BCCI Contract List: अंजिक्य रहाणेसह 6 खेळाडूंचे करिअर करारामुळे धोक्यात

मुंबई तक

27 Mar 2023 (अपडेटेड: 27 Mar 2023, 01:59 PM)

बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (The Board of Control for Cricket in India) 26 मार्च रोजी 2022-23 या वर्षासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले आहेत.

6 players including Anjikya Rahane's career in danger due to BCCI New contract

6 players including Anjikya Rahane's career in danger due to BCCI New contract

follow google news

BCCI Contract List 2023, Players List : बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (The Board of Control for Cricket in India) 26 मार्च रोजी 2022-23 या वर्षासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. बीसीसीआयच्या ट्विटर हॅण्डलवरून करारातील खेळाडूंची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण 26 खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियातील काही खेळाडूंचं नशीब उजळलं, तर काहींना मोठा फटका बसला असून, करिअरच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

बीसीसीआयच्या कराराच्या यादीत A+, A, B आणि C अशा एकूण चार श्रेणी आहेत. सर्व श्रेणीतून एकूण सात खेळाडूंना वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पुनरागमन करणं कठीण जाऊ शकतं.

Akanksha Dubey: अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप

बीसीसीआयच्या चार श्रेणीतील खेळाडूंना किती मानधन?

A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये, तर C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये दिले जातात. या चारही श्रेणीतून 7 खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

एका टांगेवाल्याने MDH मसाल्याची केली होती सुरुवात; आज जगभरातून मागणी

BCCI च्या या निर्णयामुळे कोणत्या खेळाडूंना बसला धक्का?

अनुभवी अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा आणि दीपक चहर यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता या खेळाडूंकडून अपेक्षा नसल्याचं दिसत आहे.

अजिंक्य रहाणेने 11 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून रहाणे संघाच्या बाहेर आहे आणि आता रहाणेचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे फार कठीण दिसत आहे.

देशभरात कोरोनाचा कहर; 24 तासात 1800 पेक्षा जास्त रुग्ण सापडले

बीसीआयच्या चार श्रेणीत कोणत्या खेळाडूंचा समावेश?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या A+ श्रेणीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश आहे. A श्रेणीत हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. B श्रेणीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू आहेत. तर, C श्रेणीत उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, संजू सैमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत यांचा समावेश आहे.

    follow whatsapp