्त एका देशाला नाही. माझ्या भारत भेटीदरम्यान, आम्ही भारत-रशिया आयात आणि निर्यात प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी माझ्या अधिकाऱ्यांना भारतातून खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये आपण काय जोडू शकतो यावर काम करण्याचे आदेश दिले आहेत.
अंजना: माझा पुढचा प्रश्न असा आहे की, तुम्ही भारत आणि चीनमध्ये संतुलन कसे साधता? कारण सर्वांना माहिती आहे की तुमचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत.
पुतिन: भारत आणि चीन हे जवळचे मित्र आहेत आणि मला वाटत नाही की, आम्ही त्यांच्या द्विपक्षीय बाबींमध्ये हस्तक्षेप करावा. मला माहिती आहे की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे जटिल आणि वादग्रस्त मुद्द्यांवर एका निष्कर्षावर पोहोचतील. दोन्ही देशांमध्ये जो तणाव आहे त्याबाबत दोन्ही नेते चिंतित आहेत. त्यांना समस्या सोडवायची आहे. ते प्रयत्न करत आहेत. ते एका निष्कर्षावर पोहोचतील. मी दोघांसाठी खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की, मी हस्तक्षेप करावा, हे द्विपक्षीय प्रकरण आहेत.
अंजना: भारताबाबत एक महत्त्वाचा प्रश्न, आम्ही दोन मोठे दहशतवादी हल्ले सहन केले आहेत. एक पहलगाममध्ये आणि दुसरा दिल्लीमध्ये. माझा प्रश्न असा आहे की, दहशतवादाबाबत जगात तुम्हाला दुहेरी मापदंड दिसतात का? रशिया देखील दहशतवादाचा बळी आहे. तुमच्यासाठी, दहशतवादी, आमच्यासाठी, लढवय्ये... या विचारसरणीबद्दल तुमचे काय मत आहे?
पुतिन: हे खूप सोपे आहे. जर तुम्हाला स्वातंत्र्यासाठी लढायचे असेल तर कायदेशीर मार्गाने लढा. माझं ठाम मत आहे की, दहशतवाद्यांचं समर्थन करता येणार नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, रशिया देखील दहशतवादाचा बळी ठरला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारतासोबत उभा आहे.
गीता: भारत आणि रशिया दोघांसाठीही आणखी एक शेजारी देश महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान. तुम्ही तालिबान सरकारला मान्यता देणाऱ्या दुर्मिळ देशांपैकी एक आहात आणि संपूर्ण जग म्हणत आहे की तिथे लिंगभेद आहे. मानवी हक्कांचे प्रश्न आहेत. तुमचे हित काय आहे? तुम्ही ही मान्यता कोणत्या आधारावर दिली?
पुतिन: प्रत्येक देशात समस्या आहेत, त्यात अफगाणिस्तानचाही समावेश आहे. हे खरे आहे की, ज्या देशाने दशके गृहयुद्ध, भयानक परिस्थिती सहन केली आणि नंतर तालिबानने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर ताबा मिळवला, तो देश याचे पहिले कारण आहे. आणि हे आजचे वास्तव आहे. दुसरे म्हणजे, अफगाण सरकारने बरेच काही केले आहे. आणि आता ते दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना ओळखत आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी इस्लामिक स्टेट आणि अशाच अनेक संघटनांना वेगळे केले आहे. अफगाण नेतृत्वाने ड्रग्ज नेटवर्क्सविरुद्ध देखील कारवाई केली आहे आणि ते त्यांच्याविरुद्ध आणखी कारवाई करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिथे जे घडते त्याचा परिणाम होतो. म्हणून, आपल्याला काय घडत आहे हे माहीत असले पाहिजे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे. आम्ही तेच केले.
गीता: जेव्हा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात आले तेव्हा त्यांच्या पत्रकार परिषदेत महिलांना परवानगी नव्हती. पण, जेव्हा खूप निषेध झाला तेव्हा दुसरी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि नंतर महिलांना त्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.
