'रुपाली चाकणकरांना अटक करुन नार्को टेस्ट करा' सुषमा अंधारेंची मागणी; एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाल्या?

Sushma Andhare On Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात सोबत चाकणकरांचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी आज (20 मार्च) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी चाकणकरांची नार्को टेस्ट करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.  ़

Sushma Andhare On Rupali Chakankar

Sushma Andhare On Rupali Chakankar

मुंबई तक

20 Mar 2026 (अपडेटेड: 20 Mar 2026, 01:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुपाली चाकणकरांना अटक करुन नार्को टेस्ट करा

point

सुषमा अंधारेंची मागणी

Sushma Andhare On Rupali Chakankar : नाशिकमधील भोंदू अशोक खरातने महिलांवर केलेल्या अत्याचाराने आणि त्याच्या असलेल्या राजकीय संबंधांने आख्खा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. भोंदू अशोक खरात सोबत चाकणकरांचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज (20 मार्च) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी चाकणकरांची नार्को टेस्ट करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.  ़

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'महिलेला आधी पाठमोरी उभी केली अन् नंतर..', भोंदू अशोक खरातचा अत्यंत अश्लील Video आला समोर

या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खुलासे केले. तसेच भोंदू सुरेश खरात सोबत ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, निलेश लंके यांचेही फोटो समोर आले आहेत. याविषयी विचारले असता अंधारे म्हणाल्या की, 'या सगळ्यांची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे.'

गृहखात्याने मनावर घेतले आहे, तर...

भोंदू अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे आता उघड झाले आहेत. त्याच्याकडे असलेली अब्जावधींची संपत्ती, राजकीय नेत्यांसोबत असलेले लागेबांधे सगळं काही समोर आले आहे. सुष्मा अंधारेंनी या प्रकरणात रुपाली चाकरणकरांच्या नार्को टेस्टची आणि अटकेची मागणी केली आहे. मात्र खरात सोबत त्यांच्याच पक्षाचे मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचेदेखील फोटो समोर आले आहेत. याविषयी विचारले असता अंधारे म्हणाल्या की, 'गृहखात्याने जर मनावर घेतलं आहे तर सगळ्यांची चौकशी व्हावी. नार्वेकरांची, जयंत पाटलांची सगळ्यांची चौकशी व्हावी. माझ्या पक्षाचा जरी कोणी यात अडकला तरीदेखील त्याचीदेखील गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इभ्रतीचा आहे. मुद्दा हा आहे  की, या सगळ्यात आता आम्हाला चाकणकरांची अटक महत्त्वाची वाटते.'

हे ही वाचा : आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

चाकणकरांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग

पुढं बोलताना अंधारे म्हणाल्या की, 'जयंत पाटील, नार्वेकर, एकनाथ शिंदे, केसरकर, निलेश लंके, अमित शहा यांच्यासंबंधाने पुरावे समोर नाहीयेत. मात्र चाकणकरांच्या संबंधाने ढीगभर पुरावे समोर आले आहेत.चाकणकरांनी गेल्या वर्षबरापासून कशा पद्धतीने हे प्रकरण  दाबण्याचा प्रयत्न केला या गोष्टी आता पुढे आल्या आहेत. त्यामुळे गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कट कारस्थान असतं त्यात चाकणकरांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत, त्यासंबंधी झालेला जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांना तात्काळ अटक होणे आणि त्यांची नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे.'
 

    follow whatsapp