Sanjay Dina Patil Threatens Journalists : ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात सामील झालेले खासदार संजय दीना पाटील पत्रकारांशी बोलत असताना त्यांची जीभ घसरली. परत आले तर मारुन पाठवणार अशी धमकी त्यांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांना धमकी देताना ते म्हणाले की, 'इज्जत करतोय, उगच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय, जेवायला देतोय. आता परत आले तर मारुन पाठवणार तुम्हाला पण. जे लिहायचं ते लिहा. रेकॉर्ड करा आणि जाऊन सांगा तिकडे. कमिश्नरकडे जाऊन कंप्लेन करा. खूप दिवस सहन केलं. मग का $#@&$ घुसताय?' पाटील यांच्या या वक्तव्यांनतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. ही भाषा एका खासदाराची असू शकते का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
'मी चौकशीला तयार आहे'
याआधीही पाटील यांनी आम्ही पाच लोक मारले असल्याचं खुलेआम सांगितलं होतं. याविषयी सारवासारव करताना तो माझ्या जन्माआधीचा किस्सा असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी पत्रकारांनी त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं असता ते म्हणाले की, 'मी चौकशीला तयार आहे. माझं शिवसैनिकांशी काही देणं-घेणं नाही. शिवसैनिकांचे माझ्यावर उपकार आहेत. काँग्रेसवाल्यांचे माझ्यावर उपकार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांचे माझ्यावर उपकार आहेत. कारण त्यांनी मला निवडून दिलं. एकदा नाही तर तीन-तीन वेळा निवडून दिलं.'
हे ही वाचा : 'परत आला तर मारुन पाठवणार...' खासदार संजय दीना पाटलांची पत्रकारांना थेट धमकी
'मला सिक्युरीटीची गरज नाही'
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'मी काय सिक्युरीटी मागितलेली नाही. मला सिक्युरीटीची गरज नाही. त्यांना सिक्युरीटीची गरज आहे. स्वत:च्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वत:लाच. माहितीये ना तुम्हाला ते? का विसकले तुम्ही लोकं? यांनाच सिक्युरीटीची गरज होती म्हणून खोटे फोन करवले. ती पण दाबून टाकली केस. ती काढा ना केस. मोठे आहेत ते, मी त्यांना मान-सन्मान खूप दिलाय.'
हे ही वाचा : सातारा: शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला विजेचा झटका, आजी वाचवायला गेली अन्..
'मर्दांची कदर करतात'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यावर नाराज आहेत का या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले की, 'मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे. मर्दांची कदर करतात, नाराजी कधीही व्यक्त करत नाही. शाबासकी दिली आहे मला त्यांनी.' यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'माझा अपमान होत होता म्हणून मी गेलो. कुठल्या फंडासाठी गेलो नाही.'
ADVERTISEMENT