पुतिन: बघा... जर त्यांचे मंत्री भारतात आले नसते, तर तुमच्या महिलांना बोलण्याची संधी मिळाली असती का? ते अफगाणिस्तानातून आले होते, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी भेदभाव पाहिला आहे, म्हणूनच महिलांनी आवाज उठवला. हा बदल फार मोठा नाही, पण तेथील परिस्थितीवर परिणाम नक्कीच करेल. समजा, जर तुमचा अफगाणिस्तानशी कोणताही संपर्क नसेल तर काय होईल? ते तसेच राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकू शकणार नाहीत. तालिबानपासून स्वतःला दूर ठेवण्याऐवजी, त्यांच्या संपर्कात राहणे चांगले.
अंजना: गाझा हे तणावाचे आणखी एक केंद्र आहे. व्लादिमीर पुतिन यांची गाझा शांतता योजना काय आहे?
पुतिन: माझी कोणतीही वेगळी शांतता योजना नाही. जर पॅलेस्टिनी समस्या सोडवायची असेल तर संयुक्त राष्ट्रांची शांतता योजना (द्वि-राज्य उपाय) १००% अंमलात आणली पाहिजे असे मला वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एक स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्य निर्माण केले पाहिजे आणि हाच एकमेव उपाय आहे.
गीता: अंजना म्हणाल्याप्रमाणे, तुम्हाला असे वाटते का की अरब देशांनी इराणइतके गाझासाठी केले नाही, इराण प्रत्युत्तर देईल असे कोणालाही वाटत नव्हते, हे जागतिक व्यवस्था बदलण्यासारखे आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?
पुतिन: तुम्हाला माहिती आहेच की हे सर्व देश पॅलेस्टाईनबद्दल चिंतेत आहेत. त्या सर्वांना वाटतं की, पॅलेस्टाईनला एक राष्ट्र बनलं पाहिजे. काही देश उघडपणे मदत करण्यासाठी पुढे आले आहेत, तर काही जण सावलीप्रमाणे काम करत आहेत. कोणीही काहीही केले नाही असे म्हणणे योग्य ठरणा नाही. ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, जी अनेक दशकांपासून कायम आहे. तिचे निराकरण एका रात्रीत करता येणार नाही. आम्हाला एक स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्र हवे आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलिकडेच ओलिसांच्या सुटकेबाबत जे केले आहे ते गाझाच्या पुनर्वसनाच्या दिशेने एक चांगले पाऊल आहे. गाझाचे एकीकरण करणे आणि पॅलेस्टाईनला पूर्ण अधिकार देणे योग्य ठरेल असे मला वाटते. हे काही पर्याय असू शकतात ज्यांचा विचार केला पाहिजे आणि यावर संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील चर्चा केली पाहिजे. संयुक्त राष्ट्र सदस्य म्हणून, आम्ही नेहमीच आमच्या मित्र देशांसोबत या चर्चेत भाग घेतो.
गीता: आपण भू-राजकारणाबद्दल बोललो आहोत. आता तुमच्याबद्दल बोलूया. तुमचं केजीबीशी जुनं नातं आहे. आज जगातील गुप्तचर संस्थांकडे कसे पाहता? तुम्ही कोणती एजन्सी सर्वोत्तम मानता? मला माहित आहे की तुम्ही रशियन एजन्सी म्हणाल, पण तुम्हाला कोणती एजन्सी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वाटते? सीआयए कशी आहे?
पुतिन: बघा, जगात अनेक शक्तिशाली गुप्तचर संस्था आहेत, सीआयए, आमची एजन्सी केजीबी, सोव्हिएत रशियाची गुप्तचर संस्था, इस्रायलची मोसाद... जगात अनेक देश आहेत, मला वाटते की एजन्सींच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे माझ्यासाठी योग्य नाही, परंतु मी माझी एजन्सी केजीबीच्या कामावर आनंदी आहे.
