वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. २४ फेब्रुवारीपासून या टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून याआधीच संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. जलदगती गोलंदाज दीपक चहरपाठोपाठ सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.
ADVERTISEMENT
वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात फिल्डींग करत असताना सूर्यकुमार यादवला hairline fracture झालं आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस सूर्यकुमार यादववर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार केले जाऊन तो तिकडे आपला रिहॅब प्रोग्राम पूर्ण करेल. पायाचे स्नायू दुखावले गेल्यामुळे दीपक चहरही बंगळुरुत जाणार आहे.
दुखापतीच्या सत्रानंतर असा असेल श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), आवेश खान
असा आहे श्रीलंका दौरा –
२४ फेब्रुवारी रोजी पहिला टी२० सामना (लखनऊ)
२६ फेब्रुवारी रोजी दुसरा टी२० सामना (धर्मशाळा)
२७ फेब्रुवारी रोजी दुसरा टी२० सामना (धर्मशाळा)
४ ते ८ मार्च पहिला कसोटी सामना (मोहाली)
१२ ते १६ मार्च दुसरा कसोटी सामना (दिवस-रात्र,बंगळुरु)
ADVERTISEMENT
