सिंगर रॉकसनने शब्दांनी MPSC चं आंदोलन गाजवलं.. व्हायरल भाषण

मुंबई तक

05 Oct 2026 (अपडेटेड: 05 Oct 2026, 10:59 AM)

Singer Rocksun : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सिंगर रॉकसन यांनी भेट देत पाठिंबा दिला. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाचा आणि गाण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Singer Rocksun

Singer Rocksun

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सिंगर रॉकसनने शब्दांनी MPSC चं आंदोलन गाजवलं..

point

व्हायरल भाषणाची तुफान चर्चा

Singer Rocksun , पुणे : पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला सिंगर रॉकसन यांनी भेट देत पाठिंबा दिला. पुण्यातील गांजवे चौकातील लाल बहादूर शास्त्री रोड परिसरात शेकडो विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. परीक्षेतील पारदर्शकता, कथित पेपरफुटीची चौकशी आणि MPSCचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. याच आंदोलनस्थळी रॉकसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या खास शैलीत भाषण केलं. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : भाडेकरु महिलेसोबत शरीरसंबंध अन् दोन भावांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट; नेमकं काय घडलं?

रॉकसन यांनी भाषणाची सुरुवात विद्यार्थ्यांना जोश देत केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष आपण जवळून पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. दोन ते तीन वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राहिल्याचं सांगत त्यांनी राजेंद्रनगरमधील आपला अनुभवही सांगितला. विद्यार्थ्यांच्या संघर्षावर आधारित आपल्या लेखन आणि गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी या विषयाला आवाज दिल्याचं रॉकसन म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या संघर्षाचा आणि लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या जिद्दीचा उल्लेख करत कविता आणि गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं.

हेही वाचा : 'रवींद्र चव्हाणही मंचेकर गँगचे सदस्य होते त्यांना...,' शिवसेना नेत्याचे गंभीर आरोप; महायुतीत महाभारत!

भाषणात कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरही भाष्य

रॉकसन यांनी आपल्या भाषणात कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सर्वसामान्य शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबातून आलेल्या तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. आपण कोणत्याही राजकीय पक्षासाठी या आंदोलनात आलो नसून केवळ स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला कोणत्याही राजकीय विचारसरणीशी संबंध नसल्याचं सांगताना त्यांनी सत्याची बाजू मांडण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात साथ देऊन ते अधिक व्यापक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

MPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

रॉकसन यांनी आपल्या ‘लाल चिखल’ आणि ‘इन्कलाब’ या गाण्यांतील काही ओळीही आंदोलनस्थळी सादर केल्या. शेतकरी, विद्यार्थी, संघर्ष, अन्याय आणि व्यवस्थेविरोधातील आवाज या विषयांवर त्यांनी आपल्या गाण्यांतून भाष्य केलं. आंदोलनातील विद्यार्थ्यांनीही त्यांच्या भाषणाला आणि गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थी उपोषणाला बसणार असतील, तर आपणही त्यांच्यासोबत बसण्यास तयार असल्याचं रॉकसन यांनी सांगितलं. MPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाला आपल्या हिप-हॉप वाल्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या भाषणानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं असून, रॉकसन यांच्या भाषणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.