अंजना: आम्हाला तुमच्या इंटेलिजेंस एजंट म्हणून कारकिर्दीबद्दल, जर्मनी, पिट्सबर्ग आणि नंतर मॉस्कोमधील तुमच्या कामाबद्दल जाणून घ्यायचे आहे, आज इथे बसलेल्या माणसाच्या मागे कोण आहे?
पुतिन: माझे कुटुंब. मी ज्या कुटुंबात जन्मलो, ज्या लोकांसोबत मी वाढलो, मला वाटते की या सर्वांनीच मला आज मी जो आहे ते बनवलं. आणि गुप्तचर एजंट म्हणून माझ्या कारकिर्दीबद्दल तुम्ही जे म्हटले ते म्हणजे कडक शिस्त होती. तुम्हाला तुमच्या मातृभूमीचे रक्षण करायचे होते आणि तेच प्रत्येक गुप्तचर एजंटचे ध्येय असते. तथापि, मी तो काळ अनेक वर्षांपूर्वी मागे सोडला आहे.
अंजना: एकदा, जेव्हा तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत होता, तेव्हा एका विद्यार्थ्याने तुम्हाला विचारले, "तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव कोणता होता?" तुम्ही म्हणालात, "सोव्हिएत युनियनचे विघटन." युएसएसआरच्या विघटनाचा तुमच्यावर काय परिणाम झाला? आज तुम्ही रशियाकडे कसे पाहता?
पुतिन: त्याचा परिणाम इतका होता की आपण नेहमीच घटना आणि त्यांचे परिणाम काळजीपूर्वक पाहिले पाहिजेत आणि समजून घेतले पाहिजेत. हा पहिला मुद्दा होता. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे केवळ सोव्हिएत युनियनलाच नाही तर रशियालाही तितकेच लागू होते. काही काळानंतर, सोव्हिएत युनियनला असे वाटू लागले होते की, ते इतके शक्तिशाली आहेत की कोणीही त्यांच्या नेतृत्वाला आणि व्यवस्थेला आव्हान देऊ शकत नाही. सामान्य नागरिकांचाही असा विश्वास होता की सोव्हिएत युनियन इतकी शक्तिशाली शक्ती आहे की कोणीही कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान करू शकणार नाही. अतिआत्मविश्वासाच्या या चुकीमुळे एकामागून एक चुका होत गेल्या, अखेर अशी वेळ आली की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आज इतर काही देशही अशाच चुका करत आहेत.
अंजना: सोव्हिएत युनियनकडे परत येऊया, कारण तुम्ही फक्त असे म्हटलं की, एक चूक झाली आणि नंतर आणखी चुका झाल्या. तुम्ही नागरिकांबाबत बोललात, गोर्बाचेव्ह आणि येल्स न यांचा उल्लेख केला. तर तुम्ही विघटनासाठी कोणाला जबाबदार धरता?
पुतिन: मी कोणावरही आक्षेप घेऊ इच्छित नाही किंवा कोणालाही दोष देणार नाही. ती व्यवस्थाच अशी होती की, जी कुचकामी ठरली. दुसऱ्याला दोष देण्याऐवजी आपण ते स्वीकारलं पाहिजे. आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे की आपण स्वतःचे संरक्षण करू शकू. जर तुम्ही अशी व्यवस्था निर्माण केली तर ते पुरेसे होईल.
गीता: तुम्ही पुन्हा एकीकरणाचा विचार करत आहात का?
पुतिन: कशाचे एकीकरण? सोव्हिएत संघाचे? नाही, अजिबात नाही. आणि आमचे असे कोणतेही ध्येय नाही आणि त्याचे कोणतेही औचित्य नाही, कारण ते रशियन फेडरेशनची राष्ट्रीय आणि धार्मिक स्थिती बदलेल. त्याला काही अर्थ नाही.
गीता: काही पाश्चात्य लेखक असे लिहित आले आहेत की, तुम्हाला जुने सोव्हिएत युनियन पुन्हा निर्माण करायचे आहे.
पुतिन: मी जे बोलतो ते त्यांना ऐकायचे नाही, मी इथे बोलत आहे पण ते फक्त स्वतःचेच ऐकतात, त्यांना जे आवडते तेच ते ऐकतात.
अंजना: असेही म्हटले जाते की, तुम्हाला तुमचे स्वतःचे साम्राज्य निर्माण करायचे आहे.
पुतिन: काही लोक असेच बोलत राहतात, त्यांना त्यांच्या लोकांना घाबरवायचे आहे, ते जागतिक माध्यमांमधील त्यांच्या मक्तेदारीचा गैरवापर करत आहेत. हा जनमतावर प्रभाव पाडण्याचा एक कुटील डाव आहे, त्यांचा एकमेव उद्देश रशियाविरुद्धच्या त्यांच्या आक्रमक धोरणाचे समर्थन करणे आहे.
अंजना: व्लादिमीर पुतिन, तुम्ही तुमच्या जीवनाविषयी आणि विचारधारेविषयी काय सांगाल?
पुतिन: आत्ता माझ्या आयुष्याचा सार सांगणं कदाचित खूप लवकर होईल, पण मला अजून काही काम करणं बाकी आहे.
गीता: कारण आपण दीर्घायुष्याबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण भारतात जाणार आहात. भारताच्या पंतप्रधानांनी भारत–रशिया संबंध मजबूत करण्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली आहे. आपल्याला काय वाटतं, रशियात एक नेता म्हणून आपल्या कार्यकाळात, आपण सत्तेवर आल्यानंतर भारतासोबतचे संबंध अधिक चांगले करण्यामध्ये कोणत्या पंतप्रधानांनी खरोखर फरक घडवला?
पुतिन: तुम्ही मला इतर देशांच्या इतर नेत्यांविषयी बोलायला सांगितले, याबद्दल मला आनंद आहे. मला वाटत नाही की ही काही फार दूरची गोष्ट आहे. आता आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करत आहोत. खरंच, आमचे खूप विश्वासू आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते या बाबतीत अत्यंत विश्वासार्ह व्यक्ती आहेत. मी अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे. भारत भाग्यवान आहे. ते हिंदुस्तानमध्ये राहतात. ते भारतात श्वास घेतात. मी त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांना ओळखतो. मला आशा आहे की ते माझ्यावर नाराज होणार नाहीत. मी फक्त तेच सांगत आहे जे मी पाहतो आणि जे मला वाटते.
मला खात्री आहे की अशा व्यक्तीशी बोलणे माझ्यासाठी अतिशय आनंददायी आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे, की ते अत्यंत प्रामाणिकपणे भारत आणि रशियाचे संबंध प्रत्येक क्षेत्रात विशेषतः संरक्षण, अर्थव्यवस्था, मानवी सहकार्य आणि उच्च-तंत्रज्ञान असलेल्या आण्विक साहित्याच्या विकासासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मजबूत करू इच्छितात.
म्हणून त्यांच्याशी भेटणे माझ्यासाठी खूपच रंजक बाब असते. ते येथे आले होते आणि आम्ही माझ्या घरी एकत्र बसलो आणि खूप वेळ चहा पित होतो. संपूर्ण संध्याकाळ आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. आम्ही अगदी सामान्य माणसांसारख्याच रोचक गप्पा मारल्या. म्हणूनच मी या भेटीची वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे की ती अत्यंत उपयुक्त ठरेल. खूपच रंजक.
अंजना: मला खात्री आहे की त्यांना तुमच्याबद्दल असाच आदर आहे. भविष्याबद्दल एक छोटासा प्रश्न, सर, कारण आम्हाला तुमचा एआयबद्दलचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटते का की यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते? किंवा या शक्तीचा वापर चांगल्यासाठी करता येईल? आणि या एआय शस्त्र युद्धात रशिया कुठे उभा आहे?
पुतिन: तुम्हाला माहीत आहे, इतर कोणत्याही प्रगतीप्रमाणेच याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. हो, हे खरे आहे. हे स्पष्ट आहे की हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे एक सामान्य माणसाचे जीवन बदलून टाकेल. आणि नक्कीच, पुढील काळात हे संपूर्ण मानवजातीचे जीवन बदलून टाकणार आहे. जे लोक हे तंत्रज्ञान सर्वात आधी आणि सर्वात प्रभावी पद्धतीने वापरतील, त्यांना अर्थव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, विज्ञान, आरोग्यसेवा, सर्व क्षेत्रांत मोठा आर्थिक फायदा होणार आहे. परंतु मला हे म्हणावे लागेल की या सर्व क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणामकारक वापर अनेक पटींनी अधिक प्रभाव टाकणार आहे. याचे काही तोटेही आहेत, विशेषतः जेव्हा आपण त्याबद्दल सखोलपणे माहिती घेतो. खरी गोष्ट अशी आहे की हे सर्व मोठ्या डेटासेट्सची प्रक्रिया करण्यावर आधारित आहे. सगळा विषय तिथेच आहे.
म्हणून इथे लोकांच्या वैयक्तिक माहितीचा प्रश्न निर्माण होतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला यासाठी पावले उचलावी लागतील, सुरक्षा आणि संरक्षणाची खात्री द्यावी लागेल, मानवी हक्कांची हमी द्यावी लागेल. पण इथे आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या हातात हे डेटाबेस आहेत, ते प्रत्यक्षात एआय आणि मोबाईल तंत्रज्ञानाची क्षमता वापरू शकतात. ते लोकांच्या भविष्यास एक विशिष्ट आकार देऊ शकतात.
गीता: तुम्ही आताच आरोग्याविषयी बोलला आहात. तुमची आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात हॉट माइकवर चर्चा झाली. तुम्ही दीर्घायुष्य, वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि बायोहॅकिंग या विषयावर चर्चा केली, ज्यामुळे बरीच चर्चा झाली. अमरत्व खरोखर शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?
पुतिन: प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो. फक्त देवच कायम राहणारे आहेत. खरंच, आपण आयुष्य वाढवू शकतो. हे खरे आहे. सत्त्याहत्तर वर्षांपूर्वी भारतात एखाद्या व्यक्तीचे सरासरी आयुष्य ३१ वर्षे होते आणि आता ते सुमारे ७० वर्षे आहे. हे आरोग्यसेवेने शक्य झाले. भारतातील बालमृत्यू चारपट कमी झाले आहेत. हेही आरोग्यसेवेचंच फलित आहे आणि यासाठी मी तुम्हाला अभिनंदन देतो. जर आपण आरोग्यसेवेमध्ये एआयचा वापर केला आणि जर त्याचा उपयोग औषधनिर्मिती करण्यासाठी केला, उदाहरणार्थ ते जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करत असतील, तर त्याचा परिणाम अप्रतिम होऊ शकतो. तरीही, प्रत्येक गोष्टीचा शेवट असतोच.
अंजना: तुमच्या वयाकडे लक्ष न वेधता, पण अलीकडे जगभरात जनरेशन Z कडून अनेक आंदोलनं होताना दिसतायत. तुम्ही तरुण पिढीशी कसा संवाद साधता? आज अनेक नेते आहेत जे आपल्या मूळ वयापेक्षा तरुण दिसतात. असं कसं होतं? आणि तुम्ही रशियातील तरुणांशी कसे जोडता?
पुतिन: इथे हे सगळं नवीन नाही. तुम्हाला माहिती आहेच की साहित्य आणि कलेमध्ये विरोधाभासांची चर्चा कायम होत आली आहे. जुन्या आणि नवीन पिढीमध्ये, वडील आणि मुलांमध्ये. आपल्या जुन्या साहित्यामध्येही या गोष्टी आणि हे चित्र नेहमीच आढळून आलं आहे. सर्वांनी हे जाणणं गरजेचे आहे की इथे काहीही नवीन नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? नवीन काय आहे? नवीन आहे तंत्रज्ञान. मेसेंजर, टेलिग्राम वगैरे, ज्यांचा वापर आजच्या तरुण पिढीवर सक्रियपणे प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. ही पिढी म्हणजे तेच तरुण लोक, जे मोबाईलचा जास्त वापर करतात आणि अधिक टोकाचे विचार बाळगतात. तरुण पिढीला वाटते की अन्यायाचा सामना फक्त तेच करत आहेत आणि त्यांच्या आधी कुणी हे अनुभवलं नाही. तरुण हे सगळं पाहतात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगतात. त्यांना वाटते की याला सामोरे जाणं खूप सोपं आहे, हे सहज सुटू शकतं. पण जेव्हा माणूस अधिक प्रगल्भ होतो आणि स्वतः काही बदल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला समजतं की ज्याचे उत्तर तो सोपं समजत होता, ते पहिल्या वेळेस वाटलं तितके सोपं नसतं.
म्हणूनच, आपल्याला लोकांसोबत त्या वेळी काम करण्याची गरज आहे, जेव्हा आपण त्यांना सांगू शकता की "सध्या तुम्ही फक्त तरुण आहात, तुम्हाला अजून काही समजत नाही, तुम्ही फक्त आपल्या घरात बसला आहात." हे अशाच पद्धतीने होऊ शकते. तुम्हाला नेहमी तरुणांच्या संपर्कात राहण्याची, त्यांची साधने, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याच्या पद्धती, सोशल नेटवर्क्सवरील फीडबॅक यांचा वापर करण्याची गरज आहे. तुम्हाला तिथे काम करावे लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही काही प्रमाणात तसे करत आहात. तुम्हाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
गीता: आपण आणखी एक-दोन तास बोलू शकलो असतो, पण आता आपण आपल्या संभाषणाच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत. तुम्ही काही क्षणापूर्वी धर्म आणि ऑर्थोडॉक्स चर्चचा उल्लेख केला होता. मी अनेक वेळा मॉस्कोला गेली आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा ख्रिसमसच्या वेळी इथे येता तेव्हा संपूर्ण शहर अविश्वसनीयपणे सजवलेले असते. मॉस्को किती सुंदर आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पहिल्यांदाच इथे आलेली अंजना आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली की हे कोणत्याही युरोपियन शहरापेक्षा चांगले आहे, परंतु धर्म येथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आता माझा प्रश्न असा आहे: नैतिकता आणि नेतृत्वाच्या बाबतीत तुम्ही रशियन समाजात अध्यात्माकडे कसे पाहता? आणि तुमच्यासाठी त्याचे वैयक्तिकरित्या काय महत्त्व आहे?
पुतिन: हा तो विचारांचा पाया आहे, ज्याचा मी बराच काळपासून अनुभव घेतोय. आपण नेहमी आपल्या पारंपरिक मूल्यांकडे परत जातो, त्यांचा उल्लेखही करतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण या मूल्यांचा आधार घेऊन निष्क्रिय बसून राहावं. उलट, ही आपल्यासाठी एक भक्कम पायाभूत रचना आहे, परंतु त्याचबरोबर पुढे पाहणंही आवश्यक आहे. आपल्याला विकसित व्हायचं आहे आणि विकासासाठी उपलब्ध असलेल्या सर्व आधुनिक साधनांचा वापर करायचा आहे. आपल्या मुलभूत मूल्यांना आणि दूरदृष्टीला सोबत घेऊनच आपण आपली ठरवलेली उद्दिष्टे परिणामकारकरित्या गाठू शकतो. आपण अशाच प्रकारे काम करतो. आपले मूलभूत ध्येय राष्ट्रीय विकास आहे. मला खरोखरच वाटते की रशियाच्या राष्ट्रीय विकासाच्या उद्दिष्टांचा आणि भारताचे उद्दिष्टे, जी भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी ठरवली आहेत. यांचा परस्परात समन्वय असावा, जेणेकरून आपण संयुक्त प्रयत्न करून अधिकाधिक परिणाम साध्य करू शकू.
अंजना: आम्ही तुमचे भारतात खुल्या मनाने स्वागत करतो आणि तुमच्या बैठकींमुळे कोणते परिणाम होतील याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. तुम्ही किती हिंदी चित्रपट किंवा गाणी ऐकली आहेत हे मला माहित नाही. रशियामध्ये खूप लोकप्रिय असलेले एक गाणे म्हणजे "सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी", ज्याचा अर्थ "डोक्यावरील टोपी रशियन आहे, पण हृदय हिंदुस्तानी आहे." हे गाणे रशियामध्ये देखील खूप लोकप्रिय होते आणि अनेकांना ते माहित होते. तुम्हाला भारत, भारतीय समाज आणि भारतीय संस्कृतीबद्दल काही बोलायचं आहे का? तुमचे खूप कौतुक करणाऱ्या आणि राष्ट्रपती पुतिन यांना ऐकू इच्छिणाऱ्या सर्व भारतीयांसाठी तुमचा काय संदेश आहे?
पुतिन: आपण आत्ता भारतीय संस्कृतीचा उल्लेख केला. रशियन संस्कृतीबद्दल मी एवढंच म्हणेन की रशियातील अनेक नागरिकांच्या हृदयात भारतीय संस्कृतीची प्रतिमा एखाद्या परीकथेप्रमाणे सुंदर, रंगीबेरंगी आणि मन मोहून टाकणारी आहे. ही प्रतिमा अनेक दशकांपासून, सोव्हिएत काळापासून आहे. रशियन लोकांना भारतीय संगीत आणि भारतीय चित्रपट खूप आवडतात. मी तर म्हणेन की रशियन समाजाच्या काही घटकांनी भारतीय संस्कृतीला एका पूजनीय स्थानावर ठेवलं आहे. मला हे अतिशय छान वाटतं, कारण मला वाटतं की हा हृदयाशी हृदयाचा संबंध आहे. आम्ही ही आवड, ही जिव्हाळ्याची भावना कधीच कमी होऊ नये यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. मला वाटते की भारताने ही भावना जाणून घ्यावी.
अंजना: या अतिशय मोकळ्या संवादासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. मला वाटतं या संपूर्ण संभाषणातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक विषयाला स्पर्श केला. आपण सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि रशिया यांचं नातं म्हणजे अशी एक मैत्री आहे जी नेहमी जपून ठेवली पाहिजे. काही मैत्री ऋतूनुसार बदलतात, पण काही मैत्री आयुष्यभर टिकतात. ही एक क्लासिक, जुनी आणि अनमोल मैत्री आहे. आता बघूया पुढे काय होतं. या मुलाखतीसाठी तुमचे खूप आभार.
गीता: आणि हे होते व्लादिमीर पुतीन. इंडिया टुडे नेटवर्क आणि आजतक ला दिलेल्या एका बेधडक, मनमोकळ्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की रशिया कधीही वेगळे पडणार नाही, आपल्या हितांशी तडजोड करणार नाही आणि विकसित देशांसमोर झुकणार नाही. आमच्यासोबत राहिल्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. भारत आणि जग आपल्याकडे पाहत आहे.
अंजना: खूप खूप धन्यवाद, सर.
पुतिन: धन्यवाद
ADVERTISEMENT











